शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

टिक टॉक झाले गायब!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 16:31 IST

व्यक्त कसे व्हायचे हे सोशल मिडियाने सर्वांना शिकवले़ सरकारवरचा राग, प्रशासनाविरूद्धचा रोष, अथवा एका व्यक्तिवर करायची असलेली टीका अगदी मनमोकळेपणाने मांडण्यासाठी सोशन मिडियाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

- विनायक पात्रुडकरव्यक्त कसे व्हायचे हे सोशल मिडियाने सर्वांना शिकवले़ सरकारवरचा राग, प्रशासनाविरूद्धचा रोष, अथवा एका व्यक्तिवर करायची असलेली टीका अगदी मनमोकळेपणाने मांडण्यासाठी सोशन मिडियाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. टिष्ट्वटर, फेसबुक, इंस्टाग्राम, अशा विविध ठिकाणी आपले मत नोंदवण्याचा अधिकार सर्वांना आहे़ याला कायद्याचे बंधन नाही. त्यामुळे कोणत्याही शब्दात व्यक्त होता येते़ या व्यक्त होण्याला अश्लीलपणाची जोड असणारच हे स्वतंत्र सांगायला नको़ अश्लीलपणाचे जसे चाहते आहेत, तसे विरोधक पण आहेत.  त्याला निर्बंध घालण्याची मागणी होणे हेही आलेच. सध्या अशाच एका अ‍ॅप बंदीची चर्चा सुरू आहे़ हा अ‍ॅप विशेष करून तरूणांमध्ये अधिक प्रिय आहे. टीक टॉक असे या अ‍ॅपचे नाव आहे. हा अ‍ॅप चायनाने बनवला आहे. या अ‍ॅपद्वारे नक्कल करत, लाजत, मुरडत, विशिष्ट आवाजात व्यक्त होऊ शकता येते.  हे अ‍ॅप हाताळताना टाईमपासही चांगला होतो. मज्जा येते. मनोरंजन होते. आवडता चित्रपट नट, नटी अथवा सेलिब्रटीची नक्कल करता येते. अल्पावधीतच हा अ‍ॅप प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये इंस्टॉल झाला. हळूहळू या नक्कलमध्ये अश्लीलपणा सुरू झाला. तोपर्यंत सरकार व कायदा हाकणारे सुस्त बसले होते. नेहमीप्रमाणे एका सुजाण नागरिकाने याविरोधात आवाज उठवला. मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेचे प्रत्युत्तर सादर करताना केंद्र सरकारने या अ‍ॅपवर बंदी घालणार असल्याचे न्यायालयाला सांगितले व त्याची अंमलबजावणीही केली़ अ‍ॅपविरोधात याचिका दाखल झाली नसती तर त्याचा वापर सर्रास सुरू राहिला असता. सरकार आणि प्रशासन यांचे लक्ष याकडे गेले नसते. त्यावरचा अश्लीलपणाही वाढला असता.  मुळात अशी परिस्थिती का उद्भवते, याचे मंथन व्हायला हवे़ कोणतीही नवीन वस्तू बाजारात येण्याआधी त्याला कायद्याचे निर्बंध घातले जातात. तसा कायदाच आपल्याकडे आहे, असे असताना एखाद्या अ‍ॅपचा गैरवापर होणार नाही किंवा तेथे अश्लीलपणा फोफावणार नाही, याची काळजी सरकार व प्रशासनाने घ्यायला हवी. प्रत्यक्षात तसे होत नाही. परिस्थिती हाताबाहेर गेली की सर्वजण जागे होतात आणि कामाला लागतात. एका अतिरेक्याने हत्याकांडाचा फेसबुक लाईव्ह केला. १५ ते २० मिनिटे सर्व हत्याकांड लाईव्ह सुरू होता. त्याला थांबवण्याचे तंत्र फेसबुककडेही नव्हते. अख्खा जगाने मृत्यू तांडव लाईव्ह बघितला. या घटनेनंतर जगभरातील तंत्रज्ञान तज्ज्ञ चिंतेत पडले. अशा प्रकारांवर निर्बंध घालण्यावर सर्वांचे एकमत झाले़ त्यानुसार आखणी सुरू झाली़ सोशल मिडियाचा गैरवापर प्रत्येक स्तरावर सुरू असतो़ त्यावर निर्बंध घालण्यास आता कोठे सुरूवात झाली आहे. या निर्बंधाची गती संथ व्हायला नको.  कारण आपल्याकडे जेवढ्या वेगाने कारवाई सुरू होते, तेवढ्याच वेगाने ती थांबते देखील़ टीक टॉकप्रमाणे अनेक असे अ‍ॅप आहेत, जेथे अश्लीलपणा सुरू असतो़ त्याकडेही सरकारने व प्रशासनाने लक्ष द्यायला हवे़ कोणी न्यायालयात जाईल अथवा तक्रार करले या प्रतीक्षेत राहू नये. तसेच एखादा अ‍ॅप बाजारात येण्याआधी त्यावर अश्लीलपणा होणार नाही, अशीच तरतुद करावी. वाहन नियंत्रणासाठी वेग मर्यादा ठरवली जाते. त्याप्रमाणे अश्लीलपणाची पोस्ट अपलोडच होणार नाही, अशी व्यवस्था करावी़ सध्या तसे तंत्रज्ञान काही अ‍ॅपला लागू आहे. ते तंत्रज्ञान सर्वच अ‍ॅपला लागू करायला हवे. तरच सोशल मिडियाचा गैरवापर टळू शकेल अन्यथा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली वाटेल ते उद्योग सुरू राहतील.

 

 

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकSocial Mediaसोशल मीडियाIndiaभारत