शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

चोरटे, नग्न व्हिडिओ.. आधी संमती.. नंतर ब्लॅकमेलिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 06:29 IST

आपण तंत्रज्ञान शिक्षित आहोत; पण माध्यम शिक्षित नाही; हा आपल्यासमोरचा खरा प्रश्न आहे... चंडीगड हा त्याचा फक्त एक चेहरा!

मुक्ता चैतन्य

चंडीगड विद्यापीठातील आक्षेपार्ह  ‘व्हिडिओ- लीक’ प्रकरण सध्या गाजतंय. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींचे बाथरूममधले व्हिडिओ त्यांच्याच एका मैत्रिणीने लीक केल्याचं समजल्यावर विद्यापीठातील विद्यार्थी-विद्यार्थिनी रस्त्यावर उतरले.  इंटरनेट, स्मार्टफोन आणि सोशल मीडिया या आधुनिक जगातल्या तीन क्रांती मानल्या जातात. त्यामुळे माणसांच्या मूलभूत वर्तनात काही ठळक बदल झालेले आहेत. यात भावनिक बदल आहेत आणि वर्तणुकीचे बदल आहेत. यातला एक महत्त्वाचा बदल म्हणजे तारतम्य संपून जाणे. सदसद्विवेक वापरता न येणे. चंडीगडची घटना ही काही अशाप्रकारची पहिली घटना नाही.

स्वतःचे नग्न, अर्धनग्न फोटो, व्हिडिओ शेअर करण्याचा ट्रेंड टिनेजर्समध्ये गेल्या काही वर्षांपासून आहे आणि तो वाढतोय. असे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आपल्या जोडीदाराला तर पाठवले जातातच; पण आपण ट्रेंडी आहोत हे दाखवण्यासाठी मित्रमैत्रिणींच्या वर्तुळापासून ते अगदी अनोळखी व्यक्तीबरोबरही शेअर केले जातात. हे करत असताना एकतर यातले धोके मुलांना माहीत नसतात आणि दुसरं म्हणजे कळत नकळत आपण गुन्हा करतो आहोत, हेही त्यांच्या लक्षात येत नाही. दुसऱ्याच्या परवानगीशिवाय त्याचे कुठलेही व्हिडिओ किंवा फोटो काढणं, ते शेअर करणं चूक आहे ही गोष्टच या मुलांच्या लक्षात येत नाही. कारण, त्याविषयी त्यांच्याशी बोललं जात नाही.  नवमाध्यमांचे वापरकर्ते म्हणून आपण अजूनही बाल्यावस्थेत आहोत. आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ, शब्द, पोस्ट्स का करायच्या नसतात, त्याचं गंभीर गुन्ह्यात रूपांतर कसं होऊ शकतं, आपण स्वतःला आणि इतरांना धोके कसे निर्माण करू शकतो, या गोष्टींविषयी पाहिजे तितकी जागरूकता तरुणांंमध्ये नाही, तशीच ती मोठ्यांच्या जगातही नाही. कारण आपल्या डिजिटल सवयी कशा असायला हव्यात, ज्याला ‘डिजिटल हायजिन’ म्हटलं जातं ते काय असतं हे आपल्या गावीही नाही.  फोन आणि त्यातलं इंटरनेट हे नुसतं गॅझेट नाही, ते एक स्वतंत्र जग आहे, ज्या जगाचा आपण भाग आहोत! आभासी जग ही काही एखादी कृत्रिम जागा नाही. मुळात त्याला आभासी म्हणणं हे सुद्धा चुकीचंच आहे. आभासी आणि प्रत्यक्ष, असा काही फरक आता उरलेला नाही. आपण ज्यात जगतो, ते या दोन्हीच्या एकत्रीकरणातून तयार झालेलं जग आहे. म्हणूनच आपल्या डिजिटल सवयींकडे बारकाईने बघण्याची, त्या चांगल्या असल्या पाहिजेत याचा आग्रह धरण्याची गरज आहे. 

प्रेमात असताना पाठवलेले सेक्सी फोटो आणि व्हिडिओचा प्रेमभंगानंतर दुरुपयोग होणं सातत्याने घडतं. सेक्सटिंग करताना पाठवलेल्या पोस्ट्स, व्हिडिओ आणि फोटो नंतर सेक्सटॉर्शनमध्ये वापरले जातात. तावातावाने भांडताना आपण कधी ट्रोल बनतो हे अनेकांच्या लक्षातही येत नाही, चेष्टा कुठे संपते आणि बुलिंग कुठे सुरू होतं, याचं तारतम्य नाही. ट्रेंड म्हणून, थ्रिल म्हणून केलेल्या गोष्टींमुळे होणाऱ्या मानसिक, भावनिक नुकसानीचा तर  विचारही केला जात नाही.  फोमोपासून शरीर प्रतिमेपर्यंत अनेक गोष्टींचे गुंते होऊन बसले आहेत. आपण चोर शिरू नये म्हणून घराला कुलूप लावतो आणि आपली गॅझेट्स चोरांसाठी खुली करून ठेवतो. आपण एरवी साधारणत: सभ्यपणे वागतो पण डिजिटल स्पेसमध्ये आल्यावर आपलं वर्तन आणि भाषा घसरते.  प्रत्यक्ष जगात वावरताना काय योग्य आणि काय  अयोग्य याचं जे भान आपण राखतो तेच डिजिटल जगात वावरताना राखणं म्हणजे चांगल्या डिजिटल सवयी निर्माण करणं. आजही आपण तंत्रज्ञान शिक्षित आहोत, पण माध्यम शिक्षित नाही; हा आपल्यासमोरचा खरा प्रश्न आहे. त्याला हात घातला नाही, तर चंडीगडसारख्या घटना रोखता येणार नाहीत!  

(लेखिका सोशल मीडिया अभ्यासक आहेत)muktaachaitanya@gmail.com

टॅग्स :chandigarh-pcचंडीगढ़Crime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिस