शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

मध्य पूर्वेतला सत्ता तोल बदलणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 06:54 IST

Middle East News : तेलाच्या बाबतीत आम्ही स्वयंपूर्ण आहोत, असं अमेरिका म्हणतं. अमेरिकेला जर मध्य पूर्वेतलं तेल नको असेल तर कदाचित अमेरिका आता तिथे गुंतणार नाही.

मोहसीन फखरीजादेह यांचा २७ नोव्हेंबरला खून झाला. ते इराणच्या अणुकार्यक्रमातले महत्त्वाचे वैज्ञानिक होते. आतापर्यंत इराणच्या किमान सहा  अणुवैज्ञानिकांचे खून झाले आहेत. इराणचं म्हणणं की हा खून इस्रायलनं केलाय. इराण पुरावे देत नाही. इस्रायल हा खून आपण केलाय असं म्हणत नाही आणि आपण खून केलेला नाही, असंही म्हणत नाही.दोन वर्षांपूर्वी इराणचे जनरल सोलेमानी यांचा खून बगदाद विमानतळाजवळ करण्यात आला. सोलेमानी यांच्या हालचालीवर अमेरिकन हेर खातं लक्ष ठेवून होतं, योग्य जागा साधून त्यांचा खून करण्यात आला; पण या खुनाची जबाबदारी  खुद्द प्रे. ट्रम्प यांनीच स्वीकारली. त्यांनीच त्या खुनाचा रीतसर आदेशच दिला होता.गेले काही दिवस नेटफ्लिक्सवर फौदा नावाची मालिका चालली आहे. इस्रायलचे एजंट कसे पॅलेस्टाइनमध्ये घुसून तिथल्या लोकांचे खून करतात ते त्या मालिकेत दिसतं. इस्रायलचे गनीम किती बारकाईनं नियोजन करतात आणि किती धाडसानं शत्रूचा गुप्तपणे काटा काढतात, असं या मालिकेत दाखवलंय. इस्रायलचे गुप्तहेर, मोसाद यांच्याभोवती एक गूढतेचं वलय उभारण्यात आलंय. जेम्स बाँड, शेरलॉक होम्स, धनंजय इत्यादी साहित्यातली पात्रं एकत्र करून त्याला पाच पन्नासनं गुणलं तर त्यातून मोसाद तयार होते, असं वातावरण आहे. त्यामुळंच इस्त्रायली हेर वगैरेंच्या कथांमध्ये एक थरार असतो.फखरीजादेह यांचा खून त्याच थरारपटासारखा आहे. फखरीजादेह कार चालवत जात होते, त्यांच्या बाजूला त्यांची पत्नी होती. हमरस्त्यावर एकेठिकाणी त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, ते जागच्या जागी गेले, पत्नी मात्र जखमी झाल्या नाहीत.अशा कारवाया अलीकडं अनेक चित्रपटांतून पाहायला मिळतात. स्नायपर नेमबाजांच्या बंदुकीला दुर्बीण असते. या दुर्बिणीतून मैलभर अंतरावर असलेल्या  माणसाच्या बुबुळात बाहेरून प्रतिबिंबित झालेला एकादा कणही नेमबाजाला दिसतो. आणि या नेमबाजाला त्याचं लक्ष्य बरोब्बर हेरायला सॅटेलाइटवरून निरीक्षण करणारी यंत्रणा मदत करते. हे मारझोड तंत्रज्ञान आता तसं जुनंच आहे, त्यात खरं म्हणजे थरारण्यासारखं काही नाही. इराक, सीरिया, अफगाणिस्तान इत्यादी ठिकाणी ते तंत्रज्ञान सर्रास वापरलं जातं, पैसे खर्च केले तर ते कोणालाही मिळतं. माणसं मारण्यासाठी लागणारी माणसंही आता कंत्राटावर मिळतात, त्यासाठी देशभक्त वगैरेंची फौजही गोळा करावी लागत नाही. भारतातही उत्तरप्रदेश, बिहारमध्ये पाच-दहा हजार रुपयांना एक माणूस अशा रीतीनं कंत्राट देणारी घेणारी माणसं आहेत. इराणमध्ये जाऊन तिथं घातपात करण्यात इस्रायलबरोबरच सौदी अरेबिया इत्यादी देशांनाही स्वारस्य आहे. त्यांचेही एजंट इराणमध्ये घिरट्या घालत असतात. इराणमध्ये एक स्वदेशी घातपाती संघटना आहे. ही संघटना सध्याच्या सरकारच्या विरोधात आहे. ही संघटना सौदी, इस्त्रायल हे देश पोसतात. त्या संघटनेनंही ही घटना घडवून आणली असेल. इराणनं आपण या खुनाचा