शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

आश्वासक व आव्हानात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 12:41 AM

२०१६ ची नोटाबंदी आणि २०१७ ची जीएसटी अंमलबजावणी यामुळे असंघटित उद्योगक्षेत्र तसेच लघु व मध्यम उद्योगांना मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागले होते. अल्प नफा असणारे हे उद्योग हिंमत व इच्छाशक्तीच्या जोरावर व्यावसायिक चढ-उतारांवर टिकून राहतात.

- - मुकुंद कुलकर्णी,उद्योजक२०१६ ची नोटाबंदी आणि २०१७ ची जीएसटी अंमलबजावणी यामुळे असंघटित उद्योगक्षेत्र तसेच लघु व मध्यम उद्योगांना मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागले होते. अल्प नफा असणारे हे उद्योग हिंमत व इच्छाशक्तीच्या जोरावर व्यावसायिक चढ-उतारांवर टिकून राहतात. स्टँडअप इंडिया, स्टार इंडिया, मेक इंडिया, डिजिटल इंडियासारख्या मिशनमुळे निवडणुकीपूर्वीच्या अर्थसंकल्पाकडून सूक्ष्म, लघु मध्यम उद्योगांना या शासनाकडून मोठ्या अपेक्षा होत्या व या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प एम.एस.एम.ई.साठी आश्वासकच म्हणावा लागेल. या अर्थसंकल्पाद्वारे उद्योग क्षेत्रासाठी व प्रामुख्याने एम.एस.एम.ई.ला लक्ष्य मानून अनेक घोषणा व योजना जाहीर करण्यात आल्या. त्यांचा सारांश पुढीलप्रमाणे-१) कॉर्पोरेट टॅक्स : गेल्या अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांचा व्यवसाय करणाºया व्यवसायाला सवलत देऊन हा कर २५% करण्यात आला होता. या अर्थसंकल्पात ५० कोटींची मर्यादा वाढवून २५० कोटी रुपये करण्यात आली आहे. यामुळे ९९% एम.एस.एम.र्इं.ना याचा फायदा होऊन हे उद्योग वाचलेल्या पैशातून गुंतवणूक करतील व त्यातून रोजगार निर्मितीच्या मोठ्या शक्यता निर्माण होईल.२) अन्नप्रक्रिया उद्योगांना १,४०० कोटी, वस्रोद्योगाला ७,१०० कोटी, शेतकरी कंपन्यांना आयकरातून पाच वर्षांसाठी १००% सूट आदी माध्यमातून एम.एस.एम.ई. उद्योगांना आणि मुख्यत्वे ग्रामीण भागात उद्योग निर्मितीला चालना मिळून जेथे खरी गरज आहे तेथे रोजगार निर्मितीच्या संधी निर्माण होऊ शकतील.३. रोजगार निर्मितीला त्वरित चालना मिळावी म्हणून नवीन रोजगार देणाºया उद्योगांना ई.पी.एफ.वरील १२ टक्के इन्सेंटिव्ह, तयार कपडा, निर्मिती, पादत्राणेसारख्या हंगामी उद्योगामध्ये १५० दिवसांच्या पगाराला पूर्ण रोजगार मानून पुढील तीन वर्षांसाठी जाहीर केलेली प्रोत्साहन योजना यामुळे अस्तित्वात असलेल्या उद्योग विस्तारीकरणाचा प्रयत्न करतील व त्यातून त्वरित रोजगार निर्माण होऊ शकेल.४. कर्जाची उपलब्धता-मोठ्या व अतिमोठ्या उद्योगांच्या एन.पी.ए.ची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणावर होते आहे. यामुळे बँकांनी कर्जवाटपात हात अखडता घेतला आहे. याचा फार मोठा फटका एन.पी.ए.मध्ये केवळ ११ टक्के वाटा असलेल्या एम.एस.एम.ई.ला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. हे कमी करण्यासाठी या अर्थसंकल्पात ३,७९४ कोटी रुपयांचा वित्तीय पुरवठा व त्यावर असलेली व्याज सबसिडी योजना २०२२ पर्यंत जाहीर करून एम.एस.एम.ई.ला दिलासा दिला आहे; पण हा वित्तीय पुरवठा ७ लाख एम.एस.एम.ई. उद्योगांसाठी अल्पसा आहे.५. इतर महत्त्वाकांक्षी योजना- प्रत्येक जिल्ह्यात Skill Development center, Digital India  साठी जाहीर केलेले ३,००० कोटी रुपये, Ease of doing Business  साठीच्या ३७२ सुधारणा इत्यादी योजना आकर्षक आहेत; पण त्यांची अंमलबजावणी कशी होईल हे खरे आव्हान आहे.एफ.डी.आय. पॉलिसी, मेगा युनिट पॉलिसी इत्यादींच्या माध्यमातून आकर्षक प्रोत्साहन मिळणाºया मेगा व एम.एन.सी. उद्योगांसाठी या अर्थसंकल्पात फार वेगळे असे काही नाही; पण एम.एस.एम.ई.ला ध्येय मानून संतुलन साधण्याचा प्रयत्न झाला आहे. आता गरज आहे ती योग्य अंमलबजावणीची.

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Budgetअर्थसंकल्पbusinessव्यवसाय