शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

‘आर-पार’च्या लढाईचा सांगावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:28 IST

एखाद्या विषयात राजकारण येत नाही, तोपर्यंत तो विषय सरकारी यंत्रणांच्या दृष्टीने फारसा गंभीर अगर दखलपात्र ठरत नाही. त्यातही व्यापक समाजहिताच्या दृष्टीने व हक्काच्या लाभासाठी जेव्हा विषयाला राजकीय किनार लाभू पाहते तेव्हा तो तडीस जाण्याबद्दलची अपेक्षाही उंचावून जाते.

- किरण अग्रवालएखाद्या विषयात राजकारण येत नाही, तोपर्यंत तो विषय सरकारी यंत्रणांच्या दृष्टीने फारसा गंभीर अगर दखलपात्र ठरत नाही. त्यातही व्यापक समाजहिताच्या दृष्टीने व हक्काच्या लाभासाठी जेव्हा विषयाला राजकीय किनार लाभू पाहते तेव्हा तो तडीस जाण्याबद्दलची अपेक्षाही उंचावून जाते. ‘नार-पार’ गिरणा नदीजोड प्रकल्पातील गुजरात धार्जिणेपणाबद्दल तेच होऊ घातले आहे. कारण सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी या मुद्यावर आता एकवटले आहेत.केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नाने साकारणा-या ‘नार-पार’ नदीजोड प्रकल्पाला प्रादेशिकता, स्थानिक-परकीय व महाराष्ट्र-गुजरातच्या हक्काची किनार लाभली असल्याने तो वादविषय ठरला आहे. मागे दिल्लीतील एका कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय नदी विकास मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील अशा ३० प्रकल्पांची घोषणा केली होती, तेव्हाच ‘नार-पार’चा विषय उपस्थित होऊन गेला होता. परंतु अपवाद वगळता त्या विरोधाला राजकीय पाठबळ लाभू शकले नव्हते.या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राखेरीज गुजरातला वळविल्या जाणाºया पाण्याबाबत नाशिक, खान्देशसह नगर व औरंगाबादेतील पाणी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात काम करणाºया संस्था व व्यक्तींनी नाशकात एकत्र येत जलपरिषदही घेतली होती. परंतु गुजरातमुळे केंद्राचे स्वारस्य त्यात दडलेले असल्याने त्या विषयाला फारशी चालना मिळू शकलेली नव्हती. एकूणच हा निर्णय भाजपाचा असल्याकारणाने या लाभक्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे जिल्ह्यातील पक्षाचे नेते तोंडावर बोट व हाताची घडी घालूनच होते. अन्य पक्षीयांनीही सदरचा विषय तितकासा गांभीर्याने घेतलेला दिसून आला नाही. त्यामुळे प्रबळ जनमत उभे राहू शकले नव्हते, जे प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी गरजेचे असते.विशेष म्हणजे, राज्यमंत्री दादा भुसे यांनी पाचारण केलेल्या यासंबंधीच्या बैठकीला सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थिती लावून आपण स्थानिकांच्या भावनांसोबत असल्याचे स्पष्टपणे सांगितले. शिवसेना, माकपा व राष्ट्रवादीसोबत भाजपाच्या खासदार, आमदारांनीही पाणीवाटपाचा फेरआढावा घेण्याची मागणी केलीच; शिवाय राज्याचे जलसंधारणमंत्री व मुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले. यातील दखल घेण्यासारखी बाब म्हणजे, नार-पारच्या उगम क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे भाजपाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण व माकपाचे आमदार जे. पी. गावित यांच्यात राजकीय सख्य नसल्याचे सर्वजण जाणून आहेत. परंतु पारंपरिक राजकारण बाजूला ठेवून हे दोन्ही लोकप्रतिनिधी एकवटले.‘नार-पार’साठी नवीन अहवालाऐवजी, सन २०११ मध्ये तयार केला गेलेला प्रकल्प अहवाल प्रमाण मानून नदीजोड योजना राबवावी, यावर या बैठकीत एकमत झाले. यामुळे त्रुटीच्या गिरणा खोºयात व जळगावसह औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगावपर्यंत पाणी देता येणार आहे.नवीन प्रकल्पात सुमारे ४०० पेक्षा अधिक दशलक्ष घनमीटर पाणी गुजरातमध्ये वळविण्याचे प्रस्तावित असले तरी, त्या बदल्यात उकई धरणातून दिल्या जाणाºया पाण्याची स्पष्टता नाही. परिणामी, गुजरातकडे जाऊ पाहणारे पाणी रोखण्याचा अजेंडा या बैठकीतून समोर येऊन गेला आहे. तोच ‘आर-पार’च्या लढाईचा सांगावा देणारा आहे.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरी