शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

संशोधन आणि संशोधन वृत्तीचे काय होते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 11:15 AM

मिलिंद कुलकर्णी भारतीय शिक्षण पध्दतीविषयी बरे-वाईट असे खूप काही बोलले जाते. सरकार बदलते तसे अभ्यासक्रमदेखील बदलत असतात. पुरातन काळात ...

मिलिंद कुलकर्णीभारतीय शिक्षण पध्दतीविषयी बरे-वाईट असे खूप काही बोलले जाते. सरकार बदलते तसे अभ्यासक्रमदेखील बदलत असतात. पुरातन काळात आम्ही खूप विज्ञानवादी, समृध्द होतो, मध्यंतरी आक्रमणामुळे आमच्या शिक्षण व संशोधनावर मर्यादा आल्या. दीडशे वर्षांच्या इंग्रजाच्या राजवटीत केवळ कारकून तयार करणारे शिक्षण देण्यात आले. आम्ही तेज:पूंज इतिहास विसरलो, असा एक युक्तिवाद मांडला जातो. विज्ञान संमेलनात केंद्रीय मंत्रीच अशास्त्रीय विधाने करीत असतो. दीडशे वर्षांच्या राजवटीवर खापर आम्ही गेली ७० वर्षे फोडत आहोत. या काळात आम्ही आमुलाग्र बदल का करु शकलो नाही? परदेशात शिकायला आणि नोकरीनिमित्ताने स्थायिक होणाऱ्या तरुणाईला रोखण्यात येणाºया अपयशाला आमची शिक्षणपध्दती, रोजगार निर्मिती करणारी यंत्रणा, समाज आणि सरकार हे जबाबदार नाहीत काय? ‘बे्रन ड्रेन’विषयी केवळ कंठशोष करण्यात काय हशील आहे?महाराष्टÑाच्या शिक्षण पध्दतीविषयीच बोलूया. किती बदल झाले? धोरणात सातत्यदेखील राहिले नाही. मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, सेमी इंग्रजी माध्यम ही माध्यमे, पुन्हा स्टेट बोर्ड, सीबीएसई, आयसीएसई हे बोर्ड आले. तालुक्याच्याठिकाणी इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले. बरे सगळ्या शाळांच्या नावांमध्ये ‘ग्लोबल, इंटरनॅशनल’ अशी नावे आहेत, इमारती चकाचक आहेत. मोठी मैदाने आहेत. तगडे शुल्क घेतले जाते. परंतु, एका तुकडीत ८० विद्यार्थी, अप्रशिक्षित शिक्षकवर्ग, अभ्यासक्रमाच्या पुस्तकांसोबत पूरक पुस्तकांची सक्ती, शिक्षणामधील प्रेम, आनंद हरपून सक्ती, पाठांतर, स्पर्धा यात मुले भरडली जात आहेत, असे एकंदरीत चित्र आहे. मराठी शाळांविषयी आम्ही केवळ गळा काढतो, परंतु, ती वाचविण्यासाठी कुणालाच रस नाही. मातृभाषेतून दिले जाणारे शिक्षण विद्यार्थ्याला लवकर समजते, आत्मसात होते हे आम्हाला पटत असूनही आम्ही पाल्याला इंग्रजी माध्यमांमध्ये घालतो. पालकांचे इंग्रजीशी सख्य नाही, पण मुलगा फाडफाड इंग्रजी बोलला पाहिजे. इंग्रजीशिवाय त्याचे भवितव्य धोक्यात येऊ नये, असा भाबडा आशावाद बाळगत ही प्रक्रिया निरंतर वाढत आहे.कलचाचणी, बुध्दयांक चाचणी असे शास्त्रीय प्रयोग अलीकडे सुरु झाले आहेत. पण खरोखर त्याचा उपयोग होत आहे काय? पालकांनी पाल्याच्या लहानपणीच ठरवून टाकलेले असते की, तो कोण होणार? त्यासाठी आठवीपासून क्लासेस, आर्थिक नियोजन अशा तरतुदी केल्या जातात. पालकांच्या अपेक्षांचे मोठे ओझे बाळगत पाच वर्षे प्रचंड मेहनत करतो. या काळात त्याच्या आवडीनिवडी, मित्र, खेळ, नातेवाईकांकडील लग्नकार्ये यापासून त्याला पूर्ण अलिप्त ठेवले जाते. अभ्यास, क्लास एवढेच त्याचे विश्व बनते.स्पर्धात्मक युगात चांगल्या महाविद्यालयात, चांगल्या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला नाही की, त्याच्यासह पालकांचा अपेक्षाभंग होतो. आभाळ कोसळल्यासारखी स्थिती होते. पाल्याचा तर पुरता हिरमोड होतो. न्यूनगंडाने तो पछाडतो. अनिच्छेने पर्यायी अभ्यासक्रम, महाविद्यालय निवडतो, मात्र यावेळी तो उत्साह, जोश नसतो. शिक्षणाविषयीच्या उर्मी नाहिशा होतात. आवड असलेल्या क्षेत्रात काही करता आले नाही, याची खंत असते. ज्याच्या पाठीमागे धावलो, ते मिळाले नाही, हे दु:ख आणि आता पोटपाण्यासाठी काहीतरी करायचे म्हणून पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणे यात इतिकर्तव्यता आहे, अशी भावना निर्माण होते.आम्ही मुलांना असे धड ना इकडचे ना तिकडचे असे करीत आहोत. अशा मानसिकतेची मोठी फौज तयार होत आहे. शाळकरी जीवनात प्रयोगशाळेत रमणारे, विज्ञान प्रदर्शनात उत्साहाने नवनवे प्रयोग करणारे, आवडीच्या क्रीडा प्रकारासाठी तासन्तास मैदानात वेळ घालविणारे, क्रीडा स्पर्धांसाठी वेगवेगळ्या गावांना जाणारे, लेखन, भाषण, गायन , वादन, नृत्य अशा कलाप्रकारांनी समृध्द झालेले मन वेगवेगळ्या मैफली गाजविण्याचे आणि बड्या गुरुंचे गंडे बांधण्याचे स्वप्न पाहत असताना व्यावहारीक जीवनातील शिक्षणाच्या पदव्या त्यांना खुणावू लागतात आणि आवडीचे क्षेत्र दूर राहते आणि ‘सब घोडे बारा टके’ अशा झुंडीत ही मुले सहभागी होतात. काय साधतोय, यातून आपण हा उद्विग्न करणारा प्रश्न मनात येतोच.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव