शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ना नेता, ना नीती, ना नारा! काँग्रेसचा नन्नाचा पाढा?; स्वबळावर बहुमत मिळवणं अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 06:05 IST

या निवडणुकीत काँग्रेस कमी जागा लढवत आहे, याचे कारण एकच करिश्मा असलेला नेता, सुस्पष्ट नारा आणि नेमकी नीती नसणे!

 प्रभू चावला, ज्येष्ठ पत्रकार 

अज्ञान आणि आत्मविश्वास, ही यशाची गुरुकिल्ली आहे, असे मार्क ट्वेन म्हणाला होता. १३९ वर्षांच्या  काँग्रेसची आजची स्थिती पाहताना मार्क ट्वेनचे हे वाक्य आठवते. आता या पक्षाने एक नवी धारणा पुढे आणली आहे- किमान हेच नवसिद्ध कमाल होय! त्यांचा नवा निवडणूक मंत्र आहे : “विश्वासपूर्वक थोड्याच जागा लढवा आणि घवघवीत यश मिळवा.”  काँग्रेस पहिल्यांदाच  लोकसभेसाठी ३३० पेक्षाही कमी उमेदवार उभे करत आहे. स्वबळावर बहुमत मिळवणे आपल्याला शक्य नसल्याची ही कबुलीच नव्हे काय? 

आज हा पक्ष घराणेशाही, पराभवांची मालिका, पक्षांतरे आणि वास्तवाचा अस्वीकार, यामुळे पोखरला जात आहे.  वीस- तीस वर्षांपूर्वीपर्यंत एकेका मतदारसंघात पंचवीस- तीस लोक काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी जीव पाखडत असत. आज दोनेकशे मतदारसंघांत जिंकण्याजोगा एक उमेदवार मिळणेही मुश्कील झाले आहे. इंडिया आघाडीच्या संदिग्ध आणि वैचारिकदृष्ट्या डळमळत्या प्रवासात मित्रपक्षांच्या कुबड्या घेऊन पुढे जाताना काँग्रेस संकटमोचनाची आकांक्षा बाळगत आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात काँग्रेसने मित्रपक्षांसाठी जागा सोडल्या, त्या निव्वळ नाइलाज म्हणून, औदार्याने नव्हे. आपली प्रासंगिकता शाबूत राहावी आणि एकेकटे लढून आपण एरवी हरलो असतो, त्या जागा जिंकता याव्यात यासाठी समविचारी पक्षांशी हातमिळवणी करण्याचे हे मूळ धोरण डाव्यांचे. काँग्रेसने त्यांचाच कित्ता गिरवला.

निवडणुकीतील आपला किमान आधार शाबूत राखण्यासाठी काँग्रेस अखिलेश यादव, तेजस्वी यादव, स्टॅलिन, केजरीवाल आणि इतर मंडळींवर अवलंबून आहे. तथापि, उत्तरेकडील इतर राज्यांत तसेच कर्नाटकात काँग्रेसने मित्रपक्षांबाबत फारसे औदार्य मुळीच दाखवलेले नाही. मतांची टक्केवारी कितीही कमी झाली तरी चालेल; पण लढलेल्यांतील जास्तीत जास्त जागा जिंकायच्या, हे त्यांचे उद्दिष्ट आहे. अनेक राज्यांत आपण नावालाच उरलो आहोत, तेथील मतदारांची आपल्याला पसंती नाही, हे काँग्रेसच्या लक्षात आलेले नाही. या निवडणुकीत काँग्रेस कमी जागा लढवत आहे, याचे  कारण एकच : करिश्मा असलेला नेता, नारा आणि नीती नसणे! गेल्या चार दशकांत पक्षाच्या नेतृत्वनिर्माण क्षमतेचा ऱ्हास होत जाताना दिसतो.  इंदिरा गांधी यांनी ख्रिश्चन, दलित, आदिवासी, अल्पसंख्य, उच्चवर्णीय, उच्चवर्गीय, अशा सर्वांच्या संमिश्र सामाजिक इंद्रधनुष्याचे स्वरूप आपल्या पक्षाला प्राप्त करून दिले होते. त्यांच्यानंतर राजीव, सोनिया किंवा राहुल यांच्यापैकी कुणीच पक्षाचे ते वलय पुन्हा प्राप्त करू शकलेले नाहीत.

इंदिराजींच्या हत्येमुळे १९८४ साली राजीव गांधींच्या बाजूने उसळलेल्या सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसला लोकसभेत ४०० हून अधिक अशा विक्रमी जागा मिळाल्या. मात्र, १९८९ साली राजीव यांना सलग दुसरा विजय काही मिळवता आला नाही. राजीव यांच्या भीषण हत्येनंतर १९९१ साली नरसिंहरावांनी कसेबसे अल्पमतातील सरकार पूर्ण पाच वर्षे चालवले. १९९६ ला काँग्रेसची अधिकच मानहानी झाली. पुढे १९९८ साली सीताराम केसरी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला केवळ १४१ जागाच मिळाल्या. त्यानंतर सोनिया गांधी अध्यक्ष बनल्या. १९९९ साली ४५३ मधील केवळ ११४ लोक निवडून आले; परंतु सोनियांच्या अंगी युती घडवण्याचे आणि टिकवण्याचे एक सुप्त कौशल्य होते. त्यांच्या या कौशल्यामुळे २००४ साली वाजपेयी सरकारचा पराभव झाला. त्यावेळी काँग्रेसचे ४१७ पैकी १४५ उमेदवार निवडून आले.

२००९ साली अडवाणी यांच्यासारख्या दमदार व्यक्तित्वाविरोधात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने चमकदार कामगिरी केली. त्यांच्या ४४० पैकी २०६ उमेदवारांनी लोकसभा गाठली.त्यानंतर काँग्रेसची घसरण सुरूच आहे. बहुतेक ज्येष्ठ नेते पक्ष सोडून जात आहेत. नरेंद्र मोदींच्या आगमनानंतर काँग्रेसची अवस्था बिकट झाली. २०१४ मध्ये लोकसभेतील सदस्यसंख्या ५०च्याही खाली गेली. अधिकृत विरोधी पक्षाचे स्थानही त्याने गमावले. २०१९ मध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली अल्पशी सुधारणा होऊन आकडा ५२ वर गेला. राजकारणात येऊन वीस वर्षे झाली तरी राहुल अद्याप राष्ट्रीय किंवा पक्षीय पातळीवर पूर्णपणे स्वीकारले गेलेले नाहीत. दोन यशस्वी राजकीय यात्रांमुळे त्यांची लोकप्रियता वाढली हे खरे! लोकप्रियतेच्या बाबतीत मोदी आणि राहुल यांच्यातील अंतर काही प्रमाणात कमी झाले; पण राहुल यांच्यासाठी पल्ला अजून लांबचा आहे.

काँग्रेसकडे मनुष्यबळ, बाहुबळ आणि धनाची कमतरता आहे. सरकारने त्यांची बँकेतील खाती गोठवली आहेत. २०२४ ची निवडणूक म्हणजे आज अधिकाधिक यश मिळवून आगामी युद्धानंतर मस्तकी धारण करावयाच्या राजमुकुटाचा दावा अबाधित राखायचा यासाठी करावयाची एक छोटी लढाई आहे. आपल्यातील दोष काँग्रेसने स्वीकारले, तर देशाच्या गावशहरातील वास्तवाचे आत्मविश्वासपूर्ण भान पक्षाला येऊ शकेल... मग यश दूर असणार नाही.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी