शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

जगाचे लक्ष वेधणाऱ्या शै ल जा टी च र!

By वसंत भोसले | Published: May 16, 2020 10:51 PM

वुहानहून आलेला पहिला कोरोनाबाधित रुग्ण केरळमध्ये २४ जानेवारी रोजी आढळला. १५ मे रोजी ही संख्या केवळ ५६० आहे. त्यापैकी केवळ चार जणांचाच मृत्यू झाला आहे. देशातील अठ्ठावीस राज्ये आणि दहा केंद्रशासित प्रदेशामध्ये ही सर्वांत कमी संख्या आहे. याचे सर्व श्रेय के. के. शैलजा ऊर्फ शैलजा टीचर यांना जाते. जागतिक आरोग्य संघटनेची मार्गदर्शक तत्त्वे अमलात आणून त्यांनी हे साध्य केले आहे.

ठळक मुद्देशैलजा टीचर यांना भविष्याचीदेखील काळजी आहे. १७ मे रोजी लॉकडाऊन उठविलाच तर आखातातून मोठ्या प्रमाणात मल्याळी माणूस केरळमध्ये पतरणार आहे. त्यांना क्वारंटाईन करण्याची तयारी त्यांनी केली आहे.संपूर्ण भारत देशाने हा पॅटर्न म्हणून स्वीकार करायला हवा होता.

- वसंत भोसले

कोरोना विरुद्धची लढाई लोकसहभाग, लोकसाक्षरता, गाव तेथे प्राथमिक आरोग्य केंद्र, उच्च प्रतिची उपकरणे, आदी कारणांनी लढता आली. ही लढाई अद्याप संपलेली नाही. त्यासाठी तीन-चार महिने सतर्क राहावे लागेल.’’असा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा आहेत. कोरोनाचा धोका त्यांना २० जानेवारी रोजी समजला. आरोग्य खात्यातील वरिष्ठ डॉक्टरांना फोन करून चीनमधील वुहानचा हा विषाणू आपल्याला धोकादायक ठरू शकेल का? २४ जानेवारीलाच वुहानहून आलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकाची तब्येत खराब झाली होती. विमानतळावरून त्याला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले. केरळचे अनेक विद्यार्थी वुहानमध्ये शिक्षण घेतात. तेथून परतणाऱ्यांची कसून तपासणी करून थेट रुग्णालयात रवानगी करण्यात आली. केरळमध्ये चार आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत. त्या ठिकाणी एका दिवसात नियंत्रण कक्ष उभा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शिवाय इतर विमानतळांवर येणाºया देशांतर्गत आणि परदेशी प्रवाशांची तपासणीच सुरू करण्यात आली. त्यांना थेट रुग्णालयातच दाखल करण्यात येऊ लागले. शहरात सार्वजनिक रुग्णालये आहेत. शिवाय शंभर टक्के साक्षर असलेल्या केरळ राज्यात ‘गाव तेथे प्राथमिक आरोग्य केंद्र’ आहे. तालुक्याला रुग्णालये आहेत.राज्यातील चौदाही जिल्ह्यांत कोविड रुग्णालये उभी करण्यात येऊ लागली. परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाºयांचे प्रशिक्षण चालू करण्यात आले. व्हेंटिलेटर, मास्क, पीपीई किटस्, औषधे प्रत्येक गावात पोहोचली. आखातातून मल्याळी माणूस परतू लागला तशी गावोगावी घबराट वाढू लागली. लॉकडाऊन २४ मार्च रोजी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वीच आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक रोखण्यात आली. कोरोना येऊ द्या, आपण लढण्यास तयार आहोत, अशी तयारी करण्यात आरोग्यमंत्री के. के. शैलजा गुंतल्या होत्या. शेजारची राज्ये तमिळनाडू, कर्नाटकाशी चर्चा करून त्यांनी राज्याच्या सीमेवर तपासणी केंद्रे उभारली गेली. देवभूमी म्हणून ज्या केरळचा उल्लेख केला जातो. त्या राज्यात येणाºया प्रत्येकाची कसून तपासणी सुरू करण्यात आली. दरम्यान, गावोगावी निर्माण झालेली घबराट घालविण्यासाठी के. के. शैलजा यांनी राज्यव्यापी दौरा सुरू केला. गावोगावी सभा घेत सुरक्षित अंतर ठेवले. थोडी काळजी घेतली तर कोरोनाशी लढाई करता येते, असे त्यांनी सांगितले. हजारो पत्रके मातृभाषेत छापून प्रत्येक गावात वाटण्यात आली.

