शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

तासिका तत्वावरील प्राध्यापकांचे मानधन दुप्पट, परंतू दरमहा वाटप कधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 7:24 PM

अनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिका तत्वावर काम करणा-या प्राध्यापकांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय शिक्षण मंत्र्यांनी घेतला असला तरी प्रत्यक्ष दरमहा मानधन मिळत नाही.

- धर्मराज हल्लाळे

अनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिका तत्वावर काम करणा-या प्राध्यापकांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय शिक्षण मंत्र्यांनी घेतला असला तरी प्रत्यक्ष दरमहा मानधन मिळत नाही. यापूर्वीही मिळाले नाही. तीन तीन महिन्यांची बिले एकदाच काढली जातात. नव्या निर्णयानुसार मानधनात वाढ होईल, तो नक्कीच दिलासा आहे. परंतू, वेतन जसे महिन्याला मिळते तसे मानधनही महिन्याला दिले पाहिजे. दरमहा मानधन देण्याऐवजी शासनाकडून आर्थिक तरतूद झाल्यानंतर तीन महिन्याला एकदा बिले काढण्याची पद्धत आहे. रिक्त जागांवर काम करण्यासाठी विद्यापीठाकडून मान्यता घेवून तासिका तत्वावर प्राध्यापकांच्या नेमणूका केल्या जातात. नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर या जिल्ह्यांमध्ये सुमारे साडेबाराशे प्राध्यापक तासिका तत्वावर कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील हा आकडा फार मोठा आहे़ राज्यातील विद्यापिठे आणि महाविद्यालयांमध्ये जवळपास ४० टक्के जागा रिक्त आहेत. तिथे सगळा शिक्षण व्यवहार हा तासिका तत्वावर सुरु आहे़ सदरील प्राध्यापकांना आठवड्याला ७ तास दिले जातात. प्रत्येक तासासाठी आजपर्यंत २५० रुपये दिले जात होते. साधारणत: तासिका तत्वावरील प्राध्यापकांना दरमहा ४ ते ५ हजार रुपये मिळू शकतात. परंतू, आर्थिक तरतूदी अभावी त्यांना तीन ते चार महिने मानधनाची वाट पहावी लागते. शासनाने रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेत आशादायी चित्र निर्माण केले आहे़ साधारणपणे महाराष्ट्रात ३ हजार ५८० जागा रिक्त आहेत़ त्याचवेळी नेटसेट व पीएचडी या पात्रतेसह ८० हजार विद्यार्थी रोजगाराच्या प्रतिक्षेत आहेत़ एकूण पात्र विद्यार्थ्यांची संख्या आणि उपलब्ध जागा यांचे प्रमाण लक्षात घेतले तर मोठी तफावत आहे. त्यामुळे निश्चितच निवड प्रक्रियेतील गुणवत्तेची स्पर्धा ही टोकाची असणार आहे. शासनाने थेट जागा भरण्याचाही निर्णय जाहीर केला आहे. परंतू, संस्थाचालकांचा त्याला पाठिंबा दिसत नाही. महाविद्यालयाचे इमारत भाडे तसेच वेतनेत्तर अनुदान हे प्रश्न सोडवा असा त्यांचा आग्रह आहे. निश्चितच गुणवत्तेद्वारे शिक्षक नेमणे हा निर्णय स्वागतार्ह आहे़ परंतू, संस्थाचालकांची बाजू समजून घेवून शासनाने समन्वय साधला पाहिजे. उद्या परीक्षा घेवून जरी नियुक्त्या दिल्या तरी त्यांच्या नोकरीवर गंडांतर येणार नाही याची सरकार हमी कशी घेणार आहे. नेमणुकीनंतर कामाचा लेखाजोखा कोण ठेवणार आहे. त्यांचे गोपनीय अहवाल कोण लिहिणार. शिस्तभंगाची कार्यवाही कोण करणार. संस्थेचे नियंत्रण असणार का? असे असंख्य प्रश्न आहेत. त्यामुळे गुणवत्ता, नेमणूक आणि शिक्षण संस्था हे त्रांगडे सरकार कसे साडवते यावरच या निर्णयाची अंमलबजावणी अवलंबून आहे.शासनाच्या शिक्षण विभागाकडे असलेली नियंत्रण ठेवणारी व्यवस्था आणि प्राध्यापक, शिक्षण संस्थांची संख्या पाहिली तर त्यातही मोठी विसंगती आहे. त्यामुळे प्रत्यक्ष काम करताना प्रश्न निर्माण होणार आहेत. लोकप्रिय घोषणा करून शासन लक्ष वेधू शकते. मात्र काटेकोर अंमलबजावणी झाली तरच परिणाम दिसतील. एकीकडे गुणवत्तेचा आग्रह धरायचा आणि दुसरीकडे रिक्त जागा भरायच्या नाहीत. ज्या भरल्या आहेत त्या तासिका तत्वावरील असणार. त्यांच्या मानधनाचा प्रश्न असणार. हे सर्व विषय शिक्षण व्यवस्थेचे वाभाडे काढणारे आहेत. आज गेल्या अनेक वर्षांपासून विषय मान्यता, शिक्षक मान्यता, विद्यार्थी संख्या यावर घोळ सुरु असून, तालुका ठिकाणी व ग्रामीण भागातील उच्च शिक्षणाची दूरवस्था झाली आहे. जिल्हा परिषद शाळा गुणवत्तेच्या दिशेने वळल्या आहेत. तिथे हुशार विद्यार्थी समोर येत आहेत. परंतू ग्रामीण भागात त्यांना शालेय शिक्षणाइतकाही दर्जा असणारे उच्च शिक्षण मिळू शकत नाही ही आजची शोकांतिका आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक