शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

फी दिली नाही म्हणून चक्क प्रयोगशाळेत वर्ग, ‘कपोल’ शाळेतील प्रकार, कांदिवली पोलिसांत गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 9:37 AM

Education News: कांदिवलीच्या महावीरनगर परिसरात असलेल्या कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल शाळेच्या प्राचार्यांसह तिघांवर सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी १५ मुलांना फी न भरल्याच्या कारणास्तव वर्गामधून वेगळे करत वर्ग सुटेपर्यंत प्रयोगशाळेत बसवून ठेवले.

मुंबई : कांदिवलीच्या महावीरनगर परिसरात असलेल्या कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल शाळेच्या प्राचार्यांसह तिघांवर सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी १५ मुलांना फी न भरल्याच्या कारणास्तव वर्गामधून वेगळे करत वर्ग सुटेपर्यंत प्रयोगशाळेत बसवून ठेवले. याचा विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम झाला असून त्यांनी शाळेत जाण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी पालकांनी कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली.

कांदिवलीच्या बंदरपाखाडी रोड परिसरात तक्रारदार के. शहा (३६) या राहतात. त्यांची १४ वर्षीय मुलगी या शाळेत नववीच्या वर्गात शिकते. शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल रोजी त्यांची मुलगी सकाळी शाळेत गेली होती. वर्ग भरल्यानंतर प्रार्थना झाली आणि त्यानंतर शाह यांच्या मुलीसह अन्य वर्गमैत्रीणीला बाहेर काढत त्यांना तळमजल्यावर असलेल्या हेड ऑफ दि डिपार्टमेंट यांना भेटण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. इयत्ता नववी आणि दहावीचे २५ विद्यार्थी त्याठिकाणी जमा झाले. मात्र, त्यापैकी ८ ते ९ विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेसाठी पाठविण्यात आले. मात्र, तक्रारदारासह अन्य १५ जणांना त्यांनी त्याच खोलीत दिवसभर बसवून ठेवले. मात्र, या १५ मुलांचा त्या दिवशी वीस मिनिटांचे राकेश सरांचे फक्त १ लेक्चर झाले आणि मुलांना त्यांचा अभ्यास स्वतःच करण्यास सांगून ते निघून गेले. तर १५ मिनिटे प्राचार्यांनी त्यांच्याशी गप्पा मारल्या. शाह यांची मुलगी घरी आली तेव्हा तिने हा सगळा प्रकार तिच्या आईला सांगितला. याप्रकरणी त्यांनी मनसेचे विधानसभा अध्यक्ष दिनेश साळवी यांच्याशी संपर्क साधला आणि थेट कांदिवली पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी याप्रकरणी प्राचार्यासह तिघांवर गुन्हा दाखल केला.

कोरोनाकाळात शाळेकडून आम्हाला कोणताही दिलासा दिला गेला नाही. शाळेच्या कोणत्याही प्रॉपर्टीचा विद्यार्थ्यांनी वापर केला नाही. तर त्याचे पैसे आम्ही का भरायचे? असा आमचा मुद्दा असून त्याबाबत आम्ही काही पालकांनी मिळून उच्च न्यायालयात २८ मार्च रोजी जनहित याचिका दाखल केली आहे. हा प्रकार घडला त्यानंतर आम्ही आंदोलन करू, असे वाटल्याने शाळेने गेट समोर चार बाऊन्सर उभे केले होते. - के. शाह, तक्रारदार पालक 

विद्यार्थ्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले गेले. त्यांना अशा प्रकारे वागवल्यामुळे त्यांना मानसिक त्रास झाला तर जे.जे. कायदा, २००० च्या कलम २३ अंतर्गत दखलपात्र नोंदविला जाऊ शकतो आणि कांदिवलीतील शाळेच्या प्रकरणात पोलिसांनी तेच केले. - ॲड. विशाल सत्यप्रकाश सक्सेना - सर्वोच्च न्यायालय  

त्या शैक्षणिक संस्थांची गय करणार नाहीकपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूलमध्ये फी भरली नसल्याने विद्यार्थ्यांना वेगळी वागणूक दिली जात होती. त्याची गंभीर दखल शिक्षण विभागाने घेत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या त्रास देणाऱ्या अथवा त्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या शैक्षणिक संस्थांची गय केली जाणार नाही.- प्रा. वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षण