शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

तो सर्वात यशस्वी कर्णधार होता, ‘महान’ मात्र झाला नाही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 05:21 IST

बीसीसीआय क्रिकेटपटूंच्या बाबतीत नेहमी कडक बापाच्या भूमिकेत असतं, विराट कोहलीला तो आज्ञाधारक मुलगा होणं काही शक्य नव्हतं !

- द्वारकानाथ संझगिरी, ख्यातनाम क्रीडा समीक्षकविराट कोहलीने आता कसोटीचं नेतृत्वही सोडलं. तो आता राजा राहिला नाही, प्रजेचा भाग झालाय !- हे अपेक्षितच होतं. आपण मालिका जिंकलो असतो तर तिथल्या तिथे “ जितं मया” म्हणत  नेतृत्वाची राजवस्त्र त्याने बीसीसीआयकडे  फेकली असती आणि तो शिखरावरून निवृत्त झाला असता. पराभव झाल्यामुळे त्याने एक दिवस विचार केला आणि “ कृतार्थ मी, कृतज्ञ मी” म्हणत नेतृत्व सोडलं.त्याचं आणि बीसीसीआयचं  यापुढे पटणं कठीण होतं. बीसीसीआय  क्रिकेटपटूंच्या बाबतीत कडक बापाच्या भूमिकेत असतं, विराटला आज्ञाधारक मुलगा होणं शक्य नव्हतं. विनोद रॉय  मंडळाचे सर्वेसर्वा असताना त्यांनी विराटचे लाड  पुरवले. अगदी त्याला रवी शास्त्री प्रशिक्षक म्हणून देण्यापर्यंत.  मग जय शहा आणि गांगुली येताच मंडळाची भूमिका ताठर झाली.  ठिणग्या उडाल्या. अलीकडच्या ठिणग्या तर आग लागावी इतक्या प्रखर होत्या. “मी खरं बोलतोय की तू “हा विराट आणि गांगुलीमधला वाद चक्क चव्हाट्यावर आला. त्यात पराभव; त्यामुळे कोहलीच्या मनात डच्चू मिळण्याची भीती निर्माण झाली असेलच. पूर्वी दिग्गज पण पराभूत कर्णधार फेकले गेले होतेच. मग तो इंग्लंडला इंग्लंडमध्ये आणि वेस्ट इंडिजला वेस्ट इंडिजमध्ये हरवणारा अजित वाडेकर असो, बेदी असो, व्यंकट असो, की वेंगसरकर! याची पूर्ण कल्पना  विराटला होती. शिवाय ड्रेसिंग रूम बदलली. तिथे आता रवी शास्त्री नव्हता. सपोर्ट स्टाफमधली त्याची खास मंडळी नव्हती. 

 नेतृत्व सोडण्याचा निर्णय ब्रँडच्या दृष्टीने थोडा कठीण असावा. कर्णधाराची ब्रँड व्हॅल्यू ही नेहमीच इतरांपेक्षा जास्त असते. हल्लीचे खेळाडू ब्रँडचा विचार आधी करतात. पण विराट अशा उंचीवर आहे, की त्याला पैशाची फार फिकीर नसावी. असे आर्थिक तोटे त्याला साधा ओरखडाही काढू शकत नाहीत. विराटचं कॅप्टन म्हणून मूल्यमापन कसं करायचं? - यशाचा निकष लावला तर भारतीय क्रिकेटमधला तो सर्वांत यशस्वी कर्णधार ठरतो! ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवण्याचा विक्रम त्याच्या संघाने केलाय. त्याच्या नेतृत्वाच्या टोपीमध्ये अनेक मानाचे तुरे खोवलेले आहेत, यात काही वादच नाही. एक महत्त्वाचा तुरा त्यात नाही, तो म्हणजे आयसीसी ट्रॉफी... पण  कुणाच्या करिअरमध्ये परिपूर्णता असते? ब्रॅडमनसारख्या माणसालासुद्धा १००च्या सरासरीपासून कणभर दूर राहावं लागलंच की !
विराट फलंदाजीच्या बाबतीतही सेनापती राहिला. किंबहुना नेतृत्वाच्या जबाबदारीने त्याची फलंदाजी अधिक फुलली. तो मॅच विनर फलंदाज ठरला. कोहलीने भारतीय क्रिकेटमध्ये आक्रमकता आणली. परदेशी खेळाडूंच्या वलयाला कस्पटाप्रमाणे लेखायला सुरवात सर्वात प्रथम गांगुलीने केली होती. गांगुलीने भारतीय खेळाडूंना गोऱ्या खेळाडूंच्या नजरेला कशी नजर भिडवायची ते शिकवलं.  विराट फारच पुढे गेला. तो गोऱ्यांच्या डोळ्यात वडस होऊन वाढण्याइतपत आक्रमक झाला. इतका की ऑस्ट्रेलियन खेळाडू त्याच्याकडून चार गोष्टी शिकले असते ! पण काही वेळा आक्रमकपणा, बेजाबदारपणा आणि बालिशपणा यातल्या रेषा पुसल्या जायला लागल्या. त्याचं मैदानावरचं वर्तन अधिकाधिक बेजबाबदार व्हायला लागलं. परवाच्या त्या कसोटीमध्ये ते  लांच्छनास्पदच होतं. कितीही निर्णय तुमच्या विरोधात गेले तरी ज्या पद्धतीने विराट त्या दिवशी वागला - स्टंपच्या माईकमध्ये मुद्दामहून बोलणं वगैरे- ते गैरच होतं.  त्याला त्याच्या भावना  लपवता येत नाहीत. गांगुलीच्याही चेहऱ्यावर त्याच्या भावना दिसायच्या. प्रत्येकजण काय धोनी होऊ शकत नाही. पण तरीसुद्धा मैदानावर किती आणि कसं व्यक्त व्हायचं, यालाही काही मर्यादा असतात. कर्णधार म्हणून त्या पाळाव्या लागतात. डावपेचदृष्ट्या विराट धोनीसारखा धूर्त कधीही नव्हता. विशेषतः कसोटी स्तरावर डावपेचाच्या बाबतीत त्याने अनेक वेळेला अनेक चुका केल्या. काही विशेष खेळाडूंवर त्याचा लोभ होता.  एखादा त्याच्या मनातून उतरला की मग विराट कुठल्याही टोकाला जायचा. विराट चांगला कर्णधार होता,  यशस्वी कर्णधार होता.. पण तो महान कर्णधार मात्र कधीही नव्हता. - तो महान फलंदाज आहे, आणि आता नेतृत्वाचा दबाव डोक्यावरून गेल्यानंतर तो महानतेच्या आपल्या कक्षा नक्कीच रुंदावू शकतो.

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीMS Dhoniमहेंद्रसिंग धोनीSaurav Gangulyसौरभ गांगुली