सरकारी नोकरीची सुवर्ण संधी; 'या' विभागात बंपर भरती, पाहा डिटेल्स...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 17:42 IST2023-10-09T17:42:40+5:302023-10-09T17:42:40+5:30
NTPC Vacancy 2023: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे.

सरकारी नोकरीची सुवर्ण संधी; 'या' विभागात बंपर भरती, पाहा डिटेल्स...
NTPC Jobs 2023: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनने(NTPC) भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, NTPC मध्ये विविध शाखांतर्गत कार्यकारी अभियंता प्रशिक्षणार्थी पदासाठी बंपर भरती होणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट careers.ntpc.co.in वरुन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
किती पदे भरणार
उमेदवार फक्त 20 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेतून NTPC मध्ये एकूण 495 पदांची भरती केली जाणार आहे. यात इलेक्ट्रिकलची 120 पदे, मेकॅनिकलची 200 पदे, इलेक्ट्रॉनिकची 80 पदे, सिव्हिलची 30 पदे आणि खाणकामची 65 पदे भरण्यात येणार आहेत.
किती असेल अर्ज फी
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला शुल्क भरावा लागेल. सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 300 रुपये शुल्क आहे, तर SC/ST/PH उमेदवारांना शुल्क भरण्यात सूट देण्यात आली आहे.
अर्ज कसा करावा
स्टेप 1: अर्ज करण्यासाठी NTPC careers.ntpc.co.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
स्टेप 2: यानंतर मेन पेजवरील संबंधित भरती लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: यानंतर उमेदवारांनी नोंदणी लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी.
स्टेप 4: आता उमेदवारांनी लॉग इन करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
स्टेप 5: उमेदवाराने अर्ज फी भरावी.
स्टेप 6: त्यानंतर अर्ज सबमिट करावा.