शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

ऊस उत्पादकांचा कैवार घेणार कोण?

By admin | Updated: January 15, 2015 02:50 IST

ऊसदर आणि त्या अनुषंगाने होणारी आंदोलने यांचा समारोप काहीही झाला तरी, फायदा-तोट्याचे गणित न मांडता आजवर शेतकरी राजू शेट्टी आणि कंपनीवर प्रेम करत आला

राजा माने -

ऊस उत्पादक शेतकरी नेहमीप्रमाणे याही वर्षी अडचणीत आला आहे. ऊसदर हा नेहमीचाच विषय ! या विषयाची ढाल घेऊनच खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोतसारख्या नेत्यांनी गेल्या १५ वर्षांत पश्चिम महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनावर राज्य प्रस्थापित केले. ऊसदर आणि त्या अनुषंगाने होणारी आंदोलने यांचा समारोप काहीही झाला तरी, फायदा-तोट्याचे गणित न मांडता आजवर शेतकरी राजू शेट्टी आणि कंपनीवर प्रेम करत आला. यावर्षी मात्र शेट्टी कंपनी तब्बल ९० दिवस हातावर हात धरून बसली आणि काल अचानक काहीतरी साक्षात्कार झाल्याप्रमाणे ऊसदराचा प्रश्न घेऊन पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयावर चालून गेली ! खासदार शेट्टी, रघुनाथदादा पाटील अथवा शरद जोशींची शेतकरी संघटना या हंगामात शेतकऱ्यांच्या पदरात काय टाकणार? हा कळीचा प्रश्न आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारवगळता इतर जिल्ह्यातील कारखाने शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे दर द्यायला तयार नाहीत. एफआरपी निश्चित करणारे सर्वच घटक आता शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याच्या मन:स्थितीत दिसतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर कोसळत असल्याने साखर कारखानदार शेतकऱ्यांना एफआरपी देण्यास तयार नाहीत. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील खंबीर भूमिका घेत ठरलेला ऊसदर देण्यास नकार देणाऱ्या साखर कारखान्यांची साखरच जप्त करण्याच्या तयारीला लागले आहेत. अशा जप्तीने प्रश्न सुटणार आहे का? शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळणार आहे का? शासन केवळ आक्रमक बनून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सहकार क्षेत्रातील शक्तीवरच वार करणार? असे अनेक प्रश्न आज चर्चिले जात आहेत. सोलापूर जिल्ह्यात ३४ साखर कारखाने आहेत. १६ कारखाने उभारणीच्या तयारीत आहेत. देशातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा हा जिल्हा ऊस उत्पादन पद्धती, ऊसदर आणि उसाला लागणारे जलव्यवस्थापन करू शकलेला नाही. यावर्षी २० लाख टन साखर या जिल्ह्यात तयार होईल. साखरेचे व्यापारी गणित बिघडल्याने साखर कारखानदार हैराण आहेत. एफआरपीनुसार शेतकऱ्यांना पैसे दिल्यास जिल्ह्यातील साखर कारखाने बंद करावे लागतील, अशी भीती कारखानदार ऊस उत्पादकांना दाखवतात. शेतात तोडणीच्या प्रतीक्षेत उभा असलेला ऊस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदरासंदर्भात घेतलेली विलंबाची भूमिका यामुळे शेतकरी धास्तावलेला आहे. अवकाळी पावसाने ज्वारी (शाळू) काळी पडली, द्राक्ष बागायतदारांना ५० कोटींचा फटका बसला, ऊसदराचेही घोंगडे भिजतच राहिल्याने पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सत्तेत असलेले खासदार राजू शेट्टी-सदाभाऊ खोत हे शेतकरी नेते निर्णायक भूमिका घेणार की राजकारणच करत बसणार, हा खरा प्रश्न आहे. ऊसतोड लवकर न झाल्यास शेतकरी नेहमीच अडचणीत येतो. यावर्षी अनेक शेतकरी ऊसदर आणि लांबलेली ऊसतोडणी या दुहेरी संकटात अडकलेले आहेत. सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी आम्ही देऊ तो दर घ्या अन्यथा वाट पाहत बसा असा पवित्रा घेतलेला आहे. दरवर्षी येणारे ऊसदराचे संकट कायमस्वरूपी दूर करणारे धोरण निश्चित होणे आवश्यक आहे. गतवर्षी राज्यात ७० लाख टन साखरेचे उत्पादन झाले. त्यापैकी १५ लाख टन साखर शिल्लक आहे. या हंगामात १०० लाख टन साखरेचे उत्पादन होणे अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत साखरेचे दर, इथेनॉलसंदर्भातील कारखानदार आणि शासनाचे धोरण यांच्यात ताळमेळ न बसल्यास साखर उद्योग आणि ऊस उत्पादक कायम अडचणीत राहणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपसलेले आंदोलनाचे हत्यार असो वा शासनाची चाललेली पोपटपंची असो हा हंगाम सुरू झाल्यापासून राज्यात दररोज ७० हजार टनांची साखर निर्मिती मात्र अव्याहतपणे सुरू आहे. दराची कोंडी झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरात पहिला हप्तादेखील पडलेला नाही. ऊसदराची खात्री नाही अन् ऊसतोडही नाही. वाळत चाललेल्या उसाकडे दीनवाण्या चेहऱ्याने पाहत बसणे एवढेच शेतकऱ्यांच्या नशिबी....!