शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

थोरल्या काकांची ‘रेल्वे’

By सचिन जवळकोटे | Published: August 02, 2018 4:08 AM

बंड्या अन् गुंड्या तसे भलतेच इरसाल. नको त्या गोष्टीत नको तेवढं नाक खुपसण्याची दोघांनाही भलतीच आवड. आता याला जग ‘घाण सवय’ म्हणतं, यात या बिच्चाऱ्यांचा तरी काय दोष? मध्यंतरी ‘मातोश्री’वर घोषणा झाली होती की, ‘आमचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरतात...’

बंड्या अन् गुंड्या तसे भलतेच इरसाल. नको त्या गोष्टीत नको तेवढं नाक खुपसण्याची दोघांनाही भलतीच आवड. आता याला जग ‘घाण सवय’ म्हणतं, यात या बिच्चाऱ्यांचा तरी काय दोष? मध्यंतरी ‘मातोश्री’वर घोषणा झाली होती की, ‘आमचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरतात...’ हे ऐकताच दचकलेले बंड्या अन् गुंड्या कामाला लागले. ‘धनुष्य’ पार्टीच्या मेळाव्यात त्यांनी गर्दीचा फायदा घेऊन काही जणांच्या खिशात हात घातला... नंतर हाती आलेल्या चिठ्ठ्या-चपाट्या घरी जाऊन निवांतपणे वाचल्या, तेव्हा ते जाम हसले.‘पाच वर्षे माझी खुर्ची टिकू दे रे देवाऽऽ’ अशी प्रार्थना करणा-या आशयाच्या काही चिठ्ठ्या होत्या तर एक चपाटी चक्क देवेंद्रपंतांच्या नावानं लिहिलेली होती, ‘राजीनामा देण्याची वेळ या जन्मी तरी येणार नाही, असं वाटतं. मात्र, दुर्दैवाने आम्ही स्वत:च्या पायावर दगड पाडून घेतलाच तर माझे हात कायमस्वरूपी आपल्या चरणाशी असतील. आम्हाला दूर सारू नका...’ त्याक्षणी या दोघांच्या लक्षात आलं की, ‘मातोश्री’कारांचं गेल्या चार वर्षांतलं नेमकं दुखणं काय होतं. असो.‘थोरले काका बारामतीकर तब्बल २८ वर्षांनी रेल्वेत बसले,’ ही ब्रेकिंग बातमी नुकतीच सोशल मीडियावर गरागरा फिरू लागताच बंड्या-गुंड्यानं झटकन् वेगवेगळे ‘व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप’ चाळायला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या नजरेला पडू लागला, फुल्ल टाइमपास करणारा एक से एक मजकूर.एका ‘कमळ’छाप ग्रुपवर पोस्ट पडलेली, ‘अठ्ठावीस वर्षांनी का होईना बारामतीकर जमिनीवर आले. अखेर त्यांचे विमान खाली उतरले. अब की बारी, पंढरपूर की वारी...’ हे वाचताना बंड्या गोंधळला, ‘थोरले काका पुन्हा माढ्यातून उभे राहाणार की काय...?’ तेव्हा गुंड्यानं त्याला समजावून सांगितलं, ‘ही पोस्ट तयार करणाºया मीडिया सेलवाल्यानं नुकतीच मन की बात ऐकली असावी... म्हणूनच त्याच्या डोक्यात पंढरपूर की वारी भिरभिरली असावी.’ हे ऐकून बंड्याला वाटलं, ‘बिच्चारे देवेंद्रपंत वारी चुकल्यामुळं अगोदरच नाराज असताना नरेंद्रभाई मुद्दामहून वारी करण्याचं सांगून जखमेवर मीठ चोळताहेत की काय?’यानंतर दुसºया ‘घड्याळ’छाप ग्रुपवर पोस्ट झळकू लागलेली, ‘नेहमी लेट असणारी रेल्वे केवळ साहेबांच्या पदस्पर्शानं वेळेवर धावली. अगदी घड्याळाच्या काट्यावर... हे शक्य झालं केवळ आमच्या साहेबांमुळंच!’‘इंजिन’छाप ग्रुपवरही मेसेज फिरलेला, ‘होय... बारामतीकर अखेर रेल्वेत बसले. आमच्या इंजिनशिवाय पर्याय नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. या विषयावरची महामॅरेथॉन मुलाखत ऐका... लवकरच आमच्या फेसबुकवर !’‘हात’छाप गु्रपवाल्यांनी तर कमालीची प्रतिक्रिया व्यक्त केलेली, ‘आमचे राहुलबाबा जर उद्धोंना हॅपी बड्डेऽऽ म्हणत असतील तर थोरले काका रेल्वेत बसले म्हणून काय बिघडलं होऽऽ कुठून तरी विरोधकांचे सारे डबे एकत्र आले पाहिजेत. विरोधकांची एक्स्प्रेस सुसाट निघाली पाहिजे.’शेवटचा ग्रुप होता ‘रामदास’ चाहत्यांचा. या ग्रुपला मात्र मस्तपैकी एक काव्य आठवले, ‘काकांची दक्षिण महाराष्ट्र एक्स्प्रेस, भलेही मुंबईपर्यंत पोहोचू दे... माझी डायरेक्ट फ्लाईट मात्र, थेट दिल्लीतच उतरू दे!’(तिरकस)

टॅग्स :Politicsराजकारण