चीन खरोखरच तैवानचा घास घेईल का ?
By विजय दर्डा | Updated: January 12, 2026 05:41 IST2026-01-12T05:40:28+5:302026-01-12T05:41:37+5:30
चीनने तैवानवर हल्ला केला, तर अमेरिका हस्तक्षेप करेल ही शक्यता आहेच! भारतासह सगळ्या जगालाच त्याचे परिणाम भोगावे लागतील, हे मात्र नक्की!

चीन खरोखरच तैवानचा घास घेईल का ?
डॉ. विजय दर्डा
चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
सध्याच्या जागतिक परिस्थितीत प्रत्येकाच्या मनात एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. चीन लवकरच तैवानला गिळंकृत करेल का? आणि जग पाहतच राहील की तैवानला वाचवण्यासाठी अमेरिका मैदानात उतरेल? तसे झाल्यास चीन कोणती चाल खेळेल? आणि भारतावर त्याचा काय परिणाम होईल? हा सर्वात मोठा प्रश्न.
रशियाने युक्रेनवर हल्ला करून त्या देशाच्या ७,००० चौरस किलोमीटरपेक्षा जास्त भूभागावर कब्जा केला आहे. अमेरिकेच्या युद्धसमाप्तीच्या प्रयत्नात ताब्यात घेतलेला प्रदेश रशियाकडेच राहण्याचा मुद्दा निघत आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना पकडून आणल्यामुळे व्हेनेझुएलावर अमेरिकेचा कब्जा झाला, हे तर स्पष्टच आहे. अशा परिस्थितीत तैवान गिळंकृत करण्याची सोनेरी संधी चीनला मिळाली आहे. अशा प्रकारे चीनने यापूर्वीही देश गिळंकृत केले आहेत. १९५०-५१ मध्ये त्याने तिबेट हडपले आणि जग फक्त तोंडी हिशेब करत राहिले. तैवानचाच प्रश्न असेल, तर तो आपल्यात सामावून घेण्याची धमकी शी जिनपिंग कायमच देत आले आहेत. त्यांनी आपल्या सैन्याला सज्ज राहायलाही सांगितले आहे. युद्धसरावाचे चिनी विमानांचे तैवानच्या आकाशात भराऱ्या मारणे आता काही नवी गोष्ट राहिलेली नाही. तैवानने आपल्या एकातरी विमानाला लक्ष्य करावे म्हणजे आपल्याला हल्ल्याचे कारण मिळेल, अशी चीनची इच्छा आहे. परंतु, तैवान संयम राखतो.
तैवानला चीन गिळंकृत का करू पाहत आहे? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी इतिहासाची पाने उलटावी लागतील. जपानने १९३१ मध्ये चीनवर कब्जा करणे सुरू केले आणि १९४५ पर्यंत चीनच्या मोठ्या भागावर त्याचा ताबा होता. हिरोशिमा आणि नागासाकी या जपानच्या दोन शहरांवर अमेरिकेने बॉम्ब टाकले आणि दुसरे विश्वयुद्ध समाप्त झाले. त्याबरोबर चीनही स्वतंत्र झाला. त्या देशाचे नाव झाले 'रिपब्लिक ऑफ चायना'. परंतु दोन पक्षात सत्तेची लढाई सुरू झाली. सर्वात जुना पक्ष 'नॅशनलिस्ट पार्टी कुओमिटांग' होता. त्याचे नेते होते च्यांग काई शेक. दुसरा पक्ष होता कम्युनिस्ट पार्टी आणि त्याचे नेते होते माओ त्से तुंग. दोघांमध्ये घनघोर लढाई झाली. माओ भारी पडले. च्यांग काई शेक यांनी पळून जाऊन चीनच्या समुद्री भागात आश्रय घेतला आणि त्या भागाला स्वतंत्र घोषित केले. त्या देशाचे नाव ठेवण्यात आले 'रिपब्लिक ऑफ चायना' ज्याला सामान्यतः तैवान म्हटले गेले. इकडे माओ त्से तुंग यांनी आपल्या नियंत्रणाखालील देशाचे नाव ठेवले 'पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना', इच्छा असूनही माओ तैवानवर कब्जा करण्याच्या स्थितीत नव्हते, कारण चारही बाजूने समुद्राने घेरलेल्या तैवानवर कब्जा करण्यासाठी आवश्यक साधने त्यांच्याकडे नव्हती. किरकोळ लढाया झाल्या. परंतु, चीनला यश मिळाले नाही.
चीन आणि अमेरिका यांच्यात व्यापार समझोता झाला, तेव्हा १९७९ मध्ये काळाने कूस बदलली. अमेरिकेला एका मोठ्या बाजारपेठेची गरज होती. अमेरिकेने केवळ 'पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना'लाच खरा चीन मानावे यासाठी डेंग जिओ पिंग यांनी त्या देशाला राजी केले. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती जिमी कार्टर यांनी 'रिपब्लिक ऑफ चायना' अर्थात तैवानमधील अमेरिकी दूतावास बंद केला. डेन जिओपिंग यांनी तत्काळ तैवानला धमकी दिली की, त्या देशाने चीनमध्ये समाविष्ट व्हावे. परंतु, तैवानवर हल्ला करण्याची हिंमत मात्र केली नाही. नंतर दोन्ही देशांत चकमकी होत राहिल्या. कडवटपणाही वाढत गेला. आज तर संपूर्ण तैवान चीनच्या विरुद्ध आहे. चीन हल्ल्याचा प्रयत्न करेल, तर त्याला मोठ्या विरोधा सामना करावा लागेल. प्रचंड रक्त सांडेल. शी जिनपि यांनी सत्तेवर आल्याबरोबर तैवानला चीनमध्ये सामी करून घेण्याचा इरादा जाहीर केला होता. त्यांच्यासा हा इज्जतीचा प्रश्न होऊन बसला आहे. तैवान जिं शकले, तर ते चीनचे सर्वशक्तिमान नेता होतील.
प्रत्यक्षात दोन्ही देशांच्या सैन्यशक्तीत जर्म अस्मानाचे अंतर आहे, परंतु अमेरिका आपल्याला स देईल याचा तैवानला विश्वास आहे. चीनने हल्ला केल तर जिंकणे सोपे असणार नाही, असे अमेरिकेती विचारवंतांच्या एका गटाने अलीकडेच म्हटले आ चीनचे १ लाख सैनिक मारले जाऊ शकतात. तैवानच् बाजूने ५० हजार सैनिकांबरोबरच ५० हजार नागरि आणि अमेरिकेचे ५००० सैनिक मारले जाऊ शकता शेवटी चीनला माघार घ्यावी लागेल, असाही : अभ्यासगटाचा दावा आहे. या अहवालात अमेरिक सैन्याचा संदर्भ येतो याचा अर्थ काय? तर अमेरि तैवानला साथ द्यायला तयार आहे. ही गोष्ट चीन ठाऊक आहे. याच कारणाने तो देश तैवानवर हल करू शकलेला नाही, पण वारंवार धमकी मात्र देत आर आहे. युद्ध झालेच तर ते कोणासाठीच फायद्या असणार नाही. आपणही कुठे ना कुठे प्रभावित होः जगातल्या सर्व देशांना कधीतरी हे समजून घ्यावे लागे की, युद्ध हे कुठल्याही प्रश्नाचे उत्तर असू शकत ना। परंतु, माथेफिरू नेत्यांना समजावणार कोण?
vijaydarda@lokmat.com