शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

तिरंगा लहराकर, नही तो तिरंगेमे लिपटकर...

By विजय दर्डा | Updated: August 17, 2021 07:52 IST

कारगिलच्या युद्धभूमीतल्या अजोड साहसाची तेज:पुंज कहाणी म्हणजे ‘शेरशाह’ ! तिरंग्याच्या बळावरच लव नावाचा सामान्य मुलगा एक दिवस विक्रम बत्रा होतो !

-  विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

जे चित्रपट देशभक्तीने परिपूर्ण आहेत, जे तरुणांना आणि आपल्या सर्वांना प्रेरणा देतात, ते मी नक्कीच पाहतो. अलीकडेच मी ‘शेरशहा’ हा सिनेमा पहिला आणि कारगिल युद्धाच्या कटु आठवणीत हरवून गेलो. आपले ५२८ सैनिक त्या युद्धात हुतात्मा झाले होते. हा प्रश्न माझ्या मनात कायम असतो, की जो कोणी युद्धात मरतो तो कोणाचा तरी मुलगा, भाऊ, नवरा असतो. युद्धे लादली जातात. म्हणूनच मला युद्धाचा तिरस्कार आहे. कारगिल युद्धात अदम्य साहस, शौर्य दाखवणाऱ्या भारतीय वीरांच्या कहाण्या अगणित आहेत. पण विक्रम बत्राची कहाणी मात्र त्यात चमकणारी! वेगळी. 

विक्रम बत्रा हा हिमाचल प्रदेशातील पालनपूर या छोट्या; पण सुंदर शहरातला होनहार तरुण. सिनेमा पाहताना मनात आले, हिमाचलसारखा शांत प्रदेशाच्या कुशीतून असे  शूर योद्धे जन्माला यावेत, याचे रहस्य काय असेल? कारगिलच्या युद्धात हिमाचलातल्या ५२ वीरांनी प्राणार्पण केले. त्यात दोन परमवीरचक्र विजेते होते. कॅप्टन विक्रम बत्रा यांना मरणोत्तर आणि हवालदार संजय कुमार यांना परमवीरचक्र दिले गेले. विक्रम बत्राचे वडील जी. एल. बत्रा आणि आई कमल कांता दोघेही शिक्षक होते. विक्रम आणि त्याच्या भावाला मातापित्यांनी लव-कुश अशी नावे दिली होती. तसे म्हटले, तर या कुटुंबाचा सैन्याशी दुरूनही काही संबंध नव्हता. लव मात्र शाळेत एनसीसीमध्ये जात होता. बालपणीच सैन्यात जाण्याचे त्याच्या मनाने घेतले आणि तिरंगा त्याला बोलावू लागला. ‘जन गण मन’चे जादुई स्वर जणू त्याच्यावर स्वार झाले. शेवटी तो सेनादलात सामील झाला. 

कमांडो प्रशिक्षण घेतलेल्या या वीराने कारगिलच्या युद्धात हंप तथा राकी नाब जिंकून आपले पहिले शौर्य दाखविले. तो सेकंड लेफ्टनंटचा कॅप्टन झाला. त्यानंतर कारगिलमध्ये ५१४० नामक शिखर जिंकून त्याने पुन्हा अशक्य ते शक्य करून दाखविले. विक्रमची तुकडी अशा मार्गाने शिखरावर पोहोचली, की शत्रूला पत्ताही लागला नाही. युद्धात इतक्या आणीबाणीच्या वेळी सर्वांत पुढे राहून पथकाचे नेतृत्व करणे ही विक्रमची खासियत होती. २० जून १९९९च्या पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी ५१४० हे शिखर त्यांनी गाठले आणि रेडिओवरून ‘ये दिल मांगे मोअर’ हा संदेश दिला. ती विजयाची घोषणा होती ! सारा देश विक्रम बत्रा यांचा दिवाना झाला होता. या विशेष चढाईसाठी कर्नल योगेश कुमार जोशी यांनी विक्रमला ‘शेरशाह’ असे सांकेतिक नाव दिले होते.विक्रम बत्रा यांच्या शौर्याचे किस्से गाजत होते. हा शेरदिल तरुण काहीही करू शकतो, असे मानले जाऊ लागले.

