इतना सन्नाटा क्यों है भाई?

By राजा माने | Published: April 16, 2019 04:44 AM2019-04-16T04:44:45+5:302019-04-16T04:47:17+5:30

अभाअपा संघटनेच्या मागणीचा इंद्रदेवांना आदर करावाच लागला, परलोकी ही संघटना तशी पॉवरबाजच!

Why so silent brother? | इतना सन्नाटा क्यों है भाई?

इतना सन्नाटा क्यों है भाई?

Next

- राजा माने
अभाअपा संघटनेच्या मागणीचा इंद्रदेवांना आदर करावाच लागला, परलोकी ही संघटना तशी पॉवरबाजच! अभाअपा (अर्थात, अखिल भारतीय अजरामर पात्र संघटना) संघटनेचे सदस्यत्व केवळ कला क्षेत्रातील अजरामर पात्रांनाच मिळाले. परलोकीच्या या संघटनेने परग्रहावरील आमीर खान-राजू हिराणीच्या पीकेलासुद्धा संघटनेचे सदस्यत्व नाकारले होते. अशा संघटनेच्या सदस्यांनी भारतभूमीतील निवडणूक दिवाळसणाची पाहणी करण्यास जाण्याची मागणी मान्य होऊ नये, यासाठी नरदांनी भरपूर गेमा केल्या, काड्या केल्या, पण काहीच उपयोग झाला नाही. उलट इंद्रदेवांनी अभाअपाची मागणी मान्य केली, पण सोबत गाइड म्हणून झेलेअण्णांना नेण्याचा जीआर काढला आणि अनंत माने यांच्या एक गाव बारा भानगडी, रामदार फुटाणे नानांच्या सामनामुळे झेलेअण्णांचा प्रोफाइल स्ट्राँग होताच, पण बाई वाड्यावर या... या डायलॉगमुळे झेलेअण्णाचा बायोडाटा उठून दिसला अन् इंद्रदेवांनी त्यांना नमो-रागा रण निरीक्षण मंडळाचे गाइड बनविले.
मंडळाचे पहिले निरीक्षक ए.के. हंगल ‘शोले’चे इमाम साहेब व झेलेअण्णा मराठीभूमीत दाखल झाले. इमाम साहेब ठार आंधळेच असल्यामुळे त्यांच्या हातातील काठीचे टोक झेलेअण्णांच्या डाव्या हातात होते. अण्णा पुढे आणि इमाम साहेब काठी धरून मागे... मुंबापुरीसह खान्देशाची रपेट सुरू होती. डाव्या हातात काठीचे टोक आणि उजव्या हातात गळ्यात अडकविलेले मोबाइल घेऊन अण्णा इमाम साहेबांना खडान्खडा माहिती देत होते, ऐकवत होते. दिवसभर हा सिलसिला चालूच राहिला. इमाम साहेब मात्र गप्पच होते. त्यांच्या तोंडातून चकार शब्द निघत नव्हता... अखेर वैतागून अण्णाच बोलले, ‘काय राव इमाम साहेब कुछ तो बोलो!’ त्यावर इमाम साहेब बोलते झाले, ‘भाई झेलेअण्णा, इतना सन्नाटा क्यों है भाई...’ हे शब्द कानावर पडताच अण्णा चक्क खेकसलेच ! सन्नाटा? इतना गोंधळ सुनाया अन् तुम बोलताय सन्नाटा! जळगावला वो कमलवालों का मारामारी, सुनाया, गिरीशभाऊ का अ‍ॅक्शन रोल बताया.


उदनयराजेंने निकाले हुए चित्र-विचित्र आवाज सुनाया, वो आझम खान का जयाप्रदा को बोला हुआ अनाब-शनाब बात सुनाया, शायर रामदासजीने रिपब्लिकन ऐक्य के वास्ते मंत्रिपद छोडने का किया हुआ वादा भी सुनाया... फिर भी ऐसे गोंधळ में तुम पूछताय, ‘सन्नाटा क्यों है भाई...’

हा संवाद सुरू असतानाच झेलेअण्णांना एक पक्ष कार्यालय दिसले. काही महिला कार्यकर्त्या कार्यालयातून बाहेर पडत होत्या. त्यांच्याशी संवाद साधावा, म्हणून अण्णांनी त्यांना थांबविले. सवयीप्रमाणे ते बोलते झाले, ‘बाई व्वा...’ (पुढचे शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडणार तोच, आता इमाम साहेबांनीच झेलेअण्णांच्या तोंडावर आपला हात दाबून धरला अन् अनर्थ टळला). त्या दोघांना पाहून महिला कार्यकर्त्यांनी नमस्कार केला. काय मदत हवी काय, अशी विचारपूस केली. महिलेचा आवाज कानावर पडताच इमाम साहेब बोलते झाले... कौन बसंती? वो अहमद को समझाती क्यों नही... (आता मात्र झेलअण्णांचा हात इमाम साहेबांचा तोंडावर गेला आणि पुढचा डायलॉग तिथेच थांबला) अखेर अण्णांनी इमाम साहेबांना सन्मानपूर्वक परलोकी धाडले. निरोप घेताना, ते एवढेच म्हणाले, ... आयला इमामसाब, आता रिपोर्ट में सन्नाटा क्यों है भाई , असं मत लिखो..

Web Title: Why so silent brother?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.