Maharashtra FYJC CET 2021: मोठी बातमी! इयत्ता ११ वी प्रवेशासाठीच्या परीक्षेची तारीख जाहीर; जाणून घ्या सविस्तर माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 07:34 PM2021-07-19T19:34:34+5:302021-07-19T19:35:40+5:30

Maharashtra FYJC CET 2021 Exam Date: राज्यातील इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक अखेर शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.

Maharashtra FYJC CET 2021 exam date and timing announced here is full details | Maharashtra FYJC CET 2021: मोठी बातमी! इयत्ता ११ वी प्रवेशासाठीच्या परीक्षेची तारीख जाहीर; जाणून घ्या सविस्तर माहिती

Maharashtra FYJC CET 2021: मोठी बातमी! इयत्ता ११ वी प्रवेशासाठीच्या परीक्षेची तारीख जाहीर; जाणून घ्या सविस्तर माहिती

Next

Maharashtra FYJC CET 2021 Exam Date: राज्यातील इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक अखेर शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. येत्या २१ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजता सीईटीची प्रवेश परीक्षा होणार असून परीक्षा दोन तासांची असणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी २० जुलैपासून अर्ज करता येणार आहे. (Maharashtra FYJC CET 2021 exam date and timing announced here is full details)

यावर्षी पहिल्यांदाच दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे लागला आहे. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे लाखो विद्यार्थी राज्यात आहेत तर मुंबईतील विद्यार्थ्यांची संख्या १५ हजारांवर आहे; मात्र यंदाच्या अकरावी प्रवेशात सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये उत्तम गुण मिळणार आहेत, त्यांना त्यांच्या सीईटीच्या गुणांकनानुसार अकरावी प्रवेशात प्राधान्य देण्यात येईल. त्यामुळे दहावीच्या निकाल पार पडला असला तरी विद्यार्थ्यांना आता सीईटी परीक्षेच्या दिव्यातून पार पडावे लागणार आहे. साहजिकच इथे त्यांना सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांशी नामांकित महाविद्यालयासाठी स्पर्धा करावी लागणार आहे.

इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी CET परीक्षेसंदर्भातील महत्वाचे मुद्दे: 

  • राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार नाही. इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणीसाठी १७८

 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

  • अर्ज नोंदणी करताना विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र निवडता येणार 
  • राज्य शिक्षण मंडळामार्फत ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार 
  • सीईटी परीक्षा ऐच्छिक असणार असून १०० गुणांसाठी गणित, विज्ञान, समाजशास्त्र , इंग्रजी या ४ विषयांचे प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न विचारले जाणार 
  • परीक्षा बहुपर्यायी उत्तरांची असणार असून ओएमआर पद्धतीने घेतली जाणार

 

Web Title: Maharashtra FYJC CET 2021 exam date and timing announced here is full details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.