कारगिलचे घमासान सुरूच होते. अत्यंत चिंचोळ्या ४८७५ या शिखरावर चाल करून शत्रूला हुसकण्याची जबाबदारी विक्रम आणि त्याच्या तुकडीवर टाकण्यात आली. दोन्ही बाजूला दरी होती. वर जायचा एकमेव रस्ता शत्रूच्या ताब्यात होता. विक्रमने ध्येय साध्य करण्यासाठी अशी काही वाट निवडली, की ते शत्रूच्या डोक्यातही येणे शक्य नव्हते. शिखरावर पोहोचताच  समोरासमोर झालेल्या लढाईत विक्रमने पाच शत्रू सैनिक यमसदनी धाडले. शरीराची गोळ्या लागून चाळणी झालेली असतानाही विक्रमने प्राण पणाला लावून ग्रेनेड फेकला आणि दुश्मनांंना संपविले. भारताने हे शिखर सर केले खरे; पण आपण ‘शेरशाह’ गमावला.

‘एक तर बर्फाळ शिखरावर तिरंगा फडकावून येईन किंवा तिरंग्यात लपेटून येईन’, असे विक्रम यांनी पालनपूरहून निघताना आपल्या मित्राजवळ म्हटले होते. १३ जम्मू-काश्मीर रायफल्समध्येच नव्हे तर सैन्याच्या प्रत्येक तुकडीत विक्रम यांचे हे वाक्य अभिमानाने सांगितले जाते. खरे तर ही तिरंग्याचीच ताकद आहे जी एखाद्या माणसाला देशासाठी सर्वोच्च बलिदान देण्याची प्रेरणा देते, शत्रूच्या नाकीनव आणण्याचे बळ देते ! भारतमातेला जगभर एक देश म्हणून ओळख मिळते ती या ताकदीच्याच भरवशावर.

एक प्रसंग आठवतो. राज्यसभा सदस्य म्हणून  संसदेच्या सभागृहात प्रवेश करीत असताना माझ्या छातीवर तिरंग्याची लेपन पीन होती. ‘ही लावून आपण आत जाऊ शकत नाही, त्यासाठी परवानगी नाही’, असे सांगून मला अडवले गेले. पण अथक संघर्ष करून मी अखेर तो प्रवेश मिळवलाच. छातीवर तिरंगा लावणे, हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे हे संसदेने मान्य केले. - याच तिरंग्यासाठी  सामान्य माणूस एक मिनिट थांबणे दूर राहिले, पोहोचूही शकणार नाही अशा दुर्गम ठिकाणी आपले सैनिक ठिय्या देऊन राहतात, तिथेही तिरंगा त्याच्यासोबतीला असतो. मला वाटते, या शूरवीरांच्या कहाण्या सांगणारे चित्रपट सतत निघाले पाहिजेत. त्यातून तरुणांना प्रेरणा मिळेल. दुर्दैवाने, आज तरुणांना प्रेरणा मिळवण्याच्या कमी संधी आहेत. अभ्यास असो, क्रीडा किंवा व्यवसाय, सर्वत्र प्रेरणेचा अभाव आहे. समाज, सरकारकडून लोकांना प्रेरणा मिळत राहिली पाहिजे. लोकांनी चुकीच्या गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. कोणतीही भेसळ करण्यापूर्वी विचार करा की हे पाप आहे. जर एखादा तरुण एखाद्या शैक्षणिक संस्थेत जात असेल, तर शिक्षकाने असा आदर्श ठेवला पाहिजे की विद्यार्थ्याला प्रेरणा मिळेल, खेळाडूंना वाटेल की इथे कोणताही भेदभाव नाही. राजकारण्यांनी सार्वजनिक सेवेसाठी समर्पित असले पाहिजे. 

विक्रम बत्रा हुतात्मा झाल्यावर डिम्पल चिमा या त्यांच्या मैत्रिणीने अन्य कुणाशीही विवाह करायला नकार देत एकटे राहणे पसंत केले. या तरुण मुलीच्या  जिद्दीला मी नमन करतो. प्राणांची बाजी लावून तिरंग्याचा मान राखणारे सर्व हुतात्मे, सैनिकांना माझे नमन. त्यांनी तिरंग्याची, भारतमातेची प्रतिष्ठा राखली. म्हणूनच तर आपण गर्वाने म्हणतो, ‘सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा.’ जय हिंद.. वंदे मातरम!

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन