भारतीय सैन्यदलात सामील होऊन देश सेवेची संधी, या पदांसाठी तब्बल 177500 रुपये सॅलरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 03:49 PM2021-09-30T15:49:05+5:302021-09-30T15:50:45+5:30

या भरती (Indian army recruitment 2021) प्रक्रियेच्या माध्यमाने एकूण 191 रिक्त पदे भरली जातील. 22 ऑक्टोबर 2021 ही ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Indian Army Recruitment 2021 apply online at joinindianarmy.nic.in | भारतीय सैन्यदलात सामील होऊन देश सेवेची संधी, या पदांसाठी तब्बल 177500 रुपये सॅलरी

भारतीय सैन्यदलात सामील होऊन देश सेवेची संधी, या पदांसाठी तब्बल 177500 रुपये सॅलरी

Next

नवी दिल्ली - भारतीय सैन्यदलात (Indian Army) शॉर्ट सर्व्हिस कमीशन पुरुष-58 आणि महिला-29, एप्रिल 2022 कोर्सचे (टेक्निकल) नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार सैन्य भर्ती 2021 साठी अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in च्या माध्यमाने अप्लाई करू शकतात. 28 सप्टेंबर 2021 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत.

या भरती (Indian army recruitment 2021) प्रक्रियेच्या माध्यमाने एकूण 191 रिक्त पदे भरली जातील. 22 ऑक्टोबर 2021 ही ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. एप्रिल 2022 मध्ये अधिकारी ट्रेनिंग अॅकॅडमी (ओटीए), चेन्नई, तामिळनाडूमध्ये सुरू होईल. आवश्यक माहितीसाठी नोटिफिकेशनची डायरेक्ट लिंक खाली देण्यात आली आहे.

व्हॅकॅन्सी डिटेल्स (Indian Army Vacancy 2021 Details)
पुरुषांसाठी - 175 पदे
महिलांसाठी - 14 पदे
विधवांसाठी - 02 पदे

कुणाला करता येईल अर्ज?
संबंधित क्षेत्रात अभियांत्रिकीची पदवी अथवा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेले उमेदवार एप्रिल 2022 पर्यंत सर्व सेमिस्टर्स/वर्षांच्या मार्कशीटबरोबरच अभियांत्रिकी डिग्री परीक्षा पास असल्याचे सर्टिफिकेट जमा करणे आवश्यक आहे. तसेच, ट्रेनिंग सुरू होण्याच्या तारखेपासून 12 आठवड्यांच्या आत अभियांत्रिकीचे डिग्री प्रमाणपत्र प्राप्त होणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन पाहावे.

वयोमर्यादा -
एसएससी (टेक) साठी - 58 पुरुष आणि एसएससीडब्ल्यू (टेक) - 29 महिला - 01 एप्रिल 2022 रोजी 20 ते 27 वर्षे. तसेच, संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांच्या विधवांसाठी, ज्यांचा मृत्यू केवळ हार्नेसमध्ये जाला. SSCW (नॉन टेक), नॉन UPSC आणि SSCW (टेक) - 01 एप्रिल 2022 पर्यंत 35 वर्षांपेक्षा अधिक नसावे. 

वेतन
पुरुषांसाठी - 56100 रुपयांपासून ते 1,77,500 रुपयांपर्यंत (लेवल-10)
महिलांसाठी - 56100 रुपयांपासून ते 1,77,500 रुपये (लेवल-10)
विधवांसाठी - 56100 रुपयांपासून 1,77,500 रुपये (लेवल-10)
 

 

Web Title: Indian Army Recruitment 2021 apply online at joinindianarmy.nic.in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.