शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

बदनाम गोव्यात पर्यटकांना नवी ‘ऑफर’; ‘लडकी चाहिए क्या?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 10:36 IST

गोव्यात पर्यटकांना ‘ड्रग्ज चाहिये? कॅसिनोंमे जाना है?’ असे दलाल विचारतातच; आता खुद्द आमदारांनाच ‘लडकी चाहिए क्या?’ असे विचारण्यापर्यंत मजल गेली आहे.

सदगुरू पाटील, निवासी संपादक, लोकमत, गोवा -

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. त्यात ‘रिव्होल्युशनरी गोवन्स’ या पक्षाचे तरुण आणि धडाकेबाज आमदार वीरेश बोरकर यांनी परवाच आपला अनुभव जाहीरपणे सांगितला. रस्त्याने जात असताना त्यांची गाडी थांबवून एका दलालाने आमदार महोदयांना विचारले, “सर, लडकी चाहिए क्या?”- अशाच प्रकारचा अनुभव गोव्यातले एक  सरपंच जोझेफ सिक्वेरा यांनाही काही महिन्यांपूर्वी आला होता. त्यांनीही त्याबद्दल जाहीरपणे खेद आणि संताप व्यक्त केला होता.देवभूमी असलेल्या गोव्याचे रूपांतर पर्यटनाच्या माध्यमातून भोगभूमीत करण्यासाठी काही टोळ्या कार्यरत आहेत. ही स्थिती गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे हेदेखील नाकारत नाहीत. सत्ताधारी भाजपचेच आमदार मायकल लोबो यांनी तर गोव्यात ड्रग्ज व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो व त्यामुळे पर्यटन बदनाम होत आहे, अशी खंत वारंवार व्यक्त केली आहे. हे असे धिंडवडे निघत असताना गोव्यातला सामान्य माणूस एकच प्रश्न विचारतो आहे :  गोवा सरकार व गोव्याची पोलिस यंत्रणा काय करतेय? गोवा म्हणजे मद्य आणि ड्रग्ज असे समीकरण होतेच, आता त्यात मुली पुरविणाऱ्या टोळ्या दाखल झाल्या आहेत. गोव्यात दारू अगदी सहज व स्वस्त मिळते आणि सगळे गोयंकार दारू पिण्यातच धन्यता मानतात असा ठार चुकीचा समज कधीचा रूढ झालेला आहे. साडेचारशे वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीमुळे गोव्यात सुशेगाद (आरामदायी) जीवनशैलीचे बियाणे रोवले गेले. पण, सुशेगाद असणे म्हणजे बेमुर्वत चंगळ आणि हुल्लड नव्हे, हे गोमंतकीय जाणतात. पर्यटनावर गोव्याची अर्थव्यवस्था बऱ्याच अंशी अवलंबून आहे, हेही खरे. पर्यटकांना पूर्वी केवळ मद्याचेच आकर्षण असायचे. आता ड्रग्ज व मुली मिळविण्याचे आकर्षण वाटू लागलेय हे धक्कादायक आहे. गोव्यात अधूनमधून काही मसाज पार्लर्सवर पोलिस छापे टाकत असतात. या पार्लर्समधून शरीरविक्रयाचा धंदा चालतो, हे उघड आहे. उत्तर व दक्षिण गोव्याच्या किनारपट्टीत काही दलाल फिरत असतात. हे दलाल पर्यटकांना गाठून तुम्हाला ड्रग्ज किंवा उपभोगासाठी मुली हव्यात का, असे उघडपणाने विचारतात. ड्रग्ज किंवा मुली पुरविण्याचे खोटे आश्वासन देऊन पर्यटकांना लुटले जाण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. गोव्यात वार्षिक सरासरी ड्रग्जविरोधी शंभरेक तरी छापे पडत असतात. जास्त चिंतेची बाब म्हणजे अनेक गोमंतकीय युवकच आता ड्रग्ज विक्री किंवा ड्रग्जचे सेवन करण्याच्या वाटेने जाऊ लागले आहेत. पूर्वी विदेशी व्यक्ती किंवा हिमाचल प्रदेश, काश्मीर आदी ठिकाणच्या युवकांना गोव्यात ड्रग्ज विक्रीच्या व्यवहारांमध्ये पकडले जात होते. आता गोमंतकीय युवकही पकडले जात आहेत. गोव्यातील मांडवी नदी आणि अनेक हॉटेलांमध्ये कसिनो (जुगाराचे अड्डे) सुरू झाले. कायदेशीर पद्धतीने जुगार खेळून पर्यटक व गोव्यातील भूमिपुत्र असे दोघेही उद्ध्वस्त होऊ लागले आहेत. गोव्यात होत असलेला पर्यटनाचा स्फोट  या राज्याला पुढील वीस वर्षांनंतर  कुठे नेऊन ठेवील हा प्रश्न कुणाचेही डोके बधिर करील.टिकटॉक स्टार सोनाली फोगाट हिचा काही महिन्यांपूर्वी गोव्यात पार्टीला जाऊन आल्यानंतर मृत्यू झाला. ड्रग्जच्या अतिसेवनाने तिचा मृत्यू झाला, हे लपून राहिले नाही. गोव्यात येणारे विदेशी पर्यटकही गोव्याची प्रतिमा बिघडविण्यास हातभार लावत आहेत. २०२० ते जून २०२३ या तीन वर्षांत दोनशेहून  अधिक गुन्हे पोलिसांत असे नोंद झाले, ज्या गुन्ह्यांमध्ये विदेशी व्यक्ती संशयित आरोपी आहेत. अनेक विदेशी पर्यटक गोव्यात एकदा आल्यानंतर परत मायदेशी जातच नाहीत. ते गोव्यातच बेकायदा वास्तव्य करतात. आपला पासपोर्ट जाळून टाकतात व परत जाण्याचा मार्ग बंद करून टाकतात. ही एक वेगळीच समस्या आहे. अशा प्रकारांबाबत पूर्वी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांनीही चिंता व्यक्त केली होती.एरवी संस्कृतीच्या गप्पा ठोकत पणजीत मात्र कसिनोंसाठी पायघड्या अंथरणाऱ्या गोव्यातील सगळ्याच राज्यकर्त्यांनी विचार करण्याची वेळ आली आहे. काँग्रेसने कसिनो आणले व भाजपने त्या कसिनोंचा विस्तार केला. “केसिनोंमे जाना है क्या?” असे पर्यटकांना दलाल विचारतातच; आता खुद्द आमदारांनाच ‘लडकी चाहिए क्या?’ असे विचारण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.      - sadguru.patil@lokmat.com

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन