शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणाला ‘अच्छे दिन’ कधी येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 01:23 IST

मराठी अस्मितेच्या बाता मारणा-या सर्व पक्षांना, दिल्लीत महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षणाला मान्यता मिळवून देण्यासाठी झटावे वाटत नाही का? हा प्रश्न केवळ पदव्युत्तर वैद्यकीय सेवा व विद्यार्थ्यांचे भवितव्य इतका मर्यादित नाही, तर त्याचा थेट संबंध ग्रामीण आरोग्यसेवा व राज्यातील कुपोषण, बाल व माता मृत्यूशी आहे.

- डॉ. अमोल अन्नदातेमराठी अस्मितेच्या बाता मारणाºया सर्व पक्षांना, दिल्लीत महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षणाला मान्यता मिळवून देण्यासाठी झटावे वाटत नाही का? हा प्रश्न केवळ पदव्युत्तर वैद्यकीय सेवा व विद्यार्थ्यांचे भवितव्य इतका मर्यादित नाही, तर त्याचा थेट संबंध ग्रामीण आरोग्यसेवा व राज्यातील कुपोषण, बाल व माता मृत्यूशी आहे.महाराष्ट्रात कॉलेज आॅफ फिजिशियन्स अँड सर्जन्स (सीपीएस)कडून १९१३ सालापासून ग्रामीण, तसेच शहरी भागात वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणाच्या अनेक जागा उपलब्ध आहेत. ३ वर्षांपूर्वी या जागा ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयांमध्येही उपलब्ध झाल्या व राष्ट्रीय प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून त्या भरल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता भरून आली व राज्यात बालमृत्यू, मातामृत्यू कमी होण्यास याचा उपयोग झाला. आज एमबीबीएस होऊन बाहेर पडणारे विद्यार्थी व त्यांना उपलब्ध असलेल्या पदव्युत्तर शिक्षणाच्या जागा यात प्रचंड तफावत आहे. सीपीएसच्या हजार पदव्युत्तर जागांमुळे ही तूट कमी झाली व देशभरात याचा गौरव महाराष्ट्र मॉडेल म्हणून झाला, पण नुकतेच दिल्लीस्थित मेडिकल काउन्सिल आॅफ इंडिया म्हणजे केंद्रीय वैद्यकीय परिषदेने बालरोग, स्त्रीरोग, पॅथॉलॉजी (डीसीएच, डीजीओ, डीपीबी ) व एफसीपीएस हे कोर्सेस वगळता, इतर पदव्युत्तर जागांची मान्यता काढून घेतली. या कोर्सना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची मान्यता कायम असली, तरी अचानक केंद्रीयङ्क्तएमसीआयची मान्यता काढून घेतल्याने, वैद्यकीय विद्यार्थांच्या नैतिकतेवर व मानसिकतेवर नकारात्मक परिणाम झाला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील या पदव्युत्तर शिक्षणाच्या जागांना दिल्लीकडून सापत्न वागणूक मिळते व एमसीआयच्या मान्यतेविषयी हा तळ्यात-मळ्यात खेळ सुरूच आहे. डिसेंबर २00९ मध्ये सर्वात आधी मेडिकल काउन्सिल आॅफ इंडियाने ही मान्यता काढून घेतली. त्यानंतर, २0१७ मध्ये केंद्रीय प्रतिनिधींच्या एका पाहणी पथकाद्वारे, सीपीएसच्या पदव्युत्तर जागांचे सर्वेक्षण करून, सर्व ३९ कोर्सेसना १७ डिसेंबर २0१७ रोजी एमसीआयने मान्यता दिली. एका महिन्यात परत चक्रे उलटी फिरली व २१ जानेवारी २0१८ रोजी काही कोर्स वगळता, इतर कोर्सची मान्यता एमसीआयने रद्द केली, तसेच या निर्णयाचा आढावा घेण्यासाठी परत केंद्रीय सदस्यांची समिती गठीत केली आहे, पण २१ जानेवारी २0१८ आधी प्रवेश झालेल्या विद्यार्थांच्या जागांना एमसीआयची मान्यता कायम राहील. एमसीआयची मान्यता असल्यास, विद्यार्थी देशात कुठेही प्रॅक्टिस करू शकतात. यामुळे इतर राज्यातील डॉक्टर महाराष्ट्रात व इतर म्हणजे गुजरात, राजस्थान, दिव दमण या राज्यात महाराष्ट्रातील मुले सीपीएस कोर्सेसला प्रवेश घेऊ शकतात, पण एमसीआय मान्यता नसल्यास ही दारे बंद होतात. आज वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणाच्या कमी जागांमुळे प्रवेशासाठी स्पर्धा खूप तीव्र आहे. आज तरुण डॉक्टर उमेदीची अनेक वर्षे पदव्युत्तर परीक्षा देण्यातच खर्ची घालवितो. त्यामुळे राज्याची मोठी मानव ऊर्जा निष्फळ ठरते आहे.एकीकडे क्लिनिकल पदव्युत्तर जागा वाढविण्यासाठी, राज्य शासनाने मागे एमबीबीएसच्या पहिल्या व दुसºया वर्षांच्या शिक्षकांची पदे, तिस-या वर्षाच्या क्लिनिकल जागांकडे वळविण्याचा घाट घातला होता. तूर्त या निर्णयाला स्थगिती मिळाली आहे, पण दुसरीकडे सीपीएससारखा क्लिनिकल पदव्युत्तर जागांच्या पर्यायाला केंद्राची मान्यता मिळवून देण्याकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष होते आहे.

(लेखक हे बालरोग तज्ज्ञ आहेत.)

टॅग्स :Mumbaiमुंबई