...स्त्री तृष्णेचं घनदाट झाड आहे, तर पुरुष वासनेचा डोह!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 08:08 IST2026-04-04T08:03:52+5:302026-04-04T08:08:58+5:30
... म्हणूनच स्त्री-पुरुष एकमेकांच्या मनात घर करून राहतात. कधी 'ती' त्याच्या, तर कधी 'तो' तिच्या मनाच्या सीमा ओलांडून दोघे परस्परांना जाणून घेऊ पाहतात.

...स्त्री तृष्णेचं घनदाट झाड आहे, तर पुरुष वासनेचा डोह!
'झेन्ना' ही व्यक्तिरेखा नेमकी कोण आहे?
'ड्रोन्ना' हे एक स्त्री पात्र आहे. म्हटले तर रूपकही. ड्रोन्ना मुक्त, मनस्वी, आशावादी स्त्री आहे. स्वतःच्या अटींवर जगणारी, स्वतःच्या अस्तित्वासाठी सर्वस्व झुगारून देणारी बंडखोर, या पात्राच्या माध्यमातून मी 'तृष्णे'चा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
झेन्ना हे पात्र मला अनेक वर्षांपूर्वी सुचले होते. कदाचित माझ्या जाणिवेत-नेणीवेत ते कुठेतरी दडून होते; मात्र त्याचा अर्थ तेव्हा स्पष्ट नव्हता. एका अद्भुत, मोहमयी स्त्रीसाठी 'झेन्ना' हे संबोधन मला वेगळे वाटले आणि मी त्या शब्दाच्या मोहात पडलो. कुतूहलाने शोध घेतल्यावर कळले की 'झेोन्ना' हा ग्रीक भाषेतील स्त्रीलिंगी शब्द आहे: अरबीमध्ये त्याचा अर्थ 'सौंदर्य', तर हिब्रूमध्ये 'आनंद'. ड्रोन्नाला पक्ष्यांप्रमाणे मुक्तपणे गात जगायचे आहे: कुणी काय म्हणेल, याची तिला तमा नाही.
'झेन्ना' या संकल्पनेत प्रेम, वासना आणि अध्यात्म हे तिन्ही स्तर एकत्र येतात. या तिन्हींच्या परस्पर संबंधाबद्दल काय सांगाल?
झेन्ना ही संकल्पना नसून मी कल्पिलेलं स्त्रीचं रूप आहे, जे प्रत्येक स्त्रीच्या मनात दडलेलं असतं. या कवितांचा रचनाबंध कथेच्या अधिक जवळ जाणारा आहे. स्त्रीच्या अस्तित्वाला 'सर्पा' सारख्या वेढून असलेल्या दुःख, वेदना, ओढ, प्रेम आणि वासना यांचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे. हा शोध म्हणजे माझ्याच तृष्णेचा एक प्रवास आहे.
माझी आई म्हणायची, "पुरुषाला दुःख कधीच प्रिय वाटत नाही; जन्मापासून वाईलाच दुःख वेढून असतं आणि ते मरेपर्यंत तिच्यासोबत राहतं.... या दुःखाच्या मुळाशी तृष्णा खोलवर रुजलेली आहे आणि ती काही केल्या शमत नाही; उलट वाढतच राहते. माझ्या कवितेचा प्रवास पाहिला, तर 'पाण्यारण्य' मध्ये प्रकृती-पुरुष या रूपकातून तृष्णा-निवारणाचा शोध आहे; 'वामांगी'मध्ये स्त्रीदुःखाचा आर्त स्वर आहे; आणि 'झेन्नाच्या कविता 'मध्ये मनस्वी स्त्रीची तृष्णेतून मुक्त होण्याची धडपड आहे. हे तिन्ही संग्रह मिळून स्त्रीदुःखाची एक प्रकारची शोधत्रयी ठरतात. 'तृष्णा' हेच त्यातील समानसूत्र. ही तृष्णा शारीरिकही आहे आणि आधिभौतिकही.
तुमच्या कवितांत देह आणि आत्मा यांच्यातील संघर्ष ठळकपणे जाणवतो...?
- आपण जन्मतो तेव्हा आपल्याकडे देह असतो, तसंच मनही असतं. देहाला जशी भूक लागते, तशीच मनालाही लागते. देह आहे तोपर्यंत मनही असणारच. त्यामुळे हा देह-आत्म्याचा संघर्ष नसून, देह आणि मनाचा संघर्ष आहे, असं मला वाटतं. जोपर्यंत देह आणि मन आहे, तोपर्यंत तृष्णेतून सुटका अशक्य.
'मी म्हणजे अनादि अनंत...' यासारख्या ओळींमधून 'मी' आणि 'तू' यांचं सीमोल्लंघन दिसतं. व्यक्ती आणि नातं यांच्या सीमारेषा कशा पाहता?
'स्त्री' हे रूप अनादि अनंत मानलं जातं. ती आदिमाया आहे. ती 'तृष्णे'चे घनदाट झाड आहे, तर पुरुष 'वासने'चा डोह. स्त्रीशिवाय पुरुष अपूर्ण आणि पुरुषाशिवाय स्त्रीही. प्रकृती आणि पुरुष यांचं हे परस्परपूरक नातं आहे. म्हणूनच स्त्री-पुरुष एकमेकांच्या मनात घर करून राहतात. कधी 'ती' त्याच्या, तर 'तो' तिच्या मनाच्या सीमारेषा ओलांडून परस्परांना जाणून घेऊ पाहतात. कधी 'ती' त्याच्यासाठी 'पुष्कळा' बनते, तर 'तो' तिच्यासाठी 'पुष्कळ प्रियतम परपुरुष' होतो. या सीमारेषा पुसण्याचा प्रयत्न करणं, हे कवीचं कर्तव्यच आहे.
'संवाद' हा या कवितेचा विशेष दिसतो. तो कशामुळे?
झेन्ना कधी 'स्व'शी, तर कधी तिने निर्माण केलेल्या 'तू'शी संवाद साधते. हा संवाद अरेबियन नाईट्समधील कथनशैलीच्या जवळ जाणारा आहे. जणू झेन्नाला गोष्ट सांगण्याची शिक्षा मिळाली आहे - रात्र झाली की ती सांगत राहते; गोष्ट संपली, तर तिचा मृत्यू अटळ. म्हणून ती तिच्या आत साठवलेलं दुःख, वेदना, गुपितं सांगत राहते. तिला वाटतं, या दुकुखाने परिसीमा गाठली की त्यातून मुक्ती मिळेल. यात ती स्वतःशी संवाद साधते; कधी आतल्या पुरुषाशीही बोलते. तृष्णेचा व्यापक शोध घेण्यासाठी ही संवादशैली मला आवश्यक वाटली.
मुलाखत व शब्दांकन : दुर्गेश सोनार, सहायक संपादक, 'लोकमत'