शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका व्हेनेझुएलातून ५ कोटी बॅरल कच्चे तेल खेचून घेणार; शुक्रवारी बैठका...; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
2
"पंतप्रधान मोदी माझ्यावर नाराज..."; ट्रम्प यांना चुकीची जाणीव! भारतासोबोतच्या संबंधांवर काय म्हणाले?
3
विमा एजंटच्या अधिक कमिशनला चाप लावण्याची तयारी, कंपन्यांनी एका वर्षात वाटले ६०,८०० कोटी रुपये
4
गॅस चेंबर अन् भीषण स्फोट! DMRC इंजिनिअरचं कुटुंब झोपेतच संपलं; काळजाचा थरकाप उडवणारी घटना
5
अवघ्या ५ हजार रुपयांत उभं केलं १३ हजार कोटींचं साम्राज्य! देशातील प्रत्येक घरात होतो वापर
6
सत्तेसाठी भाजपची थेट ओवेसींच्या AIMIM शी हातमिळवणी; BJP च्या राजकारणाचा नवा 'अकोट पॅटर्न'
7
बांगलादेशला आयसीसीचा जोर का झटका...! भारतात खेळावेच लागेल, अन्यथा गुण कापणार; बीसीबीची मागणी फेटाळली
8
६० वर्षांनंतर मोठा खुलासा; १३ व्या वर्षी 'त्या' एका पुस्तकाने कसं बदललं शी जिनपिंग यांचं जग?
9
शेअर बाजारात पुन्हा घसरण, Sensex १९७ अंकांची, तर निफ्टीमध्ये ५९ अंकांची घसरण; हे स्टॉक्स आपटले
10
अकोला हादरले! काकाच्या हत्येचा भीषण बदला; काँग्रेसच्या बड्या नेत्याची मशिदीबाहेर हत्या; आरोपीला बेड्या
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, व्हाल मालामाल; वाचवा केवळ ४०० रुपये; मिळेल २० लाख रुपयांचा निधी
12
पत्नी, सासरे ते कर्मचारी... रोहित पवारांनी MCA मध्ये पेरले हक्काचे मतदार; केदार जाधवचा गंभीर आरोप
13
खळबळजनक! नेस्लेच्या बेबी प्रॉडक्टमध्ये घातक विषारी पदार्थ असण्याची शक्यता; कंपनीने २५ देशांमधून बेबी फूड परत मागवले
14
१५ लाखांना विकलं, म्यानमारच्या काळकोठडीत छळ सोसला; १३ वर्षांनंतर आईला पाहताच लेक धाय मोकलून रडला!
15
शूटिंग करणाऱ्या सिनेमाच्या क्रू मेंबर्सला बंदी बनवलं; भोपाळमध्ये घडला धक्कादायक प्रकार
16
...तर माझ्यावर महाभियोग आणून हटवतील; मध्यावधी निवडणुकांवरून डोनाल्ड ट्रम्प धास्तीत  
17
अमेरिका आता मोक्याचा ग्रीनलँड गिळंकृत करणार; ट्रम्प यांच्या मनसुब्यांना व्हाईट हाऊसचा हिरवा कंदील, नाटो हादरले...
18
मुकेश अंबानींना ४.३७ अब्ज डॉलर्सचा झटका; गौतम अदानीही टॉप-२० मधून अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर, कारण काय?
19
नात्याला काळिमा! अल्पवयीन मेहुणीला केलं प्रेग्नेंट, बाळ दगावलं अन् नराधम भावोजी फरार!
20
मोठा ट्विस्ट! ‘काँग्रेस का हाथ, भाजप के साथ’; भ्रष्टाचारमुक्त शहराचा नारा, ‘एकनाथां’चा सोडला हात
Daily Top 2Weekly Top 5

विश्वासाचे पानिपत! पाटलांची साहित्य संमेलनातील व्यवहाराची झाडाझडती अपरिहार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 04:58 IST

विश्वास पाटलांच्या मनातला गावगाडा अद्यापही गेलेला नाही, याची त्यामुळे साक्ष पटली.

सध्या नक्की कोणाची कोणाशी युती आहे, हेच समजत नाही! कधी अचानक युती होते, तर कधी आकस्मिकपणे आघाडी तुटते. राजकारणात हे सर्व सुरू असताना, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी भलतीच युती जाहीर करून टाकली आहे! ‘बिघडलेले गाव सुधारायचे असेल, तर पाटील आणि कुलकर्णी यांना गावात युती करावीच लागते’, असे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले. 

विश्वास पाटलांच्या मनातला गावगाडा अद्यापही गेलेला नाही, याची त्यामुळे साक्ष पटली. स्वतःकडे ‘पाटील’ म्हणून पाहणारे अध्यक्ष, इतरांकडेही जोशी-कुलकर्णी असेच बघत असतील, तर साहित्य आणि सांस्कृतिक विश्वाचे भवितव्य काय असणार? नेणिवेत आणि जाणिवेत, हे असे सगळे बाळगणारा लेखक अखिल भारतीय वगैरे म्हटल्या जाणाऱ्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो, हेच मुळात धक्कादायक. विश्वास पाटलांनी बऱ्याच कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यापैकी काही बऱ्या आहेतही. त्यांच्या अनेक कादंबऱ्या भरपूर खपल्याही. मात्र, त्यांची वैचारिक बैठक काय आहे, याचा पुरावा अधूनमधून मिळत असतोच. म्हणूनच ते संमेलनाचे अध्यक्ष झाले, हा भाग वेगळा. नाहीतर, जे साहित्य संमेलन संपूर्णपणे राजकीय नेत्यांनी बळकावलेले आहे, अशा व्यासपीठावर काही बोलण्याची हिंमत त्यांनी दाखवली असती! 

