शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

विचार मरणाच्या नव्या पर्यायाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:57 AM

कत्याच सुपर कॉप हिमांशु रॉय यांनी केलेल्या आत्महत्येमुळे पोलीस वर्तुळासह सारेच हादरून गेले. आॅस्ट्रेलियन शास्त्रज्ञ डेव्हिड गुडॉल यांचे इच्छामरणही असेच कोड्यात टाकणारे. या पार्श्वभूमीवर आत्महत्या, इच्छामरण अथवा दयामरण या मृत्यू कवटाळण्याचे पर्याय आणि त्यामागील कारणांबाबत केलेला हा उहापोह.

- डॉ. कौशल शहागेल्या काही वर्षांत किरकोळ कारणांमुळे करण्यात येणाऱ्या आत्महत्येच्या घटनांचे प्रमाण वाढलेय. नुकत्याच सुपर कॉप हिमांशु रॉय यांनी केलेल्या आत्महत्येमुळे पोलीस वर्तुळासह सारेच हादरून गेले. आॅस्ट्रेलियन शास्त्रज्ञ डेव्हिड गुडॉल यांचे इच्छामरणही असेच कोड्यात टाकणारे. या पार्श्वभूमीवर आत्महत्या, इच्छामरण अथवा दयामरण या मृत्यू कवटाळण्याचे पर्याय आणि त्यामागील कारणांबाबत केलेला हा उहापोह.