एक लाख सत्तर हजार लोकांना क्वारंटाईन करून टाकण्यात आले. त्यांना मदतीसाठी परिचारिका, आरोग्य स्वयंसेवक आणि डॉक्टरांची टीम देण्यात आली. प्रत्येक व्यक्तीला ताजे बनविलेले जेवण तीनवेळा देण्यात येत होते. परिणाम असा झाला की, २४ जानेवारी रोजी वुहानहून आलेला पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. १५ मे रोजी ही संख्या केवळ ५६० झाली आहे आणि त्यापैकी केवळ चार जणांचाच मृत्यू झाला आहे. देशातील अठ्ठावीस राज्ये आणि दहा केंद्रशासित प्रदेशामध्ये ही सर्वांत कमी संख्या आहे. याचे सर्व श्रेय के. के. शैलजा ऊर्फ शैलजा टीचर यांना जाते.

जागतिक आरोग्य संघटनेने चार मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. त्यात म्हटले आहे की, शोध घेणे, तपासणी, विलगीकरण करणे आणि उपचारांसाठी मदत करणे ही चारही मार्गदर्शक तत्त्वे अंगीकारण्याचा कार्यक्रमच शैलजा यांनी राबविण्यासाठी सुरुवात केली. त्यासाठी स्वत: शिक्षिका असलेल्या शैलजा यांनी राज्यातील सर्व शिक्षिकांची मदत घेतली. त्यांना प्रशिक्षण देऊन प्रत्येक गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेमण्यात आले. या सर्वांच्या मदतीने क्वारंटाईन केलेल्या रुग्णांना सहा आठवडे उपचार करून घरी जाऊ देण्यात आले. ही मोहीम प्रचंड यशस्वी झाली. ती राबविण्याची संकल्पना के. के. शैलजा यांची आहे. आज या यशस्वी लढ्याचे जगभरातून कौतुक होत आहे. शैलजा यांच्या मुलाखती घ्यायला अनेक नामवंत प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी येऊ लागले आहेत.

के. के. शैलजा यांनी २०१८ मध्ये आलेल्या निपाह विषाणूचाही यशस्वी सामना केला होता. कोण आहेत या आरोग्यमंत्री? केरळमध्ये सध्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली डाव्या आघाडीचे सरकार आहे. पिनाराई विजयन मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात दोनच महिला मंत्री आहेत. त्यापैकी के. के. शैलजा ऊर्फ शैलजा टीचर या एक आहेत. त्रेसष्ट वर्षीय शैलजा या माध्यमिक विद्यालयात शिक्षिका होत्या. विज्ञान हा त्यांचा विषय आहे. बी.एस्सी.,बी.एड. झालेल्या शैलजा या विद्यार्थिदशेपासूनच डाव्या चळवळीशी संबंधित आहेत. स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया या विद्यार्थी संघटनेत काम करीत होत्या. पुढे महिला फेडरेशनचे काम करू लागल्या. काही वर्षे शिक्षिकेची नोकरी केल्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन पूर्णवेळ राजकारणात झोकून देण्याचा निर्णय घेतला. विद्यालयात विज्ञान शिकविताना त्यांना ‘शैलजा टीचर’ म्हटले जात होते. तेच नाव संपूर्ण केरळ राज्यात रूढ झाले. आज त्या एका पुढारलेल्या, सुशिक्षित राज्याच्या आरोग्य, सामाजिक न्याय, महिला आणि बालकल्याण या तीन खात्यांच्या मंत्री आहेत. त्यांचे मूळ गाव कन्नूर जिल्ह्यातील कुथुपरांम्बा आहे.

याच मतदारसंघाचे त्या प्रतिनिधित्व करतात. १९९६ मध्ये प्रथम त्या पेरावूर मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. २०११ मध्ये त्यांचा पराभव झाला. मतदारसंघाच्या पुनर्रचनेत हा मतदारसंघच गेला. २० नोव्हेंबर १९५६ रोजी जन्मलेल्या शैलजा या २०१६ मध्ये कुथुपरांम्बा मतदारसंघातून निवडून आल्या. त्यांच्या कामाची पद्धतही लोकसहभागाची आहे. केरळ हे राज्य संपूर्ण साक्षर आहे. नागरिकांचे आयुष्यमान सर्वाधिक आहे आणि बालमृत्यूचे प्रमाण सर्वांत कमी आहे. राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील राज्य आहे. प्रचंड राजकीय संघर्ष असतो. गेली सत्तर वर्षे या राज्यात डाव्या लोकशाही आघाडीचे किंवा संयुक्त लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर असते. डाव्या आघाडीचे नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करतो, तर संयुक्त आघाडीचे नेतृत्व काँग्रेसकडे असते. जनता दल, जनता पक्ष, समाजवादी, जनसंघ किंवा भाजप यांना या राज्यात कधीच अपेक्षित यश मिळाले नाही. सत्तर वर्षांत भाजपचा एक आमदार एकदाच आणि एक खासदार एकदाच निवडून आला आहे. हिंदू, मुस्लिम आणिख्रिश्चन या समूहांचे प्राबल्य आहे. राजकीय जागृती खूप आहे. संवेदनशील आहे. या सर्वांचा शैलजा यांनी लाभ करून घेतला. कोरोनाविरुद्ध एक चळवळच त्यांनी उभारली. वास्तविक, अमेरिका, इंग्लंड, स्पेन, इटली, आदी देशांशी तुलना केली, तर केरळ राज्य आर्थिकदृष्ट्या कमकुवतच म्हटले पाहिजे.

इंग्लंडची लोकसंख्या सात कोटी आहे. केरळची तीन कोटी तीस लाख आहे. केरळचे दरडोई उत्पन्न दोन लाख वीस हजार, तर इंग्लंडचे २४ लाख ८२ हजार आहे. बारा पटीने जास्त आहे. तरीही तेथे दोन लाख ३३ हजार लोक बाधित आणि ३३ हजार ६१० जण मृत्युमुखी पडले आहेत. केरळशी याची तुलनाच होऊ शकत नाही. जागतिक आरोग्य संघटनेची मार्गदर्शक तत्त्वे अमलात आणणे इंग्लंडलाही शक्य झालेले नाही. केरळ राज्याने हे करून दाखविले आहे. त्यामुळेच केरळचा आणि शैलजा टीचर यांचा डंका जगभरात वाजला आहे. एक सामान्य पण राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या जागृत असणा-या कार्यकर्त्या आरोग्यमंत्र्यांनी हे करून दाखविले आहे. संपूर्ण भारत देशाने हा पॅटर्न म्हणून स्वीकार करायला हवा होता. परदेशांतून आलेल्या सर्व प्रवाशांना क्वारंटाईन करून सहा आठवडे रुग्णालयात दाखल करायला हवे होते. केरळने एक लाख वीस हजार लोकांना राज्यभरात क्वारंटाईन करून ठेवले होते. संपूर्ण देशाला परदेशातून आलेल्या वीस लाख लोकांना क्वारंटाईन करणे अशक्य नव्हते. शिवाय आरोग्याच्या सुविधा, साधने, रुग्णालये उपलब्ध करून देता आली असती. प्रसंगी लष्कराचा वापर करता आला असता. खासगी विमानसेवेचा वापर करता आला असता. जेणेकरून लॉकडाऊन लागू करण्याची गरज भासली नसती. देशाचे आर्थिक वाटोळे झाले नसते. कोट्यवधी लोकांच्या नोकºया गेल्या नसत्या. शहरातील असंघटित कामगारांपैकी ८१ टक्के लोकांच्या नोकºया गेल्या आहेत. पगारी कर्मचाºयांपैकी ५६ टक्के लोकांना नोकरीला मुकावे लागले आहे. हे रोजगार पुन्हा कधी निर्माण होतील, याची शाश्वती नाही. कोट्यवधी असंघटित आणि स्थलांतरित मजूर चालत निघाले.

अनेकजण रस्त्यात थकून मेले, काही अपघातात ठार झाले. काही महिला रस्त्याच्या कडेला बाळंत झाल्या. सात महिन्यांची गरोदर महिला शंभर-शंभर किलोमीटर चालत होती. संपूर्ण देशाला शरम वाटावी अशा घटना घडत आहेत. आज सरकारला वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करावे लागत आहे. जेणेकरून या सर्वांचा विकासकामांवर मोठा परिणाम होणार आहे. रस्ते मोकळे, रेल्वे गाड्या थांबल्या, विमानांची उड्डाणे रोखली, उद्योगाचे चक्र थांबले, सरकारचा महसूल गोळा होईना, असा संपूर्ण संसाराचा गाडाच रोखला गेला. एवढेच नव्हे, तर देवदेवतांनाही बंद करून ठेवावे लागले. कोट्यवधी विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले. हजारो परीक्षा रखडल्या. नव्या नोक-या निघणार नाहीत. हा सर्व घोळ एका लॉकडाऊनने झाला. परदेशांतून आलेला हा विषाणू रोखण्याचे कामविमानतळावरच झाले असते तर आपण थोडा बहुत आलेल्या कोरोनासह जगलो असतो. एचआयव्ही/एड्ससह जगतोच आहोत. बीपीसह जगतो, मलेरिया, हगवण, आदी संसर्गासोबत जगतोच आहोत.

शैलजा टीचर यांना भविष्याचीदेखील काळजी आहे. १७ मे रोजी लॉकडाऊन उठविलाच तर आखातातून मोठ्या प्रमाणात मल्याळी माणूस केरळमध्ये पतरणार आहे. त्यांना क्वारंटाईन करण्याची तयारी त्यांनी केली आहे. यासाठी ए, बी, सी, असे तीन प्लॅन तयार केले आहेत. त्यासाठी राज्यातील दहा वैद्यकीय महाविद्यालये, अनेक शाळा, वसतिगृहे, धर्मशाळा ताब्यात घेऊन ठेवल्या आहेत. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले आहे. साधनसामुग्री आणून ठेवली आहे. परदेशातून किंवा परराज्यांतून येणाऱ्यांना थेट रुग्णालयात आणि तेथेच सहा आठवडे तीनवेळा जेवून खाऊन राहावे, हीच शैलजा टीचर यांची शिकवण आहे. सलाम त्या शैलजा टीचर यांना!

न्यूयॉर्कची आघाडी

  • केरळची लोकसंख्या ३ कोटी ३० लाख आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराची लोकसंख्या १ कोटी ९० लाख आहे. केरळचे दरडोई उत्पन्न रुपये २ लाख २० हजार २७५,तर न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्यांचे दरडोई उत्पन्न ६६ लाख ७३ हजार ५७५ रुपये आहे. एक हजार लोकसंख्येमागे १.८ बेडस् केरळमध्ये, तर न्यूयॉर्कमध्ये ३.१ बेडस् आहेत. डॉक्टरांची संख्याही तिप्पट आहे. न्यूयॉर्क शहरात तीन लाख चार हजार लोक कोरोनाबाधित आणि २७ हजार जणांचा मृत्यू ओढविला आहे. याउलट केरळमध्ये केवळ ५६० बाधित आणि चौघांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी अचंबित करते.

केरळ राज्यात कोरोनाविरुद्ध अत्यंत प्रभावी यंत्रणा राबविणाऱ्या राज्याच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा ऊर्फ शैलजा टीचर!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKeralaकेरळMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारत