शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकांच्या भरतीवर नियंत्रण कुणाचे?

By सुधीर लंके | Updated: March 8, 2018 00:55 IST

अहमदनगर आणि सातारा या दोन जिल्हा सहकारी बँकांची भरती प्रक्रिया शासनाने रद्द केली. या बँकांच्या भरती प्रक्रियेत पारदर्शीपणाचा अभाव आहे, असा निष्कर्ष शासनाने नोंदविला आहे. पुणे जिल्हा सहकारी बँकेची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शीपणे होणार का? हे अजून ठरायचे आहे.

अहमदनगर आणि सातारा या दोन जिल्हा सहकारी बँकांची भरती प्रक्रिया शासनाने रद्द केली. या बँकांच्या भरती प्रक्रियेत पारदर्शीपणाचा अभाव आहे, असा निष्कर्ष शासनाने नोंदविला आहे. पुणे जिल्हा सहकारी बँकेची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शीपणे होणार का? हे अजून ठरायचे आहे.सहकारी बँका आणि भरती हा सातत्याने वादाचा विषय राहिला आहे. जिल्हा बँकाच नव्हे इतरही सहकारी बँकांची हीच अवस्था आहे. या बँकांतील नोकर भरतीत संचालक आपल्या नातेवाईकांची किंवा आर्थिक हितसंबंधातून मर्जीतील उमेदवारांची निवड करतात, असा आरोप सातत्याने होतो. नगर जिल्हा बँकेची भरती तर आजवर तीनवेळा वादात सापडली. दोनवेळा ती रद्द करावी लागली, तर १९९१ च्या भरतीचा वाद पाच वर्षे न्यायालयात सुरू होता.जिल्हा बँकांमधील कर्मचाºयांचा आकृतिबंध व भरती प्रक्रिया यावर शासनाचे थेट नियंत्रणच नाही, हे या घोटाळ्याचे खरे कारण आहे. या बँकांचा आकृतिबंध व भरती याबाबत निकष असावेत, यासाठी राष्टÑीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) स्टेट लेव्हल टास्क फोर्सने (एसएलटीएफ) काही निकष ठरविले. त्यास शासनाची संमती घेतली. मात्र, हे निकषच प्रचंड संदिग्ध व बँकांच्या मनमानीस संधी देणारे आहेत.उदाहरणार्थ सर्व बँकांत समान पदासाठी समान पात्रता हवी. मात्र पुणे, नगर, सातारा, ठाणे या बँकांची भरती बघितली तर ही पात्रता भिन्न दिसते. पुणे बँकेत लिपिक होण्यासाठी पदवीला ५० टक्के गुण आवश्यक आहेत. नगरला अशी गुणांची अटच नाही. नाबार्डच्या कार्यबलाने भरतीसाठी चार खासगी एजन्सीजची नावे निश्चित केली. या एजन्सीमार्फत बँकांना भरती करता येते. मात्र, बँका व या एजन्सी यांच्यात हितसंबंध अथवा साटेलोटे निर्माण होणार नाही, याची खात्री कोण देणार? सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये आता उत्तरपत्रिकांची कार्बन कॉपी दिली जाते. जिल्हा बँकांसाठी जी धोरणे ठरविण्यात आली त्यात या अटींचा समावेशच नाही. प्रश्नपत्रिका काढण्यापासून ते गुणवत्ता यादी जाहीर करेपर्यंत सर्व अधिकार एजन्सीज व बँकेला आहेत. एजन्सीने प्रश्नपत्रिका छपाईला पाठविण्यापूर्वी त्या मसुद्याला बँकेची परवानगी घ्यावी, अशीही एक अट आहे.या सर्व प्रक्रियेत शासन हरवले आहे. घोटाळा झाला की मग शासन येते. सहकारी बँका या शासन म्हणजे ‘स्टेट’चा भाग नाहीत किंवा त्यांना शासकीय भागभांडवल नसते म्हणून शासनाला बँकांच्या भरतीत हस्तक्षेप करता येत नाही, असे एक कारण नेहमी पुढे केले जाते. याच कारणामुळे या बँकांना माहिती अधिकारही लागू नाही. या बाबीचा बँकांनी फायद्यापेक्षा गैरफायदा अधिक घेतलेला दिसतो. वास्तविकत: महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह अ‍ॅक्टखाली नोंदणी असल्याने शेतकरी या बँकांवर विश्वास ठेवतात. पीककर्जांचे वाटप या बँकांमार्फत होते. शासन या बँकांंना हमी देते; मात्र तरीही या बँका ‘स्टेट’चा भाग ठरत नाहीत. सातारा जिल्हा बँकेची भरती रद्द करताना बँकांच्या भरतीसाठीच्या नियमावलीत सुधारणा हवी, असे शासनाने म्हटले आहे. याचा अर्थ शासनालाही ही नियमावली पुरेशी वाटत नाही. शासन आता काय तोडगा काढणार? याची प्रतीक्षा आहे. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रnewsबातम्या