जन्म आणि मृत्यू कोणाच्याही हातात नसतो, असे आपण नेहमी म्हणतो. जो प्राणी जन्माला आला, तो एके दिवशी हे जग सोडून जाणार हे अगदी निश्चित असले, तरी कधी कोठे आणि कशा प्रकारे त्याचा मृत्यू होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. मात्र, गेल्या काही वर्षांत किरकोळ कारणांमुळे करण्यात येणाºया आत्महत्येच्या घटनांचे प्रमाण वाढलेय. मुळातच माणसे आत्महत्या का करतात? एवढ्या टोकाची भूमिका का घेतली जाते? मरण एवढं स्वस्त झाले आहे? असे अनेक प्रश्न मनात काहूर माजवितात. मग अशा वेळी मरण स्वस्त होत आहे का? असाही प्रश्न डोकावू पाहतो.मनुष्य जन्म हा एकदाच आहे, असं म्हटलं जात असलं, तरी माणूस मग मरणाला अचानक का कवटाळतो? याचा शोध घेण्याची खºया अर्थाने गरज आहे. माणसांच्या डोक्यात आत्महत्येचा विचार का आणि कसा येतो, हे अद्यापही न सुटलेलं कोडं आहे. एखाद्याच्या मनात आत्महत्येचा विचार शिरलाय, हे संबंधिताच्या कुटुंबातील सदस्यांनाही ओळखता येत नाही का? हा प्रश्न खरोखरच मनाला बेचैन करणारा आहे. मृत्यू हेच कोणत्याही समस्येचे उत्तर असू शकते का? हा दुसरा प्रश्न आहे. गेल्या आठवड्यातील दोन घटना अत्यंत विरोधाभासी होत्या, एका बाजूला आॅस्ट्रेलियन शास्त्रज्ञाने स्वीकारलेले इच्छामरण आणि दुसºया बाजूला हिमांशू रॉय या वरिष्ठ अधिकाºयाने आयुष्याला कंटाळून उचललेले आत्महत्येचे पाऊल. दोन्ही अत्यंत विरोधाभासाच्या घटना असल्या, तरी त्यांचा सन्मवय मृत्यू या संकल्पनेभोवती फिरतो आहे. (लेखक मानसोपचार तज्ज्ञ आहेत.)डेव्हिड गुडॉल नावाच्या या आॅस्ट्रेलियन शास्त्रज्ञाने दूर स्वित्झर्लंडमध्ये जाऊन मृत्यूला मिठी मारली. त्याने इच्छामरण स्वीकारले. गुडॉल हा शास्त्रज्ञ शतायुषी होता. त्याने वयाची १०४ वर्षे पूर्ण केली होती. सर्वार्थाने तृप्त होता, आयुष्याचे शतक पूर्ण केल्यानंतरही त्याला काही शारीरिक व्याधी नव्हती. फक्त त्याची जगण्याची इच्छा संपली होती. जगण्यासारखं काहीतरी आहे, तोपर्यंत जगावं, अशा मताचा होता तो, तर हिमांशू रॉय हे पोलीस दलातील अत्यंत निर्भीड आणि धाडसी व्यक्तिमत्त्व.पोलीस दलात भरती होणाºया प्रत्येक उमेदवारासाठी, तरुणपिढीसाठी आदर्श असा हा माणूस. मात्र, आजाराच्या ओझ्याखाली नैराश्याच्या आहारी गेला अन् आयुष्याला पूर्णविराम दिला, परंतु भविष्यात अशा परिस्थितीत वेगळ्या पर्यायांचा विचार केला गेला पाहिजे. आपल्याकडचे इच्छामरण, दयामरणाचे विषयीचे कायदे सर्व बाजूंनी विचार करून कृतिशील केले पाहिजेत.युथनेशिया अर्थात दयामरण ही संकल्पना सध्या नव्याने चर्चिली जातेय, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात झालेली विलक्षण प्रगती. आता डॉक्टरांच्या हातात असे तंत्रज्ञान आले आहे की, शक्यता आजमावायची झाल्यास ते एखादं आयुष्य कितीही लांबवू शकतात किंवा एखादं आयुष्य क्षणात कुठल्याही वेदनेशिवाय संपवूही शकतात. मृत्यूचा क्षण टाळण्याचं आणि यमदेवाला हुलकावण्या देत राहण्याचे प्रचंड मोठे सामर्थ्य वैद्यकीय शास्त्राकडे आलेले असले, तरी अशा आयुष्याला खरोखरीच काही अर्थ राहतो का, हाही मुद्दा विचारार्थ राहतोच. ड्रिप किंवा डायलिसिसवरच्या जगण्याला जगणं म्हणायचं का इथूनच सुरुवात होते.या यांत्रिक जगण्याबरोबरच वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल अँड पीसफूल डेथचा पर्याय मात्र नव्या जगाला इच्छामरणाचा आणि दयामरणाचा नव्याने विचार करायला लावतोय. एखादं यातनामय जीवन संपविण्याचा एक चांगला पर्याय तंत्रज्ञानाने आता देऊ केलाय. त्यातूनच नव्या कायदेशीर तरतुदी आकारास येऊ लागल्यात. मात्र, या संकल्पना समाजात रुजण्यासाठी अजूनही समाजात विचारांची जडणघडण आवश्यक आहे. त्यामुळे एकंदरीत तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं, तरी समाजात ते स्वीकारण्याची ताकद हवी. विचारबद्धतेची चौकट मोडून एखादा नवा मार्ग निवडणे हे अत्यंत मोठं आव्हान आपल्यासमोर उभं ठाकलं आहे.काहींच्या मते आपले आयुष्य वेदनामय आणि सगळ्यांची फरफट करणारे वाटले, तर ते सन्माननीय आणि शांत पद्धतीने संपविण्याचा अधिकार असायला हवा. यावर जगभर सरळ सरळ दोन तट आहेत आणि ते हिरीरीने आपले मतमांडत आले आहेत. शास्त्रीय भाषेत इच्छामरणाच्या संकल्पनेला युथनेशिया म्हटले जाते. त्याचा अर्थ ‘चांगलं मरण’. मात्र, शास्त्रीय परिभाषेतील युथनेशियाची व्याख्या ‘मर्सी किलिंग’ अर्थात ‘दयामरण’ या संकल्पनेकडे अधिक झुकते. याचे कारण माणसाच्या सुदृढ अवस्थेतही केवळ भावनिक आंदोलनांमुळे त्याला इच्छामरण हवेसे वाटू शकते.इच्छामरणाची संकल्पना आत्महत्येच्या भावनेशी अधिक रममाण होते. म्हणून शास्त्रीय परिभाषेत ‘दयामरण’ हा शब्द आवर्जून वापरला जातो. त्यातूनच पुढे ‘फिजिशिअन असिस्टिेड सुसाइड’ही संकल्पना विकसित झाली. वैद्यकीय सहाय्याने आत्महत्या ही एखाद्या रुग्णाच्या वेदनामय, दुर्धर आणि दीर्घकालीन आजाराचा सन्माननीय अंत करण्यासाठी अंमलात आणली जाते.मात्र, यातही विलक्षण यातनामय आणि अगदी सहन होणार अशा अवस्थेत जर रुग्ण असेल आणि त्याचा हा आजार बरा होण्याऐवजी अधिक बळावत असेल व या आजारावर वैद्यकीय शास्त्राकडे काही योग्य उपचार नसतील, तरच रुग्णाच्या स्वत:च्या आणि त्याच्या जवळच्या नातेवाइकांच्या परवानगीने त्याच्या आयुष्याचा शेवट केला जातो.

टॅग्स :Euthanasiaइच्छामरणHimanshu Royहिमांशू रॉय