शहरं
Join us  
Trending Stories
1
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
2
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
3
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
4
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
5
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
6
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
7
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
8
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
9
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
10
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
11
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
12
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
13
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
14
छेड काढल्याचा आरोप, वैद्यकीय अधिकाऱ्याला नातेवाईकांची मारहाण
15
२४ तासांत ७ स्फोटांनी हादरले बलुचिस्तान! रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवला; पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला
16
गीता जयंती २०२५: सगळी भगवद्गीता नको, सुखी जीवनासाठी ५ उपदेश कायम लक्षात ठेवा; वाचा, गीतासार
17
आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकल्याला बिबट्या घेऊन गेला, गावात भीतीचे वातावरण...
18
जगाला धक्का! नामिबियात 'एडोल्फ हिटलर' सलग पाचव्यांदा विजयी; वाद वाढताच नेत्याने घेतला मोठा निर्णय...
19
'रनमशिन' कोहलीचा मोठा पराक्रम! क्रिकेटच्या देवाला मागे टाकत बनला वनडेतील शतकांचा 'बादशहा'
20
कॅनडाच्या किनाऱ्यावर 'UFO'? कार्गो जहाजाच्या कॅमेऱ्यात घटना कैद, पाहा VIDEO...
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 07:32 IST

भारत-अमेरिकेच्या व्यापार क्षेत्रातील ताण अजून ओसरलेला नाही, आणखी चिघळण्याआधी तो दूर करण्याची इच्छा दोन्ही बाजूंना आहे असे दिसते.

- हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

वॉशिंग्टनबरोबर तणावात असलेले संबंध सुधारण्यासाठी मोदी तातडीने पावले टाकत आहेत, असे दिसते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पुन्हा जुळवून घेण्यासाठी राजनैतिक प्रक्रियेतील शिष्टाचार त्यांनी बाजूला ठेवले आहेत. अमेरिकेचे नियोजित राजदूत सर्जिओ गोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपली कागदपत्रे सादर करण्यापूर्वीच दिल्लीमध्ये आले. त्यामुळे राजनैतिक वर्तुळांमध्ये भुवया उंचावल्या गेल्या. चालू महिन्यांच्या अखेरीस क्वालालंपूरमध्ये मोदी आणि ट्रम्प यांची भेट घडविण्याच्या दृष्टीने गोर भारतात आले असे मानले जात आहे.  तणावात गेलेले संबंध सुधारण्याची दोन्ही बाजूंना किती निकड आहे हेच दिसते. 

रशियाकडून क्रूड तेल खरेदी करण्याची शिक्षा म्हणून भारतीय निर्यातीवर भरमसाठ आयात शुल्क ट्रम्प यांनी लावल्यामुळे उभय बाजूंचे संबंध दुरावले आहेत. या पार्श्वभूमीवर गोर भारतात आले. ते राजदूत म्हणून आले की विशेष दूत म्हणून आले, असा प्रश्न आता पडला आहे. ३८  वर्षीय गोर हे ट्रम्प यांचे निकटवर्ती मानले जातात. त्याचप्रमाणे ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ मोहिमेतलेही ते महत्त्वाचे भागीदार आहेत. परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांना भेटून नंतर ते मोदी यांना भेटले.

ऐतिहासिक गाझा शांतता योजनेवर मोदी यांनी ९ ऑक्टोबरला ट्रम्प यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले; त्या पार्श्वभूमीवर हे जुळणीचे प्रयत्न होताना दिसतात. महिनाभरात मोदी आणि ट्रम्प यांच्यात दोनदा बोलणे झाले. व्यापार क्षेत्रातील ताण अजून ओसरलेला नाही, तरी वैरभावात रूपांतर होण्याच्या आधी तो दूर करण्याची इच्छा दोन्ही बाजूंना आहे असे दिसते.  

राहुल यांचा हायड्रोजन बॉम्ब फुसका? राहुल गांधी यांनी राजकीय हायड्रोजन बॉम्ब टाकण्याचे सूतोवाच करून आता जवळपास महिना उलटला आहे. त्यांचे सूतोवाच खूप स्फोटक होते. हा बॉम्ब पडल्यावर सगळा खेळ खल्लास होईल, असे त्यांनी जाहीर करून टाकले. परंतु, अद्यापपावेतो हे अस्त्र भात्यातून बाहेर आलेले नाही. एकतर तो बॉम्ब आवाज न करता टिक टिक करीत असेल किंवा विस्मरणात गेला असेल. त्याआधी राहुल यांनी कर्नाटकातील महादेवपूर मतदारसंघातील मतदार यादी घोटाळ्यावर २२ पानी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करून ‘अणुबॉम्ब’ टाकण्याचा प्रयत्न केला. लाखभर मते चोरीला गेली आहेत, असा दावा करताना त्यांनी ते कसे केले गेले याचे पाच मार्ग सांगितले इतकेच! पुढे काही नाही. निषेध नाही, न्यायालयीन खटला नाही, कोणताच पाठपुरावा नाही. काँग्रेस कर्नाटकात सत्तेवर असूनही पुढे काहीच झाले नाही. 

आता सगळ्यांचे लक्ष हायड्रोजन बॉम्बकडे वळले आहे. तो अधिक विध्वंसकारी असेल, असे म्हटले गेले होते. आता राहुल पुढचा गौप्यस्फोट वाराणसीवर करतील, असे बोलले जाते. राहुल बिहार निवडणुकीसाठी आपला दारूगोळा राखून ठेवत आहेत असे काहींना वाटते. मतदार याद्यांतील सुधारणांवरून राहुल आणि तेजस्वी यादव आक्रोश करताहेत. परंतु, मतचोरीच्या आरोपांचे पुरावे न दिल्याने सुप्रीम कोर्टात तोंडघशी पडावे लागल्यानंतर आता या मुद्द्याचा फारसा उपयोग होईल, असे वाटत नाही.

खूप सारे फटाके फुसके निघाल्यामुळे काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात उदासी आहे. काँग्रेसला हा जुना शाप असावा. मोठमोठे दावे करायचे आणि बाकी काहीच करायचे नाही. पक्ष प्रसारमाध्यमात लढाया जाहीर करतो. परंतु, लढत मात्र नाही. 

 जाता जाता  आणखी एका बाबतीत राहुल गांधी यांनी कृती  केलीच नाही. परत कधी येणार हे न सांगताच ते २७ सप्टेंबरला ब्राझील, कोलंबिया, पेरू आणि चिलीच्या दौऱ्यावर निघून गेले. राजनैतिक आणि राजकीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी ही भेट असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. भेट अधिकृत असली तरी तिथे दृश्य परिणाम मात्र फारच केविलवाणे ठरले. काँग्रेसची रालोआबरोबर बिहारमध्ये जुंपलेली आहे. हरयाणात दलित पोलिस महानिरीक्षकाच्या आत्महत्येमुळे गोंधळाचे वातावरण आहे आणि राहुल गांधी विदेशी राजकीय संबंधांवर भर देत आहेत तेही दोन आठवडे खर्चून! अगदी लढाईचा काळ असा वाया घालवून काय हाती लागणार? समोरचे प्रश्न अंगावर घेण्याची पक्षाची एकंदर क्षमताच त्यामुळे अडचणीत आल्यासारखी दिसते.    harish.gupta@lokmat.com 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump and Modi: Efforts in Delhi to 'Reconcile' Relations

Web Summary : Modi is swiftly acting to mend strained relations with the US, bypassing protocol to engage with Trump's envoy. Trade tensions remain, but both sides aim to resolve issues before they escalate. Meanwhile, Rahul Gandhi's promised political bombshell remains undelivered.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिका