शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाचा गड शिवसेनेसाठी अवघड!

By रवी ताले | Updated: January 30, 2018 00:20 IST

विदर्भाचा गड शिवसेनेसाठी तर अवघड आहेच; पण तो सर करताना भाजपाचाही चांगलाच घाम निघणार आहे. रसातळाला गेलेल्या काँग्रेससाठी मात्र पुनरागमनाची ही उत्तम संधी असणार आहे.

कुणाच्या डोळ्याची पापणी प्रथम लवते, असा एक खेळ लहान मुले खेळत असतात. गत विधानसभा निवडणुकीपासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेदरम्यान तोच खेळ सुरू होता. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका भाजपा व शिवसेना स्वतंत्र लढणार, ही काळ्या दगडावरची रेघ होती. युतीचा पोपट कधीच मेला होता. ती बातमी कोण फोडणार, एवढाच काय तो प्रश्न होता! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकी शिवसेना स्वबळावर लढविणार असल्याचे घोषित करून, त्या प्रश्नाचे उत्तरही देऊन टाकले आहे.राजकीय निरीक्षकांच्या डोक्यात वळवळत असलेल्या प्रश्नाचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी देऊन टाकले असले तरी, त्या उत्तराने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक प्रश्नांना जन्म दिला आहे. भाजपा आणि शिवसेनेने १९८९ पासून महाराष्ट्रात युती करूनच प्रत्येक लोकसभा व विधानसभा निवडणूक लढविली. अपवाद फक्त २०१४ मधील विधानसभा निवडणुकीचा! त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्ररीत्या लढवायची म्हटल्यास, १९८९ पासून ज्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवलीच नाही, त्या मतदारसंघांमध्ये प्रबळ उमेदवाराचा शोध घेण्यापासून, मतदारसंघाची बांधणी करण्यापर्यंतचे आव्हान, उभय पक्षांना पेलावे लागणार आहे.विदर्भापुरता विचार करायचा झाल्यास, शिवसेनेसाठी हे आव्हान तुलनात्मकरीत्या अधिक अवघड असणार आहे. त्यातही पश्चिम विदर्भाच्या तुलनेत पूर्व विदर्भातील वाटचाल सेनेसाठी अधिकच खडतर सिद्ध होणार आहे. लोकसभेचा रामटेक व विधानसभेचा वरोरा मतदारसंघ वगळता, सेनेचा पूर्व विदर्भात कुठेही दबदबा नाही. लोकसभेचा विचार केल्यास, पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलडाणा व वाशिम-यवतमाळ हे तीन मतदारसंघ सेनेच्या ताब्यात आहेत आणि तिन्ही मतदारसंघांमध्ये सेनेचा बºयापैकी वरचष्माही आहे. पूर्व विदर्भात मात्र रामटेक वगळता सेनेला कधीच यश लाभले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे १९८९ पासून २०१४ पर्यंतच्या प्रत्येक लोकसभा निवडणुकीत सेनेला भाजपाची साथ होती. आता स्वतंत्ररीत्या निवडणूक लढविताना, ताब्यातील मतदारसंघ टिकवून ठेवण्याचे शिवधनुष्य पेलणे, सेनेसाठी सोपे असणार नाही.सेनेच्या तुलनेत भाजपासाठी विदर्भ सोपा असला तरी, एकाच वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व सेनेला अंगावर घ्यायचे असल्याने, भाजपालाही चांगलाच घाम गाळावा लागेल, हे स्पष्ट आहे. गेल्या निवडणुकीत सेना भाजपाच्या साथीला होती, तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. आगामी निवडणुकीत भाजपा व सेना एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकतील, तर काँग्रेस व राकाँची आघाडी कायम असेल. भरीस भर म्हणून भाजपाच्या काही आमदार-खासदारांचाच पक्षाविषयी भ्रमनिरास होऊ लागला आहे. काही जिल्ह्यांमध्ये गटबाजीही मोठ्या प्रमाणात उफाळली आहे. वरून विदर्भवाद्यांची नाराजी आहेच!  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाElectionनिवडणूक