शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

काळ मोठा कठीण आला... सर्वसामान्यांच्या भाळी महागाईच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 08:32 IST

भारतीय रिझर्व्ह बँक, व्यावसायिक बँकांना ज्या दराने कर्ज देते, तो व्याजदर म्हणजे रेपो रेट! रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली आहे म्हणजेच, आता बँकांना जो पैसा व्यवसायासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून उपलब्ध होणार आहे, त्यावरील व्याजदर अर्ध्या टक्क्याने वाढला आहे.

आटोक्याबाहेर जाऊ पाहणारी चलनवाढ रोखण्यासाठी अखेर भारतीय रिझर्व्ह बँकेने अपेक्षेप्रमाणे रेपो दरात वाढ केली. चालू आर्थिक वर्षात मे महिन्यापासून रेपो दरात केलेली ही तिसरी वाढ आहे. चलनवाढ आणि रेपो दर म्हणजे काय, हे लक्षात घ्यायला हवे. एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये वस्तूंच्या किमतीत अनियंत्रित वाढ होते म्हणजेच महागाई वाढते तेव्हा त्याला अर्थशास्त्रीय भाषेत ‘चलनवाढ’ म्हणतात. एखादी गोष्ट दहा महिन्यांपूर्वी समजा दहा रुपयांना मिळत असेल आणि सध्या तीच वस्तू १२ रुपयांना मिळत असेल, तर दोन रुपयांची महागाई हा चलनवाढीचा परिणाम आहे.

भारतीय रिझर्व्ह बँक, व्यावसायिक बँकांना ज्या दराने कर्ज देते, तो व्याजदर म्हणजे रेपो रेट! रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली आहे म्हणजेच, आता बँकांना जो पैसा व्यवसायासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून उपलब्ध होणार आहे, त्यावरील व्याजदर अर्ध्या टक्क्याने वाढला आहे. बँकांनाच मिळणारा पैसा महागल्याने त्याची तोशीस बँका स्वतःवर न घेता ग्राहकांना कर्ज देतेवेळी त्यांच्या खिशातून वसूल करतील. त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे, बँकांनी व्याजदरात वाढ केली की, ती केवळ कर्जावरील व्याजदरातच होते असे नाही तर, ग्राहकांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरातही वाढ होते. त्यामुळे बँकेत ज्यांच्या मुदतठेवी आहेत, त्यांना या व्याज दरवाढीमुळे काही प्रमाणात वाढीव दराने व्याज मिळेल. पण, या ठेवींची मुदत पूर्ण झाल्यानंतर जेव्हा पैसे काढले जातात, त्यावेळी त्यावर १० टक्क्यांची कर आकारणी  होतेच. सन २०१८ नंतर रिझर्व्ह बँकेने व्याजदरात वाढ केली नव्हती.  त्यानंतर कोरोना काळामुळे जागतिक अर्थचक्रच रुतले. सर्वसामान्यांची होरपळ सुरू झाली. त्यातल्या त्यात दिलासा मिळाला तो व्याजदरात झालेल्या किरकोळ दरकपातीचा. मात्र, असाध्य आजारावर तापाची गोळी अंगदुखी थांबविण्यासाठी जितका दिलासा देऊ शकते, तितकाच काय तो दिलासा त्यातून मिळाला. त्यानंतर, आर्थिक आव्हानांनी आ वासला. इंधनाच्या किमतींचा आलेख चढत्या रेषेवर आला. तेलाच्या किमतींचा भडका उडाला. त्यामुळे सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले.  

कोरोना काळातून सावरत असलेल्या अर्थव्यवस्थेला नव्याने जेमतेम पालवी फुटेल असे वाटत असतानाच, रशिया-युक्रेन युद्ध आणि आता चीन-अमेरिका तणाव अशा जागतिक अस्थिरतेमुळे जगाच्या अर्थकारणाची दिशा दाखविणारा वातकुक्कुटच दिशाहीनपणे गरगर फिरू लागला आहे. कोरोनाकाळात एकीकडे नोकरदारांची पगारकपात झाली, नोकऱ्या गेल्या आणि पगारवाढ तर दूरच राहिली. दुसरीकडे लघु-मध्यम उद्योगांपासून ते मोठ्या उद्योगसमूहांपर्यंत साऱ्यांचाच अर्थखोळंबा झाला. त्या पार्श्वभूमीवर जर या दरवाढीचा विचार करायचा, तर सुरुवातीला सुलभ वाटणारी पायवाट आगामी काळात दमछाक करायला लावणाऱ्या डोंगराच्या अवघड कपारीत घेऊन जाणारी आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात काही कंपन्यांकडून नोकरदारांची पगारवाढ झालेली असली तरी अनेक कंपन्यांत ती झालेली नाही, हे वास्तव आहे. आधीच इंधन दरवाढ, परिणामी घाऊक आणि किरकोळ बाजारात महागाईच्या निर्देशांकात सातत्याने होणाऱ्या वाढीची झळ रोजच्या जेवणाच्या ताटापर्यंत येऊन ठेपली आहे. उद्योगधंद्यांच्या बाबतीत बोलायचे तर, लहान-मोठा उद्योग चालविण्यासाठी कंपन्या कर्ज घेत आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र, आधीच जीएसटीमुळे त्रस्त व्यापाऱ्यांना आगाऊ कर भरणा करावा लागत असल्यामुळे खेळते भांडवल उपलब्ध होण्याची वानवा आहे. त्यात उद्योगांसाठी काढलेल्या कर्जावरील व्याजदरात होणाऱ्या वाढीमुळे संचितातील अधिक पैसे खर्च पडणार आहेत. शेवटी मुद्दल आणि काही प्रमाणात नफा काढत उद्योग सुरू ठेवायचा म्हटले तर उत्पादनाच्या किमती वाढविण्याशिवाय त्या उद्योजकांसमोरही पर्याय नाही.

उत्पादनांच्या किमती वाढल्या की, पुन्हा त्याचा भार खरेदीदार असलेल्या ग्राहकावर येऊन पडतो.  भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकी डॉलर जरी वाढत असला तरी, निर्यात करून चार पैसे मिळवू असा विचार केला तरी, निर्यातीचे धरसोडीचे धोरण आणि भारतीय मालाची गुणवत्ता यांमुळे तिथेही अडचणींच्या अनंत बाणांनी उद्योजकाला शरपंजरी पडायला होत आहे. त्यामुळे या महागाईच्या चक्रव्यूहात आता सरकारचा अभिमन्यू होतो का,  हे सहा महिन्यांत स्पष्ट होईल. पण या चक्रभेदाच्या प्रक्रियेत, सर्वसामान्यांच्या भाळी मात्र महागाईच्या फुफाट्यात भरडले जाण्याचेच प्राक्तन आहे, हे निश्चित !

टॅग्स :InflationमहागाईReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक