शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कुणाची संक्रांत कुणावर ?

By सचिन जवळकोटे | Updated: January 11, 2018 03:00 IST

संक्रांत जवळ येताच अशोकराव नांदेडकरांनी मुद्दामहून ‘कणकवली’करांना मेसेज पाठविला. ‘तीळगूळ घ्या ऽऽ एकदा तरी गोड बोला,’ मेसेज वाचून गोंधळलेल्या धाकट्या नीतेशनी थोरल्या नीलेशना विचारलं, ‘गोड बोला... हेचो अर्थ काय?

स्थळ पहिलं : कणकवलीसंक्रांत जवळ येताच अशोकराव नांदेडकरांनी मुद्दामहून ‘कणकवली’करांना मेसेज पाठविला. ‘तीळगूळ घ्या ऽऽ एकदा तरी गोड बोला,’ मेसेज वाचून गोंधळलेल्या धाकट्या नीतेशनी थोरल्या नीलेशना विचारलं, ‘गोड बोला... हेचो अर्थ काय?’ थोरलेही दचकले. दोघांनी पिताश्रींना विचारलं. या दोन गुणी लेकरांच्या अनोख्या प्रश्नावर भरपूर डोकं खाजवूनही नारायणरावांना काही उत्तर सापडलं नाही.‘माका पण कळला नाय बाळांनोऽऽ मी पण आयुष्यात कधी गोड बोलाक नाय,’ असं म्हणत त्यांनी देवेंद्रपंतांनाच मेसेज टाकला, ‘याचा अर्थ काय?’ पंतांकडून तत्काळ रिप्लाय आला, ‘गूळ खोबरं घ्याऽऽ नुसतंच गोड-गोड बोला,’ हा मेसेज वाचताना मात्र तिघांच्याही डोक्यात प्रकाश पडला. आपल्याला नुसतं गूळ खोबरं देऊन ठेवलेल्या पंतांच्या गोडऽऽ गोड बोलण्याचा अर्थही त्यांना समजला.स्थळ दुसरं : मातोश्रीउद्धोंच्या मोबाईलची रिंग वाजली, तेव्हा त्यांनी प्रश्नार्थक नजरेनं मिलिंदकडं बघितलं; कारण या मोबाईलवर कुणाचा कॉल घ्यायचा अन् कुणाचा कट करायचा, याचं नियोजन म्हणे मिलिंदच करायचे. कॉल चक्क ‘कृष्णकुंज’वरून आलेला पाहून मोबाईल उचलला गेला. तिकडून खर्ज्या आवाजात एक डॉयलॉग आदळला, ‘नमस्कार. मी राज. तीळ द्याऽऽ गूळही द्याऽऽ गोडही तुम्हीच बोला!’ फोन कट झाला. या संदेशात फक्त घेण्याचीच भाषा होती. देण्याचा कुठं उल्लेखच नव्हता. तेव्हा चिडून उद्धोंनी युवराजांना विचारलं, ‘देण्या-घेण्यात माहीर असणाºया तुमच्या काकांना आज-काल फक्त घ्यायचंच माहितंय वाटतं; परंतु आपण तरी कधी कुणाला काय देतोय?’ त्यावर अल्लडपणे युवराज उत्तरले, ‘हो. देतो कीऽऽ आपल्याच सरकारला तळतळाट अन् शिव्याशाप!’स्थळ तिसरं : वर्षा बंगलादेवेंद्रपंतांना तीळगूळ देण्यासाठी अष्टप्रधान मंडळातील सहकारी उत्साहानं (अन् नाईलाजानंही) जमले. तीळगुळाची पुडी बांधण्यासाठी रद्दीच्या भावात गेलेल्या मुंबई विद्यापीठाची उत्तरपत्रिका विनोदभाऊंनी वापरली. ‘पुढच्या वर्षी बदलणाºया सरकारमध्ये आम्ही दोघं असणार की नाही?’ असा सवाल महादूदादा अन् सदाभाऊंनी केला, मात्र मोबाईल पाहण्यात गुंतलेल्या गिरीशरावांनी लक्ष दिलं नाही. बहुधा रात्रीची क्लिप पाहण्यात ते व्यस्त असावेत. चंद्रकांतदादांनी खुणावताच त्यांच्या लाडक्या यल्लप्पानं तातडीनं पोतं भरून तीळ-गूळ आणलं. हे भरगच्च पोतं म्हणजे ‘खड्डेमुक्त महाराष्ट्र’चीच कृपा. (म्हणजे चांगल्या रस्त्यावरून आलेल्या गाडीतलं पोतं टिकलं हो. उगाच नसता गैरसमज नसावा.) असो.इकडं सुभाषबापू सांगू लागले, ‘मी लोकांचं मंगल करणारा मंत्री. त्यामुळं पालिकेत बाहेरच्यांना गूळ देईन, मात्र घरच्या मालकांना तीळही देणार नाही,’ हे ऐकून सोलापुरातील ‘विजयकुमार अन् दिलीपराव’ अनेकांना आठवले. या सर्व धांदलीत कुणाच्या तरी लक्षात आलं की इथं पंकजाताईच आल्या नाहीत. गर्दीतल्या एकानं त्यांना कॉल केला, ‘ताई.. तीळ-गूळ द्यायला कधी येणार?’ तेव्हा तिकडून दचकून विचारणा झाली, ‘कुठला गूळ.. चिक्कीतला का?’ मात्र, नेटवर्क खराब झाल्यानं पुढचा आवाज ऐकू आला नाही.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarayan Raneनारायण राणे