हिंदुत्वाची घाई कशाला?
By Admin | Updated: November 25, 2014 00:09 IST2014-11-25T00:09:48+5:302014-11-25T00:09:48+5:30
मोदींच्या सहा महिन्यांच्या राजवटीत भगव्या परिवाराचा हिंदुत्वाचा अजेंडा हळूहळू फणा काढू लागला आहे.

हिंदुत्वाची घाई कशाला?
मोदींच्या सहा महिन्यांच्या राजवटीत भगव्या परिवाराचा हिंदुत्वाचा अजेंडा हळूहळू फणा काढू लागला आहे. आता चांगल्या कारभाराची भाषा ऐकू येईल, अशी अपेक्षा असताना वर्ल्ड हिंदू काँग्रेसच्या उद्घाटनाच्या समारंभात अशोक सिंघल यांनी हिंदुत्वाचा बॉम्ब टाकला.
महिना अखेर्पयत विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल किंवा प्रवीण तोगडिया यांच्यासारख्यांची वक्तव्ये भगव्या धर्मवेडय़ांचा गोंगाट मानली जायची. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर कट्टर हिंदुत्ववादी मागे पडतील आणि चोख राज्य कारभार देण्यासाठी मोदी आपल्या पक्षाला नव्याने तयार करतील, असे बोलले जात होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या भाषणांमध्ये वीर सावरकरांच्या हिंदुत्वाचा सूर एक वेळ उमटलाही. पण सामान्य माणसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. काँग्रेस मजबुतीने उभा राहायला तयार नव्हता. जनतेपुढे दोनच पर्याय होते. भारतीय जनता पक्षाला निवडायचे किंवा अराजकाला सामोरे जायचे. सध्या तरी मोदींनी राज्य कारभारावर आपले सारे लक्ष केंद्रित केले आहे, यात वाद नाही. निवडून आलेल्या सरकारकडून हीच अपेक्षा असते. राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र व्यवहारापासून अर्थव्यवस्था, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या विषयातील उणिवा शोधून त्या दूर करायच्या असतात. मोदींचा काम करण्याचा उत्साह दांडगा आहे. त्यांची काम करण्याची शक्ती तगडी आहे. त्याबद्दल कुणी नाव ठेवू शकत नाही. ते स्वत:च्या मनाने चालतात, हे आणखी एक विशेष आणि म्हणूनच एक गोष्ट खटकते. मोदींच्या सहा महिन्यांच्या राजवटीत भगव्या परिवाराचा हिंदुत्वाचा अजेंडा हळूहळू फणा काढू लागला आहे. हिंदुत्वाची एक लॉबी आहे. हिंदुत्ववाद्यांचे दिवस संपले. आता चांगल्या कारभाराची भाषा ऐकू येईल, अशी अपेक्षा असताना परवा आक्रित घडले. वर्ल्ड हिंदू काँग्रेसच्या उद्घाटनाच्या समारंभात विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते सिंघल यांनी हिंदुत्वाचा बॉम्ब टाकला. ‘मे महिन्यातील मोदींचा विजय म्हणजे 8क्क् वर्षानंतर हिंदू स्वाभिमानी सत्तेवर आल्याची निशाणी आहे,’ असे सिंघल म्हणाले. पंतप्रधान मोदींना जाळ्यात अडकवण्याचा डाव म्हणून सिंघल यांनी हे वक्तव्य केले, असे अनेकांना वाटेल. 8क्क् वर्षाचा उल्लेखही हेतूपूर्वक केल्याचे दिसते. कारण 12 व्या शतकाच्या अखेरीस घोरीच्या सैन्याने राजपूत राजा पृथ्वीराज याचा पराभव केला होता.
हिंदू स्वाभिमानी असे म्हणण्यामागे सर्व माजी पंतप्रधानांना टोमणा मारण्यासारखे आहे. त्यात भाजपाचे अटलबिहारी वाजपेयी यांचाही समावेश आहे. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित असल्यामुळे स्वाभिमानी हिंदुत्वाचा उल्लेख अधिक अर्थपूर्ण ठरला आहे. या उल्लेखाने मोदी हे संघाच्या जवळचे आहेत आणि संघाचा प्रभाव दीर्घकाळ जाणवणार आहे, असे दाखवून दिले. या शिवाय मोदींकडे संघ कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, हेही दाखवण्याची भूमिका त्या उल्लेखामागे असावी. ते यापुढे नि:धर्मी राष्ट्रासाठी नाही, तर हिंदू राष्ट्रासाठी काम करतील हे त्यातून दाखवण्यात आले. भारतीय जनता पक्ष सत्तेवर येऊन सहाच महिने झाले आहेत. पण या काळात अनेक ठिकाणी भगवा रंग पाहावयाला मिळू लागला आहे. ऑक्टोबर महिन्यातील विजयादशमीच्या दिवशी मोहन भागवतांचे
7क् मिनिटे चाललेले भाषण दूरदर्शनवर दाखवून हे उघड झाले आहे. सरकारच्या मीडियाने भागवतांना विशेष वागणूक दिली ही बाब महत्त्वाची आहे. भागवतांनी ‘आम्हाला आमचा नेता मिळाला आहे,’ असे या भाषणात जे म्हटले त्याकडे मीडियाने दुर्लक्ष केल्यासारखे दिसले. पण संघाला आपला नेता मिळाला आहे, त्यामुळे संघ परिवार स्वत:ला भाग्यवान समजत आहे.
