खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 06:32 IST2025-07-24T06:32:07+5:302025-07-24T06:32:22+5:30

सीईटी सेलने एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीएनवायएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी, बीपीओ या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणीला बुधवारी, दि. २३ जुलैपासून सुरुवात केली.

10% EWS quota now in private unaided medical colleges; MBBS admission schedule announced | खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

अमर शैला
लोकमत न्यूज नेटवर्क


मुंबई : खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून प्रवेश घेण्याचा खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. खासगी विनाअनुदानित कॉलेजांतील राज्य कोट्यातील एकूण जागांपैकी १० टक्के जागांवर ईडब्लूएस प्रवर्गातून कॉलेजांना प्रवेश द्यावे लागणार आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केलेल्या माहिती पुस्तिकेतून ही बाब समोर आली आहे. याचबरोबर महाराष्ट्र हे आरक्षण लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे, असे शिक्षणतज्ज्ञांनी सांगितले. त्यातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीएनवायएस, बीपीटीएच आदी वैद्यकीय शाखेच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी माहिती पुस्तिका व प्रवेशाचे वेळापत्रक बुधवारी जाहीर केले. सरकारी, सरकारी अनुदानित, पालिका, अल्पसंख्याक वगळता खासगी विनाअनुदानित वैद्यकीय कॉलेजांमध्ये हे आरक्षण असेल.

वैद्यकीय अभ्यासक्रमांची नोंदणी सुरू
सीईटी सेलने एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीएनवायएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी, बीपीओ या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणीला बुधवारी, दि. २३ जुलैपासून सुरुवात केली.  ३० जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे. त्यात एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ७ ऑगस्टला जाहीर केली जाईल.

एमबीबीएस, बीडीएस प्रवेशाचे वेळापत्रक
नोंदणी :   ३० जुलै
शुल्कासह नोंदणी :   ३१ जुलै
तात्पुरती गुणवत्तायादी :   २ ऑगस्ट
कॉलेजांचे पर्याय निवड :   ३ ते ५ ऑगस्ट
पहिली गुणवत्तायादी :   ७ ऑगस्ट
प्रवेश : ८ ते १२ ऑगस्ट

शेकडो विद्यार्थ्यांना दिलासा 
यापूर्वी सरकारी, सरकारी अनुदानित आणि पालिकेच्या वैद्यकीय कॉलेजांमध्येच हे आरक्षण लागू होते. मात्र, खासगी विनाअनुदानित वैद्यकीय कॉलेजांमध्येही हे आरक्षण नव्हते. आता हे आरक्षण लागू झाल्याने या प्रवर्गातून प्रवेश घेऊन इच्छिणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून शुल्कात सवलत मिळण्याचा त्यांचा मार्ग मोकळा होणार आहे.

Web Title: 10% EWS quota now in private unaided medical colleges; MBBS admission schedule announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.