याच सातारा जिल्ह्यामध्ये कराडला १९७५ मध्ये साहित्य संमेलन झाले होते. दुर्गा भागवत संमेलनाच्या अध्यक्ष होत्या.  राजकारण्यांनी संमेलनाचे व्यासपीठ बळकावू नये, अशी थेट भूमिका घेत दुर्गा भागवतांनी साक्षात यशवंतराव चव्हाण यांच्यावर श्रोत्यांमध्ये बसण्याची वेळ आणली होती. अर्थात, ते यशवंतराव होते आणि त्या दुर्गा भागवत होत्या. याच साताऱ्याशेजारी सांगलीला २००८ मध्ये साहित्य संमेलन झाले, तेव्हा प्रा. म. द. हातकणंगलेकर हे संमेलनाचे अध्यक्ष, तर अरुण साधू मावळते अध्यक्ष होते. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील संमेलनाच्या उद्घाटक होत्या. या राजकीय गर्दीमध्ये साहित्य हरवून गेले. संमेलनाचा ताबा राजकीय नेत्यांकडे देऊ नका, अशी भूमिका घेत अरुण साधूंनी या संमेलनावर बहिष्कार घातला आणि ते तडक निघून गेले. 

इथे मात्र काय घडले? साधी गोष्ट आहे. पाटलांनी साहित्यिक म्हणून भाषण करावे, अशी अपेक्षा स्वाभाविक आहे. प्रत्यक्षात त्यांनी, मुख्यमंत्र्यांनी आपल्याला शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे करण्याची जबाबदारी दिली, याबद्दल त्यांचे आभार मानले. याचा काय संबंध? विश्वास पाटील हे निवृत्त सनदी अधिकारी आहेत. अधिकारी असताना त्यांनी काय पराक्रम केले, ते आणखी वेगळेच. मात्र, सनदी अधिकारी असताना, सरकारने त्यांच्यावर एखादी जबाबदारी सोपवली, तर त्याचा उल्लेख इथे करण्याची आवश्यकता काय? संमेलनाचा अध्यक्ष हा सत्ताधीशांच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबून गेलेला आहे, असे चित्र असणे किती भयंकर! 

भारताचा इतिहास काय सांगतो? राजकुमारी अमृत कौर या  संसदेमध्ये होत्या. त्या राजघराण्यातल्या. त्यामुळे राजकुमारी असे विशेषण त्यांच्यासाठी वापरले जात असे. त्यांना कोणीतरी सांगितले की, आता लोकशाही आहे. कोणी राजा नाही. कोणी प्रजा नाही. राजकुमारी अमृत कौर यांनी ते मान्य केले आणि यापुढे माझ्यासाठी ‘राजकुमारी’ हे विशेषण वापरू नका, असे सांगितले. इथे विश्वास पाटलांनी मात्र ‘राजा वास्तवात कसा असेल, याचे दर्शन घडवणारे आमचे कुर्रेबाज करारी उदयनराजे भोसले’ असा उल्लेख केला! एकूणच आनंदी आनंद. एका परिसंवादाला श्रोते फारच कमी होते. त्या परिसंवादामध्ये बोलताना, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष  म्हणाले, जेव्हा काही ऐतिहासिक घटना घडत असतात, तेव्हा लोक कमीच असतात. असे म्हणताना त्यांनी, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेसोबत सावरकरांच्या ‘अभिनव भारत’च्या स्थापनेची तुलना केली! आता काय बोलावे? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पूर्वी ग्रंथकार संमेलन म्हणून भरवले जात होते, तेव्हा ‘घालमोड्या दादांचे संमेलन’ म्हणून महात्मा फुले यांनी त्यावर टीका करीत या संमेलनावर बहिष्कार घातला होता. 

१८८५ मध्ये महात्मा फुलेंनी ग्रंथकार सभेला पत्र लिहिले. त्यात म्हटले, ‘उंटावरून शेळ्या वळणाऱ्या तुमच्या घालमोड्या दादांच्या साहित्य संमेलनाला मी येणार नाही.’ महात्मा फुले हे द्रष्टे होते, हे खरेच; पण आता तरी संमेलन बदलले असेल, या विश्वासाचे मात्र या संमेलनाने ‘पानिपत’ केले. या पूर्ण साहित्य व्यवहाराची ‘झाडाझडती’ आता अपरिहार्य आहे! 

English
हिंदी सारांश
Web Title : Literary Meet's Credibility at Stake: Patil's Dealings Under Scrutiny

Web Summary : The literary conference faces criticism over President Patil's political alliances and perceived obligations to authorities. Concerns arise about the event's deviation from literary focus towards political endorsements, prompting calls for transparency and a reevaluation of its dealings.
टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनVishwash Patilविश्वास पाटील Satara areaसातारा परिसर