सीबीएसई प्रश्नपत्रिकांवरील क्यूआर कोडच्या अफवांपासून सावध राहा; मंडळाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 08:03 IST2026-04-05T08:03:23+5:302026-04-05T08:03:57+5:30

जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरविण्याचा प्रयत्न

Beware of rumors about QR codes on CBSE question papers; Board appeals | सीबीएसई प्रश्नपत्रिकांवरील क्यूआर कोडच्या अफवांपासून सावध राहा; मंडळाचे आवाहन

सीबीएसई प्रश्नपत्रिकांवरील क्यूआर कोडच्या अफवांपासून सावध राहा; मंडळाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने बारावीच्या गणिताच्या  प्रश्नपत्रिकांवरील क्यूआर कोडसंदर्भात मोठ्या प्रमाणावर गैरसमज निर्माण झाले असून, ते दूर करण्यासाठी अधिकृत सूचना जारी केली आहे. त्यानुसार सोशल मीडियावर पसरत असलेल्या चुकीच्या दाव्यांबाबत मंडळाने भूमिका मांडली. या क्यूआर कोडच्या अफावांपासून सावध राहाण्याचे आवाहन सीबीएसई मंडळाने केले आहे.

बारावीच्या गणितच्या पेपरात ९ मार्च रोजी प्रश्नपत्रिकेवरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर वेगळीच लिंक ओपन झाली. मात्र, बोर्डाने सांगितले की, प्रश्नपत्रिकांवरील क्यूआर कोड हे थेट इंटरनेट लिंक म्हणून दिली नाही. हा कोड अंतर्गत प्रमाणिकरण, ट्रॅकिंग आणि परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता राखण्यासाठी वापरले जातात. क्यूआर कोड स्कॅन केल्यावर कोणतीही वेबसाइट उघडत नाही, असे स्पष्ट केले.

जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरविण्याचा प्रयत्न

मंडळाने नमूद केले की, हे शोध परिणाम अल्गोरिदमवर आधारित असून, त्यांचा केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड किंवा परीक्षा प्रक्रियेशी कोणताही थेट संबंध नाही. त्यामुळे अशा माहितीवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट करण्यात आले. काही घटक जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवून मंडळाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही निरीक्षण सीबीएसई मंडळाच्या प्रशासनाकडून नोंदवले गेले आहे. क्यूआर कोडचा संबंध असंबंधित व्यक्ती किंवा बाबींशी जोडणे चुकीचे आहे, असे सीबीएसईने म्हटले आहे.

Web Title : सीबीएसई प्रश्न पत्रों पर क्यूआर कोड अफवाहों से सावधान!

Web Summary : सीबीएसई ने स्पष्ट किया कि परीक्षा पत्रों पर क्यूआर कोड आंतरिक ट्रैकिंग के लिए हैं, बाहरी लिंक के लिए नहीं। बोर्ड ने कोड को अप्रासंगिक सामग्री से जोड़ने वाले भ्रामक दावों को खारिज कर दिया, गलत सूचना और छवि खराब करने के प्रयासों के खिलाफ सावधानी बरतने का आग्रह किया। केवल आधिकारिक सीबीएसई घोषणाओं पर विश्वास करें।

Web Title : CBSE Warns Against QR Code Rumors on Question Papers

Web Summary : CBSE clarifies that QR codes on exam papers are for internal tracking, not external links. The board dismisses misleading claims linking the codes to irrelevant content, urging caution against misinformation and attempts to tarnish its image. Trust official CBSE announcements only.