परीक्षेआधीच १२ वीचे केमेस्ट्री-फिजिक्सचे पेपर फुटले; नागपुरात व्हॉट्सअपवर प्रश्नपत्रिका व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 11:10 IST2026-02-21T11:09:20+5:302026-02-21T11:10:01+5:30

ती विद्यार्थिनी तिसऱ्यांदा बाहेर गेल्यानंतर परत आली असता तिची शिक्षिकेच्या माध्यमातून झडती घेण्यात आली. तिच्याकडून एक स्मार्ट फोन जप्त करण्यात आला.

Class 12 Chemistry-Physics papers leaked before the exam; Question papers go viral on WhatsApp in Nagpur | परीक्षेआधीच १२ वीचे केमेस्ट्री-फिजिक्सचे पेपर फुटले; नागपुरात व्हॉट्सअपवर प्रश्नपत्रिका व्हायरल

परीक्षेआधीच १२ वीचे केमेस्ट्री-फिजिक्सचे पेपर फुटले; नागपुरात व्हॉट्सअपवर प्रश्नपत्रिका व्हायरल

योगेश पांडे - नागपूर

नागपूर : पेपरफुटीच्या प्रकरणांवर नियंत्रण आणले असल्याचा दावा शिक्षण मंडळाकडून करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात तंत्रज्ञानाचा उपयोग करून नागपुरात पेपरफूट झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात व्यक्तीने प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या व्हॉट्अअपवर पाठविल्या. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेंट उर्सुला हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर एका शिक्षिकेच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. दोन विद्यार्थिनींची या प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. या दोन्ही प्रश्नपत्रिका राज्यातील इतरही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांपर्यंत परीक्षेच्या अगोदरच पोहोचल्याची शक्यता आहे.

सेंट उर्सुला हायस्कूलमधील परीक्षा केंद्रावर बुधवारी रसायनशास्त्राचा पेपर होता. तेथील एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधनगृहात जात हाेती. त्यामुळे केंद्रावरील पर्यवेक्षक असलेल्या शिक्षिकेला संशय आला. ती विद्यार्थिनी तिसऱ्यांदा बाहेर गेल्यानंतर परत आली असता तिची शिक्षिकेच्या माध्यमातून झडती घेण्यात आली. तिच्याकडून एक स्मार्ट फोन जप्त करण्यात आला. ताे माेबाईल तपासला असता त्यामध्ये एका व्हाॅट्सअप ग्रूपवर परीक्षा सुरु  हाेण्यापूर्वीच पेपर आलेला हाेता. तसेच त्याच ग्रूपवर प्रश्नांची उत्तरेसुद्धा आलेली हाेती. त्यामुळे केंद्र प्रमुखांनी सदर पाेलिसांना फोन केला. संबंधित विद्यार्थिनीने तिच्या मैत्रिणीचेदेखील नाव सांगितले. दोघींचीही चौकशी केली असता खाजगी शिकवणी वर्गातील एका शिक्षकाने पैसे घेऊन पेपर फोडल्याची माहिती मिळाली. 

विद्यार्थिनीने दिलेल्या माहितीवरुन आणि व्हाॅट्सअप ग्रूपमधील माहितीवरुन सदर पाेलिसांनी पेपर फोडणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा पेपर आतापर्यंत किती जणांपर्यंत पाेहचला तसेच या रॅकेटमध्ये किती जण सहभागी आहेत याची माहिती पाेलिस घेत आहे

Web Title : परीक्षा से पहले महाराष्ट्र एचएससी रसायन विज्ञान, भौतिकी के पेपर लीक; प्रश्न वायरल

Web Summary : नागपुर: एचएससी रसायन विज्ञान और भौतिकी के पेपर परीक्षा से पहले व्हाट्सएप के माध्यम से लीक हो गए। एक शिक्षिका ने छात्रों को उत्तरों के साथ पकड़ा; पुलिस कोचिंग क्लास के लिंक की जांच कर रही है।

Web Title : Maharashtra HSC Chemistry, Physics Papers Leaked Before Exam; Questions Viral

Web Summary : Nagpur: HSC chemistry and physics papers leaked via WhatsApp before exams. A teacher caught students with answers; police investigate the coaching class link.