शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

यंदा जरा टफच; इंजिनीअरिंग, फार्मसीचा कटऑफ वधारणार!

By रेश्मा शिवडेकर | Updated: June 18, 2024 08:24 IST

८०-९० हून अधिक पर्सेटाईलधारक विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ.

रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: एमएचटी-सीईटीच्या निकालातील गुणांच्या फुगवट्यामुळे यंदा राज्यातील इंजिनीअरिंग, फार्मसी व्यावसायिक अभ्यासक्रमांचा कटऑफ चांगलाच वधारणार आहे. या एकतर यंदा एमएचटी-सीईटीत ३७ विद्यार्थ्यांनी १०० पसेंटाईल मिळविण्याची कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी हा आकडा २८ होता. केवळ १०० पर्सेटाईलच नव्हे, तर १० ते ९९.९९, ८० ते ८९.९९, ७० ते ७९.९९, ६० ते ६९.९९ अशा वरच्या श्रेणीत पर्सेटाईल मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही यंदा लक्षणीय वाढ झाली आहे. ही वाढ पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही विषयगटांत आहे. त्यामुळे इंजिनीअरिंग, फार्मसी, कृषी या अभ्यासक्रमांचा प्रवेशाचा कटऑफ यंदा चांगलाच वधारणार आहे. वरच्या श्रेणीतील काही विद्यार्थ्यांनी केंद्रीय किंवा अन्य शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा गुणांचा फुगवटा इतका जास्त आहे की, कटऑफ वधारलेला राहील. यंदा पीसीबीच्या २,९५,५७७ आणि पीसीएमच्या ३,७९,८०० अशा एकूण ६,७५,३७७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांच्या संख्येत लाखभर तरी वाढ झाली आहे. त्यात निकाल फुगल्यामुळे ठरावीक विषयांमध्ये प्रवेशासाठी मोठी चढाओढ पाहायला मिळेल. इंजिनीअरिंगच्या काही प्राचार्यांच्या मते मात्र वरच्या पर्सेटाईलमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने प्रवेशाच्या कट-ऑफवर फारसा परिणाम होणार नाही. कारण, कॉम्प्युटर सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी यांसारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश क्षमतेत झालेली मोठी वाढ. दुसरे म्हणजे प्लेसमेंटचे निराशाजनक रिपोर्ट. यामुळेही विद्यार्थी प्रत्यक्षात व्यावसायिक अभ्यासक्रमांना कितपत पसंती देतील, याबाबत प्राचार्य साशंक आहेत.  

उद्योग क्षेत्राच्या बदललेल्या गरजा पाहता काही जुन्या शाखांना महत्त्व येऊ शकते. उदाहरणार्थ, सेमी-कंडक्टर आणि चिप मेकिंग क्षेत्राची गरज पाहता व्हीएलएसआय डिझाईन तंत्रज्ञानाबरोबरच विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स या इंजिनीअरिंगच्या पारंपरिक शाखेला पसंती देण्याची शक्यता आहे. थोडक्यात, अशाही शाखांचा कटऑफ वाढू शकतो.

- सुरेश उकरंडे, प्राचार्य, के. जे. सोमय्या कॉलेज

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षणexamपरीक्षा