शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

इंजिनीअरिंगच्या १.४६ लाख जागा झाल्या कमी; दशकभरातील सर्वाधिक कपात, ६३ शिक्षणसंस्था बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 10:08 IST

यंदा विद्यार्थ्यांअभावी तसेच अन्य कारणांनी ६३ इंजिनीअरिंग शिक्षणसंस्था बंद होणार आहेत.

ठळक मुद्देजागांमध्ये यंदा मोठी कपात झाली असली तरी तंत्रशिक्षण घेणाऱ्या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांत आजही ८० टक्के विद्यार्थी इंजिनीअरिंग शाखेचे आहेत२०१५-१६ सालापासून दरवर्षी किमान ५० इंजिनीअरिंग शिक्षणसंस्था बंद पडत आहेत.गेल्या वर्षी कोरोनामुळे शिक्षणसंस्था बंद करण्याचा आदेश देण्यात आला नाही.

नवी दिल्ली : गेल्या दहा वर्षांतील इंजिनीअरिंगच्या जागांमधील सर्वांत मोठी कपात यंदा झाली आहे. इंजिनीअरिंगच्या १.४६ लाख जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे जागांचा एकूण आकडा २३.२८ लाख झाला. 

यंदा विद्यार्थ्यांअभावी तसेच अन्य कारणांनी ६३ इंजिनीअरिंग शिक्षणसंस्था बंद होणार आहेत. अशी स्थिती २०१५-१६ सालानंतर उद‌्भवली आहे. त्या वर्षी इंजिनीअरिंगच्या जागांमध्ये मोठी कपात झाली होती. ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) या संस्थेने म्हटले की, जागांमध्ये यंदा मोठी कपात झाली असली तरी तंत्रशिक्षण घेणाऱ्या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांत आजही ८० टक्के विद्यार्थी इंजिनीअरिंग शाखेचे आहेत. २०१५-१६ सालापासून दरवर्षी किमान ५० इंजिनीअरिंग शिक्षणसंस्था बंद पडत आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे शिक्षणसंस्था बंद करण्याचा आदेश देण्यात आला नाही. यंदा ६३ इंजिनीअरिंग शिक्षणसंस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

आतापर्यंत ४०० शिक्षणसंस्था पडल्या बंद२०१४-१५ साली देशभरात इंजिनीअरिंगचे ३२ लाख विद्यार्थी होते. मात्र या शाखेची मागणी कमी झाल्याने त्या वेळेपासून आतापर्यंत सुमारे ४०० इंजिनीअरिंग शिक्षणसंस्था बंद पडल्या आहेत. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात ५२ नव्या इंजिनीअरिंग शिक्षणसंस्था सुरू करण्यास एआयसीटीईने परवानगी दिली आहे. या संस्थेचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांनी सांगितले की, देशाच्या मागास भागात नवीन शिक्षणसंस्था उघडण्यासाठी केंद्राने संमती दिली आहे. २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या तीन वर्षांमध्ये अनुक्रमे १४३, १५८, १५३ नव्या इंजिनीअरिंग शिक्षणसंस्था उघडण्यास परवानगी देण्यात आली.

विद्यार्थ्यांची झाली फसवणूकबंद झालेल्या शिक्षणसंस्थांपैकी काही ठिकाणी योग्य शैक्षणिक सुविधा, सुसज्ज प्रयोगशाळा नव्हत्या. अध्यापकही अपुरे होते. अशाही स्थितीत या शिक्षणसंस्था विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांची फसवणूक करीत होत्या. अशा संस्था बंद होणे ही इष्टापत्तीच आहे, असे शिक्षणतज्ज्ञांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Studentविद्यार्थी