शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

ते माणसांना आणि देवालाही खेळवतात

By गजानन जानभोर | Published: August 02, 2018 4:18 AM

देवाचे प्रश्न एकदा जीवनमरणाचे ठरू लागले की मग माणसांचे प्रश्न टाकावू ठरतात. अशा देशात देव श्रीमंत आणि माणसे दरिद्री असतात. इथे देवासाठी माणसांचे खून होतात आणि त्याच्या सार्वजनिक अस्तित्वासाठी दंगलीही घडवून आणल्या जातात.

देवाचे प्रश्न एकदा जीवनमरणाचे ठरू लागले की मग माणसांचे प्रश्न टाकावू ठरतात. अशा देशात देव श्रीमंत आणि माणसे दरिद्री असतात. इथे देवासाठी माणसांचे खून होतात आणि त्याच्या सार्वजनिक अस्तित्वासाठी दंगलीही घडवून आणल्या जातात. त्यातून राजकारणी माणसे सोडली तर कुणाचेही भले होत नाही. देवाच्या तक्रारी सोडविणे फारच सोपे आणि तसे केल्याने लोकप्रियता लाभत असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे पुढारी यात अग्रभागी असतात. असे धार्मिक प्रश्न वणव्यात रूपांतरित झाले की समाजाची मती गुंग होते आणि त्याला आपल्या जगण्याच्या हक्कांचा कायम विसर पडतो. महाराष्ट्राच्या उपराजधानीत नेमके हेच सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपुरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविले जात आहे. लोकं त्याला विरोध करताहेत. त्यातून सुरू झालेल्या आंदोलनांना राजकीय नेत्यांची फूस आहे. या पुढाऱ्यांना ही धार्मिक स्थळे आणि तेथील देवांबद्दल आस्था आहे, असे सामान्यांना वाटत असेल तर ती आपलीच फसवणूक आहे. या राजकारण्यांना लोकांच्या धर्मश्रद्धेचे भांडवल करायचे आहे. धार्मिक प्रश्न सतत चेतवत ठेवले की लोकं आपल्या नागरी समस्यांची चर्चा करीत नाहीत आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपली निष्क्रियता दडून राहते ही गोष्ट या चलाख मंडळींना चांगली ठाऊक आहे. धार्मिक अतिक्रमणांना पाठिंबा देऊन ते जाणीवपूर्वक न्यायालयाचा अवमानही करीत आहेत आणि या अपराधात त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांचा असलेला सहभागही तेवढाच चिंताजनक आहे.अलीकडेच नागपुरात आलेल्या जलतांडवामुळे सगळीकडे हाहाकार माजला होता. मनपा प्रशासन आणि नगरसेवकांबद्दल नागरिकांच्या मनात निर्माण झालेला असंतोष अजूनही खदखदत आहे. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी या नगरसेवकांना धार्मिक अतिक्रमणाच्या माध्यमातून अनायसे ‘देव’ आठवले आहेत. ही देवदुर्लभ संधी त्यांना सोडायची नाही. खेदाची बाब ही की, एरवी नगरसेवकांच्या नावाने बोटं मोडणारे नागरिक आपल्या प्रभागातील साºया समस्या विसरून केवळ धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी या नगरसेवकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. एक धार्मिक स्थळ वाचवले की सामान्यांच्या जीवन-मरणाचे सारे प्रश्न सुटतात, लोकांच्या मनातील रोषही शमतो, हे या राजकारण्यांना ठाऊक आहे. एकदा ही सर्व अतिक्रमणे वाचवली की, हे निष्क्रिय नगरसेवक हिरो ठरतील आणि पुढच्या निवडणुकीत ते निवडूनही येतील.इथे नमूद करण्यासाठी आणखी एक गोष्ट, धार्मिक अतिक्रमणे हटविण्यास सामान्य नागरिकांचा विरोध नसतोच. हे राजकारणीच त्यांना भडकावतात. आधी अस्मिता चेतवायच्या व नंतर भडकलेल्या भावनांचा समूह आपल्यामागे कसा येईल, याची तजवीज करायची, हे घाणेरडे राजकारण केवळ नागपूरच नव्हे तर देशात सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे गरीब माणसाचा निवारा अनधिकृत ठरतो व ते दुबळे अतिक्रमण हटविणे प्रशासनाच्या दृष्टीने सहज सोपेही असते. गरिबाची झोपडी तोडल्यानंतर जातसमूहाच्या भावना कधी दुखावत नाहीत आणि असे अतिक्रमण हटविणे स्मार्ट सिटीसाठी आवश्यक असल्याचे पुढारलेपणही करता येते. देवांच्या अतिक्रमणाबाबत मात्र तसे नाही. ते हटविता येत नाही. कुणी तसे धाडस केलेच तर धार्मिक भावना दुखावतात. प्रसंगी दंगलीही उसळतात आणि मग कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली निवडणुकीच्या मतांसाठी ते ‘देव’ कायमस्वरूपी सुरक्षित ठेवले जातात. अशा धार्मिक अस्मितांचे अंगारे-धुपारे विझू नये यासाठी वर्षभर देवादिकांच्या जयंती, पुण्यतिथीच्या दिवशी रस्त्यावरच भरलेले महाप्रसाद, भंडारे न चुकता तुमची वाट पाहत असतातच. राजकारण्यांनी आपल्या मतलबासाठी भरवलेला हा देवाचा बाजार आहे, त्यातील आपण प्यादे आहोत. ते एकाचवेळी माणसांना आणि देवालाही खेळवत आहेत. देवाचे ठीक आहे, पण किमान माणसांनी तरी ही बदमाषी ओळखायला नको का?- गजानन जानभोर

टॅग्स :Templeमंदिर