सहा महिन्यांच्या अवधीत हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारणो आणि हिंदुत्व ही या देशाची ओळख आहे, असे म्हणणो यातून भगव्या परिवाराची मानसिकता दिसून येते. संघाच्या विरोधकांचे म्हणणो आहे, की 19 व्या शतकातील राष्ट्रवादी वृत्तीचे सावरकर म्हणाले होते की, ‘जी व्यक्ती सिंधू नदीपासून हिंदी महासागरार्पयत पसरलेल्या भारतवर्षाला आपली मातृभूमी मानते ती व्यक्ती हिंदू आहे.’ पण त्यानंतर भारताची फाळणी झाल्यामुळे सावरकरांच्या म्हणण्याला किंमत उरली नाही. जे लोक स्वत:ला हिंदू म्हणवत नाहीत त्यांच्याविषयी सावरकर म्हणतात, ‘भारतीय मुसलमान, ज्यू, ािश्चन, पारशी इत्यादींना स्वत:ला हिंदू म्हणवता येणार नाही.’ वीर सावरकरांच्या म्हणण्याचा उल्लेख यासाठी केला की त्यांचे म्हणणो भाजपाच्या विचारांशी सुसंगत आहे. काँग्रेसच्या 6क् वर्षाच्या सत्ताकाळात धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंना जे सोसावे लागले त्याची भरपाई मोदी सरकार करणार असल्याचे दिसते. मोदी जेव्हा काँग्रेसमुक्त भारत करण्याचा विचार मांडतात तेव्हा त्यामागील दृष्टिकोन हा असतो. संघाच्या हिंदुत्वाविषयीच्या विचारांना भारतीय जनता पक्षाने धोरण म्हणून स्वीकारले आहे. स्मृती इराणी यांच्याविषयी मीडियाची भूमिका काहीही असो, पण त्यांच्या कृती संघ विचारकांना आवडणारीच आहे. आपल्या कृतीचे परिणाम काय होतील, याचा विचार न करता त्या संघाला खूश करण्याचा प्रय} करीत असतात. त्यांनी जर्मन भाषेचा विषय अधिक चांगल्या त:हेने हाताळायला हवा होता. कारण ज्या जी-2क् परिषदेसाठी पंतप्रधान मोदी ब्रिस्बेन येथे गेले तेथे जर्मनीचे चॅन्सलरही उपस्थित राहणार होते, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे होते.
हिंदुत्वाचा राजकीय वापर करणो मोदींसाठी महाग
ठरू शकते. आगामी लोकसभा अधिवेशनात त्यांना
कामगार कायदे, जमिनीचे कायदे, विम्याच्या क्षेत्रत विदेशी गुंतवणूक यांच्यात दुरुस्तीवरून विरोधकांना तोंड द्यावे लागणार आहे.
लोकसभा अधिवेशनाच्या निमित्ताने सर्व विरोधक एकत्र येऊन मोदींच्या सुधारणांना विरोध करण्यासाठी सज्ज होत आहेत. ‘सुधारणांच्या कार्यक्रमांना विरोध होऊ शकतो,’ अशी कबुली मोदींना जी-2क् शिखर पषिदेत द्यावी लागली त्याचे कारण हेच आहे. संघ परिवार जितकी आक्रमकता दाखविल तितके विरोधक एकजूट होण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडून सुधारणांच्या कार्यक्रमांना सुरुंग लावला जाऊ शकतो. यासंदर्भात नरेंद्र मोदींनी पी. व्ही. नरसिंहराव यांचे अनुकरण करायला हवे. महत्त्वाचे निर्णय अधिक गाजावाजा न करता घेण्याचे कसब नरसिंहराव यांच्याकडे होते. सुधारणांच्या बाबतीत मोदी यशस्वी झाले, तर चांगलेच आहे. त्यामुळे प्रशासनावर मोदींची पकड आहे, हे सा:या जगाला जाणवेल. ते केवळ काळी टोपी आणि खाकी पॅन्ट घालणारे स्वयंसेवक नाहीत, तर देशाचे खरेखुरे भाग्यविधाते आहेत, हेही जगाला समजेल. पण मोदींना यात अपयश आले, निवडणुकीत दिलेली आश्वासने ते जर पूर्ण करू शकले नाहीत, तर सारे जग मोदींपासून दूर जायला वेळ लागणार नाही.
हरीश गुप्ता
लोकमत पत्रसमूहाचे नॅशनल एडिटर