नारायण शैक्षणिक संस्थेने १२ राज्यांमध्ये सुरू केले ५२ नवीन कॅम्पस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 17:15 IST2025-03-27T17:15:10+5:302025-03-27T17:15:51+5:30

नारायण शैक्षणिक संस्थेने १२ राज्यांमध्ये ५२ नवीन कॅम्पस सुरू करून दर्जेदार शिक्षण देण्याच्या आपल्या मिशनमध्ये एक मोठी झेप घेतली आहे.

Narayana Educational Institutions Launches 52 New Campuses Across 12 States | नारायण शैक्षणिक संस्थेने १२ राज्यांमध्ये सुरू केले ५२ नवीन कॅम्पस

नारायण शैक्षणिक संस्थेने १२ राज्यांमध्ये सुरू केले ५२ नवीन कॅम्पस

दिल्ली - आशियातील सर्वात मोठ्या शैक्षणिक ग्रुपपैकी एक असलेल्या नारायण शैक्षणिक संस्थेने १२ राज्यांमध्ये ५२ नवीन कॅम्पस सुरू करून दर्जेदार शिक्षण देण्याच्या आपल्या मिशनमध्ये एक मोठी झेप घेतली आहे. या धोरणात्मक विस्तारामुळे भारतातील २३ राज्यांमध्ये शाळा, महाविद्यालयं आणि कोचिंग सेंटर्समध्ये पसरलेल्या प्रभावी ९०७ कॅम्पसपर्यंत नारायणचा आता प्रसार झाला आहे.

या उपक्रमासह नारायण प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी आपला संरचित अभ्यासक्रम, प्रगत शिक्षण पद्धती, शारीरिक आणि मानसिक कल्याणावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. हा विस्तार भारताच्या शैक्षणिक गोष्टींसाठी महत्वपूर्ण आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविण्यास सक्षम केलं जाईल.

२०२५-२६ शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक विकासासाठी नवीन कॅम्पस धोरणात्मकरित्या स्थापन करण्यात आले आहेत. हे कॅम्पस खालील राज्यांमध्ये आहेत.

छत्तीसगड - ४ नवीन कॅम्पस
तामिळनाडू - ४ नवीन कॅम्पस
मध्य प्रदेश - ३ नवीन कॅम्पस
गुजरात, हरियाणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि राजस्थान - प्रत्येकी २ कॅम्पस
आसाम आणि पंजाब - प्रत्येकी १ कॅम्पस

तेलंगणामध्ये २१ आणि आंध्र प्रदेशात ८ नवीन कॅम्पससह तेलुगू राज्यांमध्ये नारायण आपला गड मजबूत करत आहे. हा विस्तार देशभरातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेच्या अढळ वचनबद्धतेवर प्रकाश टाकतो.

या महत्त्वपूर्ण विस्ताराविषयी बोलताना, नारायण शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष पुनीत कोठापा म्हणाले की, "देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात नारायण कॅम्पस स्थापन करणं हे आमचं ध्येय आहे. शिक्षण हा उज्ज्वल भविष्याचा आधारस्तंभ आहे यावर आमचा ठाम विश्वास आहे आणि आम्ही प्रत्येक मुलासाठी हे उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहोत. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला चालना देण्यासाठी पालक आणि कुटुंब बजावत असलेली महत्त्वाची भूमिका ओळखून आम्ही आमच्या उपस्थितीचा विस्तार करत आहोत. जेणेकरून विद्यार्थ्यांना केवळ नवीन शहरात स्थलांतरित होण्याऐवजी घरी अधिक दर्जेदार वेळ घालवता येईल. कारण प्रत्येक नवीन कॅम्पस आम्हाला अशा भविष्याचं स्वप्न साकार करण्याच्या जवळ आणतो. तुमची स्वप्नं आमची स्वप्नं आहेत."

नारायणचा विस्तार केवळ त्याची भौगोलिक पोहोच वाढवण्याबद्दल नाही तर स्पर्धात्मक जगात विद्यार्थ्यांना उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या संधी निर्माण करण्याबद्दल आहे. नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धती, चांगलं शिक्षण आणि समग्र विकासावर लक्ष केंद्रित करून, नारायण शिक्षण क्षेत्रात बेंचमार्क स्थापित करत आहे.

नवीन कॅम्पसमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा, अनुभवी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेचा साकार करण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केलेले पोषक वातावरण असेल. जागतिक दर्जाचे शैक्षणिक फ्रेमवर्क अधिक प्रदेशांमध्ये आणून नारायण भारतातील तरुणांसाठी उज्ज्वल, अधिक न्याय्य भविष्याचा मार्ग मोकळा करत आहे.

नारायण शैक्षणिक संस्था

भारतातील २३ राज्य आणि २५० हून अधिक शहरांमध्ये ९०० हून अधिक शाळा, महाविद्यालय, कोचिंग सेंटर आणि व्यावसायिक महाविद्यालयांच्या मोठ्या नेटवर्कसह, नारायण शैक्षणिक संस्था ही आशियातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित शिक्षण ग्रुपपैकी एक आहे ज्याचा शिक्षण क्षेत्रात ४६ वर्षांहून अधिक काळचा वारसा आहे. संस्थेकडे ५०,००० हून जास्त अनुभवी शिक्षक, संशोधन आणि विकास प्रमुख आणि विषय तज्ञांची टीम आहे, शिवाय गैर-शैक्षणिक कर्मचारी आहेत, जे दरवर्षी ६००,००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंतच्या शिक्षणात मदत करतात. अभियांत्रिकी, वैद्यकीय, सीए आणि नागरी सेवा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यास मदत करण्यासाठी तयार केलेले व्यापक शैक्षणिक कार्यक्रम देतात, जे करिअर-केंद्रित अध्यापनासाठी महत्त्वाचं ठरतं. यासह नारायण देशभरातील लाखो लोकांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे कारण तुमची स्वप्नं आमची स्वप्नं आहेत.

अधिक जाणून घेण्यासाठी https://www.narayanagroup.com/

मीडिया कॉन्टॅक्ट
अबिलाश रागी - +९१ ७३३७३३५८०२
विमल - +९१ ९०००२४२१५८

Web Title: Narayana Educational Institutions Launches 52 New Campuses Across 12 States

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.