बालदिन २०२५: परिवर्तनाची चालना – 'P&G शिक्षा'चा भारतातील शिकण्याची दरी मिटवण्याचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 18:48 IST2025-11-15T18:47:43+5:302025-11-15T18:48:23+5:30

गत वीसहून अधिक वर्षांपासून 'P&G शिक्षा' भारतातील ५० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रवासाला सक्षम बनवत आहे.

Children's Day 2025: Driving Change – P&G Shiksha's Journey to Bridging the Learning Gap in India | बालदिन २०२५: परिवर्तनाची चालना – 'P&G शिक्षा'चा भारतातील शिकण्याची दरी मिटवण्याचा प्रवास

बालदिन २०२५: परिवर्तनाची चालना – 'P&G शिक्षा'चा भारतातील शिकण्याची दरी मिटवण्याचा प्रवास

गत वीसहून अधिक वर्षांपासून 'P&G शिक्षा' भारतातील ५० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रवासाला सक्षम बनवत आहे. दर्जेदार शिक्षणाला समतोल प्रवेश मिळवून देण्यासाठी सुरू झालेल्या या उपक्रमाने केवळ पायाभूत सुविधा उभारून थांबले नाही; तर शिकण्याच्या परिणामकारकतेत सुधारणा, प्रारंभीच्या शिक्षणाची मजबुती, शिक्षक सक्षमीकरण आणि प्रत्येक मुलाच्या क्षमता जतन करण्यावर सातत्याने भर दिला आहे. त्यामुळे विद्यार्थी केवळ शाळेत जात नाहीत तर शिकतात, वाढतात आणि आत्मविश्वासाने पुढे जातात.

'P&G शिक्षा'च्या “Twenty Tales of Triumph” मधील एक प्रेरणादायी कथा आहे — सतलापूर, मध्य प्रदेशातील गरिमा मांडलोईची. शिक्षणाची उत्कट आवड आणि IIT मध्ये जाण्याचे स्वप्न तिच्याकडे होते. शाळेतील सुधारित पायाभूत सुविधा आणि इंग्रजी शिक्षण सहाय्यामुळे त्या स्वप्नाला योग्य दिशा मिळाली.

“शाळेत मिळालेल्या इंग्रजी शिकवणीच्या मदतीमुळे माझी प्रगती खूप वेगाने झाली,” असे गरिमा सांगते. या कार्यक्रमाने तिला फक्त एक वर्गखोली दिली नाही, तर आत्मविश्वास, मार्गदर्शन आणि भविष्याचा रोडमॅप दिला. आज गरिमा IIT रुडकी येथे सिव्हिल इंजिनीअरिंग करत असून तिची वाटचाल P&G शिक्षाच्या उद्दिष्टांचे प्रतिरूप आहे — संधी, मार्गदर्शन आणि योग्य वातावरण दिल्यास मुलांची स्वप्ने नव्या दिशांना उड्डाण देऊ शकतात.

वीस वर्षांचा शिक्षण-सक्षमीकरणाचा प्रवास

२००५ मध्ये — CSR नियमन येण्यापूर्वीच — P&G शिक्षाचा प्रारंभ या विश्वासातून झाला की प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षणाचा अधिकार आहे.
गेल्या दोन दशकांत या उपक्रमाने ५० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांवर प्रभाव निर्माण केला असून, शासन संस्था आणि अग्रणी NGO भागीदारांच्या सहकार्यातून अभिनव शिक्षण मॉडेल्सद्वारे शिकण्याचे परिणाम सुधारण्याचे काम सतत सुरु आहे.

जरी शिक्षणाला प्रवेश वाढला असला तरी शिकण्याचे प्रत्यक्ष परिणाम अद्याप आव्हानात्मक आहेत. ASER २०२४ अहवालानुसार, ५ वीतील ५०% पेक्षा अधिक विद्यार्थी २रीच्या पातळीचा मजकूर वाचू शकत नाहीत. अशाप्रकारची शिक्षणातील दरी मिटवणे ही राष्ट्रीय प्राधान्याची बाब आहे.

याच ठिकाणी P&G शिक्षा महत्वाची भूमिका बजावत आहे — Pratham Education Foundation, Educational Initiatives (Ei), Round Table India, आणि Centre for Civil Society यांच्या सहकार्याने शिक्षणाचा ३६०-डिग्री दृष्टिकोन साकारला जात आहे.

वर्गखोल्यांपासून आत्मविश्वासापर्यंत

P&G शिक्षाचे प्रयत्न तीन प्रमुख दिशांनी केंद्रित आहेत:
>> प्राथमिक शिक्षणात अनुकूल शिकण्याच्या वातावरणाची निर्मिती केल्यामुळे शिकण्यातील दरी रोखणे शक्य होते. 
>> लर्निंग रिमेडिएशन द्वारे सामुदायिक आणि डिजिटल मॉडेल्सद्वारे विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शिकण्याच्या पातळीनुसार शिकवणी. 
>> STEM क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या मुलींना सहाय्य करणाऱ्या P&G शिक्षा बेटियां स्कॉलरशिप शिक्षणात सातत्यता राखली जाते. 

या एकात्मिक मॉडेलमुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिकण्याची पातळी आणि आत्मविश्वास — तिन्ही बाबींमध्ये लक्षणीय सुधारणा घडत आहेत.

शिक्षण: बदलाची सर्वात मोठी शक्ती

वीस वर्षांपासून P&G शिक्षा शिक्षणाच्या माध्यमातून विकासाला चालना देत आहे. प्रत्येक मुलाला समजून शिकण्याची संधी देऊन हा उपक्रम शिक्षणातील अडथळे दूर करतो आणि प्रगतीची नवी दारे उघडतो. गरिमासारख्या हजारो विद्यार्थ्यांच्या कथा P&G शिक्षाच्या प्रभावाची साक्ष देतात. दूरवरच्या गावांपासून ते प्रतिष्ठित विद्यापीठांपर्यंत, योग्य शिक्षणाची संधी मिळाल्यास स्वप्ने वास्तवात बदलू शकतात.

Web Title : पी&जी शिक्षा: भारत में सीखने के अंतर को पाटना, छात्रों को सशक्त बनाना

Web Summary : पी एंड जी शिक्षा 50 लाख से अधिक भारतीय छात्रों को शिक्षा की गुणवत्ता और पहुंच में सुधार करके सशक्त बना रही है। इस पहल में बुनियादी ढांचे का विकास, शिक्षक प्रशिक्षण और छात्रवृत्ति शामिल हैं। गरिमा की आईआईटी यात्रा जैसी सफलता की कहानियां कार्यक्रम के प्रभाव को दर्शाती हैं।

Web Title : P&G Shiksha: Bridging India's Learning Gap, Empowering Students for 20+ Years

Web Summary : P&G Shiksha empowers over 5 million Indian students by improving education quality and access. Initiatives include infrastructure development, teacher training, and scholarships. Success stories, like Garima's IIT journey, demonstrate the program's impact on student confidence and achievement, bridging the learning gap.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.