शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

विशेष लेख: नवरा आहे तर तो मारणारच, असे स्त्रियाच म्हणतात; ते का?

By संदीप प्रधान | Updated: June 28, 2023 11:01 IST

Women: हिंसेची काळीकुट्ट सावली जगभरातील स्त्रियांची पाठ सोडत नाही असे दिसते. वाढीच्या वयातच मुलग्यांचे कान धरणे हा यावरचा एक उपाय असायला हवा!

- संदीप प्रधानमराठी वाहिनीवरील एका मालिकेत सुशिक्षित, सधन घरातील नायिकेला तिच्या पतीने मारहाण केल्याचे दाखवावे की न दाखवावे, असा पेच मालिकेच्या निर्मात्यांसमोर होता. यावर उपाय म्हणून मध्यमवर्गीय घरातील गृहिणींचा एका गट व उच्च मध्यमवर्गातील उच्च विद्याविभूषित, कर्तृत्वाची आस असलेल्या विवाहित तरुणी यांचा गट यांना वाहिनीने आपल्या कार्यालयात बोलावून एक प्रश्नावली सोडवायला दिली. सामान्य घरातील गृहिणींनी नवऱ्याने मारहाण करणे यात गैर काही नाही, अशी अपेक्षित प्रतिक्रिया दिली. मात्र, खरा धक्का उच्च मध्यम कुटुंबातील तरुणींनी मालिकेच्या निर्मात्यांना दिला. नवऱ्याने केलेली थोडीबहुत मारहाण योग्य आहे. आम्हालाही ती होते. त्यामुळे मालिकेतील नायिकेला तिच्या नायकाने मारहाण केल्याचे दाखवले तर त्यात गैर काही नाही, असे त्या म्हणाल्या, मालिकेची नायिका पुढे काही भागांत मारहाण सहन करताना दाखवली व मालिकेचा टीआरपी उच्चीचा राहिला.

काही काळापूर्वी ऐकलेला हा किस्सा आठवण्याचे निमित्त ठरले ते संयुक्त राष्ट्रसंघाने अलीकडेच प्रकाशित केलेला लैंगिक समानतेबाबतचा २०२३ चा अहवाल. यामध्ये जगभरातील ८० देशांमधील २५ टक्के लोकांनी पतीने पत्नीला मारहाण करणे योग्य आहे, असे धक्कादायक मत व्यक्त केले. दहापैकी नऊ पुरुष महिलांना किमान एकदा तरी दुय्यम वागणूक देतात. भारतात ९९.०२ टक्के पुरुष महिलांसोबत पक्षपात करतात. भारतामधील ६९ टक्के पुरुषांनी राजकारणात महिला हिंसाचाराने कळस गाठला. नकोत, असे मत व्यक्त केले. आर्थिक विषयांत भारतात ७५ टक्के महिलांबाबत पक्षपात होतो. स्त्रीचे मानसिक स्वास्थ्य व मूल जन्माला घालणे याबाबत ९२.३९ टक्के पुरुषांना महिलांचे मत विचारात घ्यावे, असे वाटत नाही.

आपण आजूबाजूला पाहिले तरीही हेच चित्र दिसते. एमपीएससी परीक्षा अव्वल गुणांनी उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिने जोडीदार म्हणून स्वीकारण्यास नकार देताच राहुल हंडोरे या तरुणाने तिची निर्घृण हत्या केली. काही दिवसांपूर्वी मीरा रोड येथे सरस्वती या तरुणीची तिचा जोडीदार मनोज साने याने अशीच क्रूरपणे हत्या केली. त्यानंतर शरीराचे तुकडे करून ते मिक्सरमधून बारीक करून विल्हेवाट लावली, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या श्रद्धा वालकरचीही अशीच हत्या झाली.

जगभर कोरोना महामारीने हाहाकार उडवून दिला होता, पतीने केलेली मारहाण समर्थनीय ठरवली जात असेल तर तेव्हा सारेच घरात अडकले होते. नोकरी, व्यवसायाच्या रामरगाड्यात पती-पत्नींमधील संवाद विरळ झाल्याने नातेसंबंधातील तणाव कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात घरात बरोबर राहिल्याने, संवाद वाढल्याने कमी होईल, स्त्री-पुरुष शिक्षणामुळे, आर्थिक सुबत्तेमुळे फारसा फरक असे मनोवैज्ञानिकांचे म्हणणे होते. मात्र, लॉकडाऊनचा कालावधी जसजसा वाढत गेला, तसतसे वादविवाद वाढत गेले. पुढे  लॉकडाऊन संपताच संयुक्त राष्ट्रसंघाने एक पाहणी अहवाल तयार केला होता. त्यात म्हटले होते की, ४०० कोटी लोक घराघरांत अडकले. या काळात अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स या प्रगत देशांतील स्त्रियांवरील कौटुंबिक हिंसाचारातही वाढ वरिष्ठ सहायक संपादक, झाली. कोरोना काळात स्त्रिया मैत्रिणी, नातलग यांच्यापासून दुरावल्या व मारहाण करणाऱ्या जोडीदाराच्या पहाऱ्यात अडकल्याने छळछावणीतील कैद्यासारखी त्यांची अवस्था झाली होती. या अवस्थेचे वर्णन संयुक्त राष्ट्रसंघाने 'महामारीची काळी सावली', असे केले होते. आता सर्व काही सुरळीत सुरू आहे.

स्त्रिया घराबाहेर पड्डू लागल्या. तरीही संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात याचा अर्थ कोरोनाने स्त्री स्वातंत्र्याच्या आतापर्यंत सुरू असलेल्या चळवळीने जे कमावले होते त्यावर बोळा फिरवला, असे म्हणावे लागेल. स्त्रियांबाबतच्या हिंसेत पडलेला नाही. पूर्वी अशिक्षित स्त्री तिला नवरा जेवायला अन्न, नेसायला कपडे देत नाही, अशी तक्रार करत होती, तर आता कमावणाऱ्या अनेक स्त्रियांना त्यांच्या खात्यात जमा होणान्या वेतनामधील रुपयाही काढता येत नाही. १५ ते २० वर्षापूर्वी पतीचा छळ सहन करणाऱ्या स्त्रीसमोर केवळ अंधकार असायचा. लोकमत आताही छळ सुरू आहे. पण सुटकेनंतरचा तिचा मार्ग तिला ठावूक आहे, एवढाच काय तो फरक! लग्नाची बेडी पुरुषाला स्त्रीवर हक्क सांगण्याचा अधिकार देते म्हणून लिव्ह इन रिलेशनशिपचा स्वीकार केला गेला. मात्र पुरुषाने हक्क गाजवण्याच्या प्रवृत्तीतून स्त्रीची सुटका झाली नाहीच.. आता स्त्रियांनाच नवे मार्ग शोधावे लागणार असे दिसते! त्यातला एक मार्ग वाढीच्या वयातच मुलग्यांचे कान धरणे असा असायला हवा!

टॅग्स :Domestic Violenceघरगुती हिंसाrelationshipरिलेशनशिपSocialसामाजिक