शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख: अनाकलनीय राज ठाकरे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 09:56 IST

Raj Thackeray: २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज यांची प्रतिक्रिया होती - अनाकलनीय. राज यांच्या राजकारणाचे वर्णनही या एकाच शब्दात केले जाऊ शकते. राज्यकर्त्यांना कानफटीत लगावतानाच ते सरकारला पाठिंबाही देऊन टाकतात. त्यामुळेच सभेला प्रचंड गर्दी करणारेही राज यांच्या झोळीत मत मात्र टाकत नाहीत.

राज ठाकरेंचा पक्ष स्थापन झाला, त्याच सुमारास चोवीस तास बातम्या दाखवणाऱ्या मराठी वृत्तवाहिन्या आल्या. राज यांची भाषणे तेव्हा ‘लाइव्ह’ दाखवली जात आणि त्या भरवशावर या वाहिन्यांचा ‘टीआरपी’ उच्चांक गाठत असे. दीड-दोन दशके उलटली, तरी राज यांच्या भाषणांचा ‘टीआरपी’ तसाच टिकून आहे. राज यांच्या पक्षाचा एकही सदस्य विधिमंडळात अथवा संसदेत नाही, तरीही राज ठाकरे यांचा प्रभाव का ओसरत नाही? हा प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो - ‘राज यांची जादू कायम असतानाही त्यांच्या पक्षाचा एकही सदस्य आज विधिमंडळात वा संसदेत का नाही?’ १९९०च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे नावाचा तरुण महाराष्ट्राने सर्वप्रथम पाहिला, तेव्हा विशीत असणारे राज आता साठीकडे निघाले आहेत. तरीही, त्यांचा करिष्मा कायम आहे. ‘बाळासाहेब ठाकरेंचा वारसदार’, अशी ओळख असणाऱ्या राज यांनी बाळासाहेबांच्या हयातीतच बंड केले आणि वर्षभरात आपला स्वतंत्र पक्ष स्थापन केला. त्यानंतर झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तेरा जागा जिंकल्या. अवघ्या महाराष्ट्रात राज यांचा झंझावात होता. प्रामुख्याने तरुण आणि महिला यांच्यावर राज यांचे गारूड होते. महाराष्ट्राच्या राजकारणात तोवर फारसे ‘हॅपनिंग’नव्हते. राज यांच्या निमित्ताने महाराष्ट्रात काही नवे घडत आहे, असे अनेकांना वाटत होते. तो काळच वेगळा होता. अमेरिकेत बराक ओबामा अध्यक्ष होत होते. ‘अरब क्रांती’ने अनेक देशांमध्ये राज्यकर्त्यांना आव्हान दिले होते. ट्युनिशियापासून इजिप्तपर्यंत कैक देशांमध्ये सत्तांतर घडत होते. भारतात अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा भडका उडत होता. त्याच काळात राज ठाकरे नवा महाराष्ट्र घडवण्याची भाषा करत होते. व्यंगचित्रकार असणारे राज समकालीन राजकारणाच्या व्यंगावर नेमके बोट ठेवत होते. महाराष्ट्राच्या साचेबद्ध राजकारणाला कंटाळलेल्यांना हा ‘स्वरराज’ त्याचा आवाज आहे, असे वाटू लागले होते. त्याला कारणही तसेच होते.

साधारणपणे जी भूमिका राजकारणी कधीच मांडू शकत नाहीत, ती मांडण्याचे साहस राज करत होते. त्याचा ताजा पुरावा म्हणजे रविवारच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषण. कुंभमेळ्याबद्दल या स्वरूपाचे जाहीर भाष्य करणे कोणत्या नेत्याला आज शक्य आहे?, औरंगजेबाच्या कबरीवरून जात-धर्माचे राजकारण करणाऱ्यांना असे ठोकून काढणे किती नेत्यांना शक्य आहे?, लोकप्रिय घोषणांना विरोध करत, मरणासन्न नद्यांचा विषय पृष्ठभागावर आणण्याची समज किती नेत्यांमध्ये आहे?, असे सगळे आहे आणि तरीही निवडणुकीच्या राजकारणात राज ठाकरे अपयशी का ठरत आहेत?, २००९च्या निवडणुकीनंतर तेरा आमदार असलेला हा पक्ष त्यानंतरच्या तिन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये अपयशी ठरला. ज्या नाशिकची महानगरपालिका लोकांनी राज यांच्या पक्षाकडे दिली, त्या नाशिकमध्येही आज पक्षाची स्थिती वाईट आहे. तेरा आमदार विधानसभेत असताना, विधिमंडळाचे अधिवेशन सोडून आपल्या आमदारांना ‘गुजरात मॉडेल’ बघण्यासाठी पाठवणारे राज ठाकरे २०१९च्या लोकसभा निवडणुकीत ‘मोदी- शहांना राजकारणाच्या पटलावरून हद्दपार करा’, असे सांगू लागले. लोकसभा निवडणुकीत भाजपने विक्रमी यश मिळवल्यानंतर मात्र राज एकदमच शांत झाले. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत राज दिसलेच नाहीत. शिवसेनेतील फूट आणि अजित पवारांच्या निर्णयावर त्यांनी कडाडून टीका केली खरी, पण गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र महायुतीला ‘बिनशर्त’ पाठिंबा दिला. नंतरची विधानसभा लढवताना आपण सत्तेत असणार आहोत, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आणि प्रत्यक्षात मात्र स्वतंत्रपणे निवडणूक लढवून ते शून्यावर बाद झाले !

२०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज यांची प्रतिक्रिया होती - अनाकलनीय. राज यांच्या राजकारणाचे वर्णनही या एकाच शब्दात केले जाऊ शकते. राज्यकर्त्यांना कानफटीत लगावतानाच ते सरकारला पाठिंबाही देऊन टाकतात. त्यामुळेच सभेला प्रचंड गर्दी करणारेही राज यांच्या झोळीत मत मात्र टाकत नाहीत. सत्ताधीशांवर राज जे कोरडे ओढतात, ते जमलेल्या तमाम बांधवांना, भगिनींना आणि मातांना पटत नाही, असे नाही. मात्र, राज हे त्यावर पर्याय ठरू शकतील, अशी खात्री लोकांना वाटत नाही. हे असे अनाकलनीय असणेच आपल्या इंजिनसमोरचा सगळ्यात मोठा अडसर आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMaharashtraमहाराष्ट्र