शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

राजकीय चिखलात रयत क्रांती, मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर बसून शेतक-यांच्या घामाला दाम देणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 1:50 AM

शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी ‘भीक नको, हवे घामाचे दाम’, अशी घोषणा देत राजकीय पक्षांवर घणाघात केला. प्रसंगी त्यांना गिधाडांची उपमा दिली. राजकारण्यांच्या राजकीय डावपेचात शेतक-यांना वापरून घेतले जाते.

वसंत भोसले।शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी ‘भीक नको, हवे घामाचे दाम’, अशी घोषणा देत राजकीय पक्षांवर घणाघात केला. प्रसंगी त्यांना गिधाडांची उपमा दिली. राजकारण्यांच्या राजकीय डावपेचात शेतक-यांना वापरून घेतले जाते. त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. तो द्यायचाच नाही, अशा प्रकारचे आर्थिक धोरणच शेती-शेतक-यांच्या उन्नतीला मारक आहे, अशी भूमिका ते मांडत राहिले. देशातील शेतकरी चळवळीला एक नवा आयाम त्यांनी मिळवून दिला. मात्र, कालांतराने त्यांनी या भूमिकेत बदल केला. शेतावर राबणारा शेतकरी हा नेहमीच राजकारणाच्या सावलीत राहणे पसंत करतो, त्याला गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणाची सवय झाली आहे. शिवाय राजकीय व्यवस्थेला धक्का दिल्याशिवाय शेतक-यांचे प्रश्न ऐरणीवर येणार नाहीत, त्यामुळे देशाच्या राजकारणाला गवसणी घालणाºया आणि पर्यायाने देशाची वर्षानुवर्षांची आर्थिक रचना ठरविणाºया कॉँग्रेसला पराभूत केले पाहिजे, या विचाराने ते असंख्य विरोधी पक्षांची मदत घेत भाजपच्या वळचणीला जाऊन बसले.मते मागायला आलो तर जोड्याने मारा, अशी आश्वासक भाषा बोलून राजकारणाचा तिटकारा व्यक्त करताना त्यांनी घेतलेले राजकीय वळण सर्वांना आश्चर्यचकित करून गेले होते. तेव्हा राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी कडाडून विरोध करीत राजकारणातील गिधाडांची पिलावळ राजहंस कधी झाली, असा सवाल उपस्थित केला होता. शेतकºयांचा स्वाभिमान जागृत करून राजकारण्यांपासून दूर राहून शेतकरी चळवळ चालविण्याची प्रतिज्ञा केली होती. त्यांना पाठिंबा आणि यशही मिळत गेले. शेतकरी चळवळ विरोधकांना धडा शिकविण्याचा भाग म्हणून निवडणुकाही लढवायला त्यांनी सुरुवात केली. राजू शेट्टी आमदार आणि खासदारही झाले. सदाभाऊ खोत यांनाही त्याचा मोह झाला. त्यांना आता राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली. या राजकीय पदांनी त्यांना राजकारण्यांच्या सवयी लागल्या. त्यातून संघटना फुटली. आता सदाभाऊ खोत यांनी शेतकºयांच्या नावाने रयत क्रांती संघटना स्थापन करण्याची घोषणा घटस्थापनेच्या मुहूर्तावर केली. शरद जोशी, वामनराव चटप, अनिल गोटे, सरोज काशीकर यांच्यापासून ते राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, रघुनाथदादा पाटील, पाशा पटेल आदी सर्वांना आपले राजकीय घट बसविण्याची घाई झालेली दिसते. शरद जोशी यांची राजकीय लढाई ही शेतकरी चळवळीचा भाग म्हणून हत्यारासारखी वापरण्याची युक्ती आता मागे पडली आणि सदाभाऊंच्या भाषेत दुकानदारी झाली आहे. त्याला ते आता क्रांती म्हणू लागले आहेत. राजकीय लाभासाठी हपापलेली ही मंडळी राजकारणाच्या चिखलात उतरून रयतेसाठी क्रांती कसली करणार? काँग्रेसच्या शेती-शेतकरी धोरणाला विरोध करताना भाजपची शेतीविषयीची धोरणे कशी क्रांतिकारी आहेत आणि त्यातून शेतकºयांच्या घामाला दाम कसे मिळणार, हे तरी त्यांनी एकदा स्पष्ट करावे. अन्यथा क्रांतीची भाषा करीत राजकारण्यांसारखी शेतकºयांच्या फसवाफसवीची वजाबाकीच होणार आहे. त्यामुळे आणखीन एका दुकानदारीची सुरुवात झाली म्हणायचे का? एवढाच या शेतकरी चळवळीचा प्रवास म्हणून नोंदवावा का?