शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

अकरावी प्रवेश प्रक्रिया : आतापर्यंत ३ लाख ७२ हजार ५२ प्रवेश निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 08:48 IST

Maharashtra 11th Admission : आतापर्यंत झालेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये सर्वाधिक प्रवेश हे नाशिक शहरात झाले असून प्रवेशाची टक्केवारी ७५.८९ टक्के आहे.

मुंबई :  ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही अकरावी प्रवेश घेतले नाहीत, त्यांना प्रवेशाची आणखी एक संधी शिक्षण संचालनालयाने दिली आहे. या शेवटच्या फेरीसाठी राज्यात १ लाख ६३ हजार ९७८ जागा रिक्त आहेत. यात सर्वाधिक जागा रिक्त राहण्याचे प्रमाण नागपूर जिल्ह्यात असून तेथे एकूण प्रवेशाच्या ४२ टक्के जागा रिक्त आहेत. तर सर्वात कमी जागा नाशिक जिल्ह्यात उपलब्ध असून जागा रिक्त राहण्याचे प्रमाण २४ टक्के आहे. आतापर्यंत झालेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये सर्वाधिक प्रवेश हे नाशिक शहरात झाले असून प्रवेशाची टक्केवारी ७५.८९ टक्के आहे. उपलब्ध असलेल्या २५,८३० जागांपैकी १९,२६१ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले असून अंतिम फेरीसाठी आता ६,११९ जागा उपलब्ध आहेत. नागपुरात अकरावीचे सगळ्यात कमी प्रवेश झाले आहेत. उपलब्ध असलेल्या ५९,१९५ जागांपैकी केवळ ३३,९५० जागांवर प्रवेश होऊ शकले आहेत आणि आता २५,२४५ जागा पुढील फेरीसाठी उपलब्ध आहेत. 

८७,००० जागा मुंबई विभागात अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या शेवटच्या फेरीसाठी मुंबई विभागात ८७,५९८ जागा उपलब्ध आहेत. मुंबईत ३ लाख २१,७८० जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी २ लाख ३४ हजार १८२ जागांवर आतापर्यंत प्रवेश निश्चित झाले आहेत. रिक्त जागांची टक्केवारी २७ टक्के इतकी आहे. 

राज्यात ५ लाख ३६ हजार ०३० जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या त्यापैकी ६९ टक्के जागांवर प्रवेश निश्चित झाले असून ३१ टक्के जागा रिक्त असून पुढील शेवटच्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत.

शेवटच्या फेरीसाठी राज्यातील अकरावी प्रवेशाच्या उपलब्ध जागा विभाग     प्रवेश क्षमता     प्रवेश निश्चित     रिक्त जागा अमरावती     १६२३०    १०४६६    ५७६४मुंबई     ३,२१,७८०    २,३४,१८२    ८७, ५९८नागपूर    ५९,१९५    ३३,९५०    २५२४५नाशिक    २५३८०     १९२६१    ६११९पुणे     १,१३,४४५    ७४,१९३    ३९,२५२एकूण    ५,३६,०३०    ३,७२,०५२    १,६३,९७८

टॅग्स :collegeमहाविद्यालयEducationशिक्षण