ॲमिटी मुंबई विद्यापीठात ऑनलाईन शिक्षणाचं बिगुल वाजलं 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 08:06 PM2021-09-02T20:06:29+5:302021-09-02T20:07:07+5:30

महाराष्ट्रातलं पहिलं खासगी विद्यापीठ असलेल्या ॲमिटी युनिव्हर्सिटी मुंबई  इथल्या अभ्यासक्रमांना सुरुवात झाली आहे.

online education started in amity mumbai university | ॲमिटी मुंबई विद्यापीठात ऑनलाईन शिक्षणाचं बिगुल वाजलं 

ॲमिटी मुंबई विद्यापीठात ऑनलाईन शिक्षणाचं बिगुल वाजलं 

Next

महाराष्ट्रातलं पहिलं खासगी विद्यापीठ असलेल्या ॲमिटी युनिव्हर्सिटी मुंबई  इथल्या अभ्यासक्रमांना सुरुवात झाली आहे. बुधवारी कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) व्ही. के. शर्मा यांनी नवीन विद्यार्थ्यांना ॲमिटी विद्यापीठात सुरु असलेल्या वेगवेगळ्या कोर्सेसची तोंडओळख करुन दिली. सुमारे १२०० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीनं यात भाग घेतला. कोरोना कालावधीत ॲमिटी युनिवर्सिटीत ऑनलाईन पद्धतीनं वर्ग घेतले जात आहेत. आता तर ॲमिटीनं ऑनलाईन विद्यापीठच सुरु केलं आहे. सध्या ॲमिटी मुंबई कॅम्पसमध्ये सुमारे १६ विभागात ३००० हून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. 

विद्यापीठाचे कुलगुरु लेफ्टनंट जनरल (निवृत्त) व्ही. के. शर्मा यांच्यानुसार, “आजच्या विद्यार्थांना देशात आणि जगात काय चाललं आहे हे नेमकं माहितेय. जीवनात पुढे काय करायचं हे ही त्यांनी पक्क केलेलं असतं. या विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन कर्तव्यदक्ष नागरीक बनावं. यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांना सर्वोत्कृष्ठ प्रशिक्षण देत आहोत.” 

ॲमिटी युनिव्हर्सिटीत चॉईस बेसड् क्रेडीट सिस्टम आहे म्हणजे विद्यार्थ्याला आपला अभ्यासक्रम निवडण्याचा पूर्ण अधिकार देण्यात आलाय. शिवाय विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या  शिष्यवृत्ती आणि दोन वर्षे परदेशात जाऊन शिक्षण पूर्ण करण्याची संधी देण्यात येते. परदेशात न्यूयॉर्क, कॅनडा,  सॅनफ्रान्सिस्को, पॅरीस आदी ८ ठिकाणी ॲमिटीचे कॅम्पस आहेत. तिथं जाऊन हे विद्यार्थी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विविध विषयांचं अद्ययावत शिक्षण घेऊ शकतात. इथं शैक्षणिक संशोधनावर जास्त भर देण्यात येत आहे. 

२०३० पर्यंत भारताला Knowledge Superpower अर्थात ज्ञानाच्या क्षेत्रात महासत्ता बनवण्याचं उद्दिष्ट ॲमिटी ग्रुपतर्फे ठेवण्यात आलं आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात ॲमिटी युनिवर्सिटी ही अग्रगण्य स्थानी आहे. महाराष्ट्रातील एक महत्त्वाची शिक्षण संस्था म्हणून नावारुपाला येत आहे. ॲमिटी ग्रुपचे भारतात १२ ठिकाणी विद्यापीठे असून ११ कॅम्पस आहेत. येत्या काळात देशभरात ३५ विद्यापीठं आणि १०० कॅम्पस सुरु करण्याचं उद्दिष्ट आहे.
 

Web Title: online education started in amity mumbai university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app