पुरेपूर बदला घेऊ, असं सांगितलं; पण अजून तरी बदला घेतलेला दिसत नाही. इराण नाना प्रकारे घातपाती उद्योग स्वतंत्रपणे करत असतं. सीरियात आणि लेबनॉनमध्ये त्यांच्या हाती हेझबुल्लासारख्या संघटना आहेत. या संघटना इराणी पैसा आणि शस्त्रांवर चालतात आणि सर्रास घातपाती उद्योग करत असतात. गेल्या वर्षी इराणनं सौदी अरेबियातल्या अबकैक तेल विहिरीवर हल्ला केला होता. क्षेपणास्त्रं टाकली. २० ड्रोन त्यासाठी वापरण्यात आले. ड्रोन आणि क्षेपणास्त्रं इतक्या कमी उंचीवरून फिरली की रडारवर ती दिसू शकली नाहीत. दहा वर्षांपूर्वी इराणकडं अचूक मारा करण्याची यंत्रणा नव्हती. वीस क्षेपणास्त्रं फेकली तर त्यातलं एकादंच लक्ष्यावर पोचत असे. आता सॅटेलाइट निरीक्षण व्यवस्थेमुळं क्षेपणास्त्रांचा अचूक मारा इराण करू शकतं. मुद्दा असा की, आता तंत्रज्ञान ही कोणाची मिरासदारी राहिलेली नाही. एक तर ते बाजारात कुठंही मिळतं. समजा बाजारात मिळत नसलं तरी आताचे हुशार इंजिनिअर ते तंत्रज्ञान विकसित करू शकतात. इंजिनिअर मंडळी अमेरिका, युरोप, चीन इत्यादी ठिकाणी जाऊन शिकतात आणि नंतर देशी तंत्रज्ञान तयार करतात. एकेकाळी तंत्रज्ञानावर अमेरिकेची मिरासदारी होती. आता चीननं आघाडी घेतली आहे. नुकतंच चीनचं एक अंतराळयान चंद्रावर पोचलं आहे. अमेरिकेनं कोंडी केली असूनही शेवटी इराणनं पाकिस्तानच्या वाटेनं चिनी अणुतंत्र मिळवलं आणि त्या आधारावरच इराणचा अणुकार्यक्रम चालला आहे. अणुशास्त्रज्ञ मारले की, इराणचा अणुकार्यक्रम थांबवता येईल, इंधन परिष्कृत करून त्याचा दर्जा अणुबाॅम्ब तयार करता येईल, इतका वाढवण्याचा प्रयत्न इराण करेल अशी भीती जगाला, अमेरिकेला आहे. इराण म्हणतंय की, आपला अणुकार्यक्रम शांततामय उपयोगासाठी आहे; परंतु अमेरिका आणि युरोपीय देशांचा इराणवर विश्वास नाही. इस्रायल अणुबाॅम्बसज्ज असताना आपणही अणुबाॅम्बसज्ज झालं पाहिजे, असा इराणचा इरादा आहे; पण कोणाजवळ अणुबाॅम्ब आहे हा मुद्दा महत्त्वाचा नाही. कारण कोणीही तो बॉम्ब वापरू शकणार नाही, वापरला तर तो सारा विभाग नष्ट होईल. मध्य पूर्वेवरचं वर्चस्व हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सौदीच्या नेतृत्वाखालचा अरब सुन्नी गट आणि इराणी नेतृत्वाखालचा शिया गट अशी स्पर्धा मध्य पूर्वेत आहे. एकेकाळी अमेरिका सौदी गटाबरोबर होतं. ओबामांनी इराणबरोबर करार करून सौदी गटाला शह दिला होता. ट्रम्प यांनी ओबामांचं धोरण फिरवलं, इराणबरोबरचा करार मोडला आणि सौदीला मदत देऊ केली.  अगदी परवा परवा इस्त्रायल, सौदी, अरब अमिराती आणि बहरीन यांच्यात संबंध प्रस्थापित केले. ट्रम्प यांच्याकडं धोरण नव्हतं, त्यांची लहर हेच धोरण असे; पण या लहरीच्या नादात त्यांनी सांगून टाकलं होतं की, अमेरिका मध्य पूर्वेतल्या तेलावर अवलंबून नाही, तेलाच्या बाबतीत अमेरिका स्वयंपूर्ण आहे. आता जर अमेरिकेला मध्य पूर्वेतलं तेल नको असेल तर कदाचित अमेरिका आता मध्य पूर्वेत पूर्वीइतकं गुंतणार नाही.जो बायडन यांची मोठीच पंचाईत आहे. इराणवरचे निर्बंध कमी करून पुन्हा तोल बदलणार की, सध्या निर्माण झालेला तोल तसाच टिकवणार? बायडन काय करतात ते पाहायचं..

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयUnited Statesअमेरिकाsaudi arabiaसौदी अरेबियाIranइराणIsraelइस्रायल