शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

विद्यार्थी वाहतुकीची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 02:37 IST

मुंबई उच्च न्यायालयात पीटीए फोरम (पॅरेंट-टीचर्स असोसिएशन फोरम) यांनी दाखल केलेली जनहित याचिका नुकतीच उच्च न्यायालयात सुनावणीस आली होती.

- डॉ. खुशालचंद बाहेती (निवृत्त सहायक पोलीस आयुक्त)

स्कूल बस आणि विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक यासाठी केंद्रीय मोटार वाहन कायद्यात पुरेशा तरतुदी आहेत. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयांनीही यात अनेक आदेश दिले आहेत. मात्र या आदेशांची पूर्तता होते किंवा नाही हे मात्र गांभीर्याने पाहिले जात नाही. सरकारी यंत्रणा नियमभंग करणाऱ्या स्कूल बसविरुद्ध विशेष मोहीम राबविल्याचे दावे करतात आणि किती चालान फाडले याचे आकडे दाखवतात. मात्र, ही कारवाई परिणामकारक ठरत नाही. सातारा (औरंगाबाद) येथे स्कूल बसचालक व त्याच्या २ साथीदारांनी अल्पवयीन मुलीची छेडछाड करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला. असे प्रकार यापूर्वीही घडलेले आहेत.मुंबई उच्च न्यायालयात पीटीए फोरम (पॅरेंट-टीचर्स असोसिएशन फोरम) यांनी दाखल केलेली जनहित याचिका नुकतीच उच्च न्यायालयात सुनावणीस आली होती. या याचिकेत सरकारने २०१६च्या केंद्रीय मोटार वाहन कायद्यात १३ व्यक्तींपेक्षा जास्त क्षमतेच्या वाहनांनाच स्कूल बसचा परवाना मिळू शकेल, अशी तरतूद असतानाही राज्य सरकार रिक्षांना व १२ व्यक्तींपेक्षा कमी आसनी वाहनांना स्कूल बसचे परवाने देत असल्याचे न्यायालयास सांगण्यात आले. याबद्दल न्यायालयाने विचारणा केली असता सरकारने २०११च्या महाराष्ट्र मोटार वाहन नियमांचा आधार दाखविला. यापूर्वी न्यायालयानेही रिक्षातून विद्यार्थी वाहतुकीविरुद्ध आदेश दिले होते. मात्र शासनाने सोयीचे ‘अर्थ’ लावून परवाने दिले.

उच्च न्यायालयाने वाहनचालकांचे हित पाहू नका, मुले ही देशाची संपत्ती आहे, या शब्दात फटकारले. केंद्राचा कायदा हा राज्यांपेक्षा श्रेष्ठ असतो व २०११च्या तरतुदीपेक्षा २०१६च्या तरतुदींची अंमलबजावणी कायदेशीर असते हे कायद्याचे साधे तत्त्वही उच्च न्यायालयाला समजावून सांगावे लागले. सरकारच्या अशा धोरणांमुळेच गावोगाव खचाखच विद्यार्थी भरून नेणाºया रिक्षा व व्हॅन्स भररस्त्यांवरून धावतात व त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास परिवहन व पोलीस विभाग अयशस्वी ठरतो. अर्थात याला पालकही तितकेच जबाबदार आहेत.उच्च न्यायालयाने जनहित याचिकेत नियमभंग करणाºया स्कूल बसविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश यापूर्वी दिले होते. याप्रमाणे कारवाई करण्यात आल्याचे सरकारने न्यायालयात सांगितले. विशेष मोहिमेत १७ हजार ५०० चालान देऊन ३६ लाख रुपये दंड गोळा केल्याचेही सांगितले. यात सर्वाधिक ७ हजार ३०० खटले नो-पार्किंगचे व २ हजार ४६६ खटले वाहतुकीस अडथळा आणल्याचे होते. सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालय या कारवाईमुळे प्रभावी झाल्याचे दिसले नाही. इतकेच नव्हे तर विशेष मोहिमेचा उल्लेख करताच कोणी कायद्याचा भंग करीत असेल तर कारवाई करून तुम्ही सर्वांना उपकृत करीत आहात काय, असा सवाल केला. कारवाई करणे तुमचे कर्तव्यच आहे, अशी जाणीव करून दिली, यापुढेही कारवाई चालूच राहील, अशी अपेक्षाही व्यक्त केली.स्कूल बसचा रंग कसा असावा, आपत्कालीन खिडक्या कशा असाव्यात येथपासून ते दप्तर ठेवण्यास जागा कशी असावी, वेग नियंत्रक यंत्र असावे, बसची पायरी कशी असावी व बसमध्ये किती विद्यार्थी घेता येतील याच्या सविस्तर तरतुदी कायद्यात आहेत. जीपीएस, सीसीटीव्हीबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशही आहेत. सरकारने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या आकडेवारीत धोकादायक पद्धतीने स्कूल बस चालविल्याबद्दल ४६ व विनालायसन्ससाठी ११६ जणांकडून दंड वसूल करण्यात आला. मात्र यानंतरही ते पुन्हा बसवर आहेत काय हे पाहण्याची जबाबदारी कोण घेणार? बसमध्ये अटेंडंट असण्याची तरतूद आहे. चालकाने संगीत वाजवूनये, अनावश्यक बोेलू नये, धूम्रपान करू नये, अशीही तरतूद आहे. बसमध्ये घडणारी प्रत्येक नियमबाह्य घटना पालकांनी शिक्षकांना कळवावी, असेही नियम आहेत. अशा अनुचित घटना करणाºया तसेच सुरक्षा यंत्रणा न बसविणाºया किंवा त्यात फेरफार करणाºया स्कूल बसचालक व मालकांविरुद्ध दखलपात्र गुन्हा नोंदविता येतो, पण तसे होताना दिसत नाही.राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी प्राचार्यांची असल्याचे स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने २०१२ साली दिलेल्या निर्देशात विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षकांनी स्कूल बसमध्ये प्रवास करून सुरक्षिततेच्या नियमांची अंमलबजावणी होते काय हे पाहावे, असेही म्हटले आहे. तरीही पालक अभावानेच असा प्रवास करून सुरक्षित वाहतुकीची खात्री करून घेतात. पालक व शिक्षकांनी यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.

 

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण