शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

MPSC Exam: एमपीएससीच्या १५ हजार पदांची घोषणा हवेतच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 6:43 PM

१५ हजार पदांच्या भरतीची घोषणा हवेतच विरणार का, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे

पुणे : स्वप्निल लोणकरच्या (swapnil lonkar) आत्महत्येनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar on mpsc exam) यांनी ६ जुलै २०२१ रोजी विधानसभेत १५ हजार ५११ पदांची घोषणा केली होती. मात्र, दोन महिन्यांनंतर याबाबत कोणत्याही हालचाली अद्याप झाल्या नाहीत. त्यामुळे १५ हजार पदांच्या भरतीची घोषणा हवेतच विरणार का, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

विधानसभेच्या सभागृहात १५ हजार ५११ पदांची घोषणा केली. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी अजून सुरू झाली नाही. उपमुख्यमंत्री यांनी राज्यातील २५ लाख तरुण-तरूणींची फसवणूक केली आहे. ३० जुलै २०२१ वित्त विभाग शासन निर्णयानुसार प्रत्येक विभागाने ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (mpsc) रिक्त पदांची मागणीपत्रे पाठवावीत, असे निर्देश देण्यात आले होते.

मात्र, अद्यापही कोणत्याही विभागाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठवले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नवीन वर्षाचे अंदाजित वेळापत्रक जाहीर केले नाही. तसेच नवीन जाहिराती प्रसिद्ध केल्या नाहीत. मागील २ वर्ष झाली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची नवीन जाहिरात आली नाही.

'२५ लाख तरुण-तरूणींची फसवणूक'-

सुमारे २५ लाख बेरोजगार सध्या आयोगाच्या नवीन जाहिरातीची वाट पाहत आहेत. सामान्य प्रशासन विभाग आणि इतर विभागांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे लवकरात लवकर मागणीपत्र पाठवून १५५११ पदांची भरती करण्यात यावी ही विद्यार्थ्यांची मागणी आहे.- महेश घरबुडे, सदस्य, एमपीएससी समन्वय समिती

राज्यात लाखो तरुण पदभरतीच्या प्रतीक्षेत आहेत. महाविकास आघाडी सरकारचा मुख्य अजेंडा हा तरुणांना न्याय मिळवून देणे आहे. याच धोरणानुसार सामान्य प्रशासन विभागाने रिक्त पदांच्या बाबत सर्व विभागांना मागणीपत्र ३० सप्टेंबर आयोगाकडे सादर करण्याचे सूचित केले आहे. पण एकूणच या विभागातील प्रशासकीय दिरंगाई दिसत आहे. त्यामुळे अद्याप कुठल्या ही विभागाचे मागणी पत्र गेले नसल्याचे समोर येत आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलून विद्यार्थ्यांची अडचण तसेच पदभरती संदर्भात मागणी करणार आहे.- कल्पेश यादव, युवासेना

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा