A time of conscience-wise | विवेकाचे भान देणारा काळ

विवेकाचे भान देणारा काळ

- गुरुमाऊली प. पू. अण्णासाहेब मोरे

सामुदायिक ऐक्य व बांधिलकीचा उत्कर्षकारी इतिहास हे भारताचे आगळेवेगळे वैभव आहे. भारतीय अध्यात्मात सर्व शास्त्रे सामावलेली आहेत. ही शास्त्रे जगण्याची सुंदरता व मनाची विशालता वाढवणारी, आनंदाचे साम्राज्य निर्माण करणारी शास्त्रे आहेत. हा ठेवा टिकून ठेवण्यासाठी आमच्या पूर्वाचार्यांनी, संतांनी अतोनात प्रयत्न केले. संतांच्या योगदानांचा साक्षेपी व चिकित्सक अभ्यास करून त्यातील शाश्वत व लोककल्याणकारी मतितार्थ जनमनापर्यंत विशेषत: आजच्या लहान मुलांपर्यंत, तरुणांपर्यंत प्रवाहित करणे ही काळाची गरज आहे.

आज जगभर 'करोना' नावाची दहशत निर्माण झाली आहे. एक छोट्याशा डोळ्यालाही न दिसणाऱ्या 'जीवा'ने सर्व जगभर भीती, चिंता निर्माण केली आहे. आज तर या विचित्र परिस्थितीत महाअरिष्टाच्या पार्श्वभूमीवर संतांची अदब, विनम्रता, माणुसकी, निर्भयता, समानता, ऐक्यभाव, अनासक्ती, मुल्ये अशा सर्व गोष्टींची शिकवण तर खूपच गरजेची वाटते. संतांनी शिकवलेल्या या सर्व गोष्टी कालातीत आहेत. सभोवतालच्या सर्व प्रकारच्या आपत्तींचा बीमोड करण्यासाठी भारतीय संस्कार, संस्कृती, संतवचने मार्गदर्शक आहेत, हे आज संपूर्ण विश्व आता मान्य करीत आहे. त्यांचे अत्यंत छोटेसे उदाहरण म्हणजे 'भारतीय नमस्ते'.

आमच्या परंपरा, छोट्या-मोठ्या कृतींच्या मागे पूर्वजांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवलेला होता आणि यात मानवकल्याणाचाच कसा विचार केला होता हे आज आम्हाला 'करोना'च्या निमित्ताने प्रकषार्ने जाणवत आहे. म्हणून स्वत:ला अतिप्रगत समजणारी, संपत्तीच्या, ऐहिक सुखांच्या राशीवर मनसोक्त लोळणारी पण आज 'कोरोना' पुढे लाचार होऊन शरणागती पत्करलेल्या अमेरिका, इटली, स्पेन, जर्मनी सारख्या राष्ट्रांना भारत एक आशेचा किरण वाटत आहे.

भारतीय आचार, विचार, आहार, चीनसह या सर्वांना आता 'आदर्शवादी' वाटत आहे. सव्वाशे कोटींचा हा देश अनेक संकटांना, समस्यांना तोंड देऊनही एवढा भक्कमपणे कसा उभा राहतो? असा प्रश्न जगभरातील लोकांपुढे असतो. या देशाची ऊर्जा अध्यात्मात आहे. मग ती मंदिरात असेल, भाव भोळ्या भक्तीत असेल, वारीच्या पावलात असेल, ग्रंथांच्या संशोधनात असेल, जनशिक्षणाच्या अनौपचारिक रीतींमध्ये असेल ही ऊर्जा सतेज करणे, संघटीत करणे, माणूसपण जपणे, वाढविणे, टिकविणे या गोष्टी आज या संकटसमयी गरजेच्या आहेत. इडापिडा टाळण्यासाठी प्रत्येकाने सरकारी भूमिकेचा सन्मान करायलाच हवा.

संस्कृती व कौटुंबिक जीवनातून भारतीय माणसाची एक सामुहिक मनोभूमिका तयार झाली आहे. ती पिढ्यानपिढ्या आचारधर्म, नीती, संस्काराच्या रूपाने संस्थापित होत असते. आधुनिकतेच्या पर्यावरणातही त्यातली प्रतिके, विशिष्ट आचार विचार आपल्या मनात दृढ रुजलेले आहेत. दु:ख देणा?्या नश्वर गोष्टींना सहजपणे झुगारून देण्याची अध्यात्मिक वृत्ती आम्हा भारतीयांमध्ये आहे म्हणूनच मनाच्या हावरेपणावर, निराशेवर मात करण्यासाठी आत्मिकबळ वाढवणे, दृष्टी, ध्येय व्यापक करणे आजच्या परिस्थितीत आवश्यक आहे.

नैसर्गिक अवकृपा, क्रूर दहशतवाद, अनाहूत येणारी संकटे, दुर्घटना यांनी सर्वच चिंताग्रस्त आहेत. फक्त चिंता, काळजी करू नका. लोकशक्तीच्या सामूहीक उन्मेषाचा, सामूहीक कर्तुत्वाचा, संयमाचा हाच खरा काळ आहे. भरकटणा?्या मानवाला बांधिलकीचे, माणुसकीचे, विवेकाचे भान करून देणारा हा काळ आहे. जनतेचे आज सर्वोदय, सर्वकल्याण, राष्ट्रकल्याणच नव्हे तर आखिल मानवजातीच्या रक्षणासाठी तयार व्हायचे आहे. या संकटातूनही संपूर्ण विश्?व आणि विशेषत: भारतमाता लवकरच मुक्त होईल यात शंका नाही.

भारतीय संस्कृतीची अनेकानेक उत्तम उदाहरणे, आदर्श मांडता येतील. श्रीमद्भगवद्गीता, रामायण, महाभारत हे आपल्याला जगण्यातील सामर्थ्य, आदर्श देतात. अंत:करण दिव्य चैतन्याने उजळून टाण्यासाठीच आपल्या पूर्वाचार्यांनी हे सर्व आदर्श आम्हासमोर ठेवले आहेत. अनेकार्थांनी या शब्दांची योजना करून ऋषींनी प्राण व रस संयुक्त उत्तम काव्ये रचली आहेत. ही फक्त जिजिवीषा नाही तर मानवी जीवनाच्या सर्व मर्यादा स्वीकारून त्याला असीम बनविण्याची भावात्मक चेतना आमच्या ऋषी, मुनी, संतांनी दिली आहे. भारतीय नव्हे तर विश्वातील प्रत्येक मानवास अशा चेतनेची गरज कायमच असते.

परंतु हे भाग्य फक्त आम्हा भारतवासीयांना लाभले आहे. म्हणूनच भारतीय माणूस खूप संघर्षातून आपल्या मनाचा, बुद्धीचा, चेतनेचा विस्तार करून जगत असतो. हे जगत असताना त्याच्या अंगी कफल्लक वृत्ती आपोआपच येते. ऐहिक सुखांच्या मागे न लागता कफल्लक वृत्तीने जगणे हे फक्त भारतीय माणूसच करू शकतो आणि यातूनच त्याला संघर्षाचे बळ प्राप्त होत असते. आजच्या ‘कोरोना’ पार्श्वभूमीवर हे बळ तो अनुभवतो आहे. साºया प्रगत राष्ट्रांनी शरणागती पत्करली असता आमच्यातील हे सुप्त सामर्थ्य आम्हास लढण्याची ताकद देत आहे. हेच आमचे वेगळेपण आहे. या अतिभयानक महाअरिष्टातून आम्ही आमची सोडवणूक निश्चित करून घेणार आहोत. अर्थात सरकार, प्रशासन यांना पाठिंबा द्यायचा आहे, हे विसरून चालणार नाही.

Web Title: A time of conscience-wise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.