शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सध्याचे विद्वेष, विखार, घृणा, अविश्वासाचे वातावरण ही भारताची पूर्वापार ओळख नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 09:32 IST

धर्मांधता इतकी भिणलीय की लोक बेभान झाले आहेत. दुसऱ्या धर्माच्या लोकांचे गळे चिरण्यापर्यंत हा विखार खोलवर झिरपला आहे.

चार दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा त्यांच्याविरुद्ध प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावरील अवमानजनक टिपणीबद्दल दाखल सगळे गुन्हे एका ठिकाणी वळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. त्यांचा अर्ज नाकारण्याआधी न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठाने, राजकीय पक्षाच्या प्रवक्त्या म्हणजे काहीही बोलायचा परवाना नव्हे, तुमच्या एका वक्तव्याने देशभर आग लागली आहे, तुम्ही देशाची माफी मागायला हवी होती, अशा शब्दांत त्यांची खरडपट्टी काढली. भडक वक्तव्यांनी वातावरण पेटविणारे धर्मगुरू स्टुडिओत जमविणाऱ्या वृत्तवाहिन्या, तसेच गुन्हा दाखल होऊनही नूपुर शर्मांना हात न लावणाऱ्या दिल्ली पोलिसांनाही न्यायालयाने फैलावर घेतले.

दरम्यान, नूपुर शर्मांचे समर्थन केल्याबद्दल कन्हैयालाल नावाच्या टेलरची नृशंस हत्या राजस्थानात उदयपूर येथे उजेडात आली. त्याच्या आठवडाभर आधी महाराष्ट्रात अमरावती येथे उमेश कोल्हे नावाच्या पशुऔषधी केमिस्टची अशीच हत्या झाली. तिचा संबंध नुपूर शर्मांच्या समर्थनाशी असल्याचा आरोप भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केला; परंतु राज्यातील जनतेचे लक्ष त्यावेळी राजकीय बंडाळी, बंडखाेर शिवसेना आमदारांच्या सुरत, गुवाहाटी पर्यटनाकडे होते. सर्वोच्च न्यायालयात नूपुर शर्मांची कानउघाडणी होत असतानाच केंद्रीय गृहखात्याने उमेश कोल्हे हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला उतरवले. प्रकरण चव्हाट्यावर आले. आता हा तपास एनआयएकडे गेला आहे. सुनियोजित पद्धतीने हत्या करणारे सात आरोपी अटक आहेत. आठव्याचा शोध सुरू आहे. कोल्हे यांच्या हत्येसंबंधी अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. नागपूरमध्येही अशीच एक घटना घडता घडता वाचली. संबंधिताने शहर सोडल्याने जीव वाचला. पोलिसांनी आता त्यांना संरक्षण दिले आहे. समाज, देशाबद्दल गंभीर चिंताजनक असे हे वातावरण आहे.

धर्मांधता इतकी भिणलीय की लोक बेभान झाले आहेत. दुसऱ्या धर्माच्या लोकांचे गळे चिरण्यापर्यंत हा विखार खोलवर झिरपला आहे. धार्मिक भावना काचेपेक्षाही नाजूक बनल्या आहेत. त्या कशाने म्हणजे कशानेही दुखावल्या जाऊ लागल्या आहेत. कुणाला स्वत:च्या धर्माची चिकित्सा सहन होत नसेल तर ते एकवेळ समजू शकते; परंतु दुसऱ्याच्या धर्माची चिकित्सा करण्यासाठी झुंडी सरसावल्याचे अत्यंत विषण्ण करणारे चित्र अवतीभोवती आहे. अनेक प्रकरणांमध्ये पोलीसही पक्षपाती वागत आहेत. नूपुर शर्मांवर कारवाई होत नाही, पण त्यांचे वक्तव्य उजेडात आणणारे पत्रकार मोहम्मद झुबेर यांना चाळीस वर्षांआधी एका चित्रपटात दाखविलेल्या दृश्यावर आधारित चार वर्षांपूर्वीच्या ट्वीटसाठी अटक होते. या पार्श्वभूमीवर, केरळचे राज्यपाल आरीफ मोहम्मद खान यांनी ईशनिंदेसाठी माणसांचे गळे चिरण्याची प्रवृत्ती कशी तयार होते, त्यासाठी शिक्षणाचे चुकीचे माध्यम कसे जबाबदार आहे, हे सांगतानाच एका महत्त्वाच्या गोष्टीकडे देशाचे लक्ष वेधले आहे. उदयपूर, अमरावती यांसारख्या घटना हे धार्मिक द्वेषाच्या गंभीर आजाराचे लक्षण आहे. त्यावर कोणीच बोलत नाही, हे त्यांचे मत विचार करायला लावणारे आहे.

शाहबानो खटल्यावेळी मौलवींच्या नादाला लागू नका, असे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना सांगणारे, त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणारे हेच आरीफ मोहम्मद खान. स्वत:च्या धर्मातील अनिष्ट चालीरीती, परंपरा व मान्यतांबद्दल ते स्पष्ट बोलतात. इतरांनीही असेच स्वधर्माबद्दल बोलले तर बरे हाेईल. कारण, या देशाला धर्म चिकित्सेची दीर्घ परंपरा आहे. सध्याचे विद्वेष, विखार, घृणा, अविश्वासाचे वातावरण ही भारताची पूर्वापार ओळख नाही. हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध असे विविध धर्म शेकडो वर्षे इथे एकत्र नांदत आहेत. धार्मिक विविधतेमधील एकता हा भारताचा विशेष आहे. म्हणूनच इथला असा टोकाचा धार्मिक द्वेष व त्यावरून होणारा रक्तपात जगासाठी धक्कादायक आहे. तथागत गौतम बुद्ध व महात्मा गांधींच्या देशात हे घडत असताना ज्यांनी हे रोखायला हवे ते राजकीय नेते शांत आहेत. सत्तेवरील मंडळी लोकांना शांत राहण्याचे, धार्मिक बाबींबद्दल सहिष्णू बनण्याचे साधे आवाहनही करीत नाहीत. हा विखार समाज व देश संपवून टाकेल हे ज्यांना समजते ते विद्वान विचारवंत, समाजसेवक जणू दिङ‌्मुढ आहेत. सद्हेतूने सहिष्णुतेबद्दल बोललो, समाज जोडण्याचा प्रयत्न केला तर आपल्यावरही परधर्माच्या लांगूलचालनाचे आरोप होतील, ही त्यांची भीती हा आणखी कितीतरी गंभीर प्रकार आहे.

टॅग्स :IndiaभारतHinduहिंदूMuslimमुस्लीम