शहरं
Join us  
Trending Stories
1
Waqf Law: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
2
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. "आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’, 
3
गुजरातमधील पाटण जिल्ह्यात भीषण अपघात; बस आणि ऑटोरिक्षाच्या धडकेत ६ जण ठार!
4
IPL 2025: ट्रेव्हिस हेडच्या जाहिरातीवरून तुफान राडा! RCB ने घेतली कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
5
सलमानचा 'सिकंदर' ठरला फ्लॉप, सपोर्टला आला अक्षय कुमार, म्हणाला-"टाइगर जिंदा है, हमेशा जिंदा रहेगा"
6
रेश्मा केवलरमानी यांचा अमेरिकेत डंका! टाईम मासिकाच्या टॉप १०० यादीत एकमेव भारतीय
7
CM फडणवीसांचा नव्या शैक्षणिक धोरणाला पाठिंबा; म्हणाले, “मराठी आली पाहिजे, पण हिंदी...”
8
ऑटोमॅटीक कार चालवत असाल किंवा एकाच जागी बसून असाल तर काय कराल? डीव्हीटी काय असतो...
9
Aligarh: "मी लग्न करेन, पण एका अटीवर..."; सासूसोबत पळून गेलेला जावई काय म्हणाला?
10
हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा; नेते म्हणाले, “आमच्यावर भाषा लादू शकत नाही”
11
"३ महिन्यात निर्णय घ्या"; कोर्टाच्या निर्णयावर उपराष्ट्रपती नाराज, म्हणाले, "न्यायालय आदेश देऊ शकत नाही"
12
२०३२ पर्यंत गुरुची अतिचारी गती: ९ राशींना गुरुबळ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; बक्कळ लाभ, भरभराट!
13
माझा आजचा दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे; कारण सांगत धनंजय मुंडेंनी दिली माहिती
14
IPL 2025: २५ दिवसांपूर्वी केलेली भविष्यवाणी आज काव्या मारनला हसवणार की रडवणार? प्रकरण काय
15
पंचांशी वाद घातल्याबद्दल मुनाफ पटेलला बीसीसीआयने ठोठावला दंड, दिल्ली- राजस्थान सामन्यात काय घडलंं?
16
चीनच्या कंपनीने मारुतीच्या फ्राँक्सची कॉपी केली; 1200 किमी रेंजवाली एसयुव्ही लाँच केली
17
२०० रुपयांपर्यंतचे Jio, Airtel आणि Vi चे प्लान्स, मिळताहेत जबरदस्त बेनिफिट्स
18
"तुम मराठी लोग गंदा है...", घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी-गुजराती वाद, मनसैनिकांनी काय केलं पाहा...
19
सोन्याच्या दरात मोठी तेजी, पोहोचलं १ लाखांच्या जवळ, किंमत कमी होण्याची शक्यता आहे का? पाहा नवे दर
20
लोणावळा रेल्वे रुळाजवळ सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ!

बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:39 IST

शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करणार अशी घोषणा करायची अन् साखरेच्या निर्यातीवर २० टक्के कर आकारायचा. म्हणजे सारे काही बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी!

- धर्मराज हल्लाळे

कधी दुष्काळ तर कधी गारपिटीने कोरडवाहू शेतक-यांची होणारी विपन्नावस्था सरकार दरबारी निव्वळ सहानुभूतीचा विषय आहे़ एकिकडे शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करणार अशी घोषणा होते, केंद्राचा यंदाचा अर्थसंकल्प शेतक-यांचे भले करणारा आहे, असेही सांगितले जाते़ घोषणांचा पाऊस होतो, भाषणांचा सुकाळ होतो. मात्र शेतक-यांच्या पदरी दुष्काळाच्या व्यथा कायम राहतात़ कोरडवाहू, अल्पभूधारक शेतकरी पूर्णत: कोलमडला आहे़ आता बागायतदार, ऊस उत्पादक शेतकरीसुद्धा सरकारी धोरणांचे बळी ठरतील असे चित्र आहे.महाराष्ट्रात सुमारे ९ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात ऊस घेतला जातो़ त्यात मराठवाडाही मागे नाही़ जिथे पाणी आणि त्याचे काटेकोर नियोजन आहे तिथे पैसा देणारे पीक म्हणून ऊस लागवड केली जाते़ काही भागात तुलनेने पाऊस बरा झाला़ जलसाठ्यांमध्ये पाणी होते़ परिणामी, ऊस लागवड वाढली़ यावर्षी मार्च अखेरपर्यंत शेतातील उभ्या उसाचे गाळप होईल. परंतु, पुढच्या वर्षी एकंदर वाढलेले क्षेत्र लक्षात घेता महाराष्ट्रातील सहकारी व खाजगी साखर कारखाने संपूर्ण गाळप करू शकतील का, हा प्रश्न आहे़ यावर्षीच ४० लाख टन साखरेचे अतिरिक्त उत्पादन होईल असा अंदाज आहे़ परिणामी, गरजेपेक्षा अधिक उत्पादन झालेल्या साखरेची निर्यात होणे आवश्यक आहे़ परंतु, केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर २० टक्के कर आकारणी केली जात आहे़ त्यामुळे निर्यातीवर निर्बंध येतील़ नेमक्या याच विषयावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा़शरद पवार यांनी बोट ठेवले़ उस्मानाबाद जिल्ह्यातील रांजणी येथील नॅचरल साखर कारखान्यावर आयोजित सोहळ्यात राजकीय भाषण बाजूला ठेवून शरद पवार यांनी कृषी व्यवस्थेवर सविस्तर उद्बोधन केले़ साखरेवरील सरकारचे निर्यात धोरण ऊस उत्पादक शेतकºयांना अडचणीत आणणारे आहे़ एकिकडे निर्यातीवर कर आणि दुसरीकडे वाढलेल्या उत्पादनामुळे साखरेचे भाव आणखी पडणाऱ त्यामुळे उसाला योग्य भाव मिळणार नाही़ उलट गरजेपेक्षा अधिक उत्पादन झाल्यावर निर्यातीवर अनुदान देणे आवश्यक आहे़ खाजगी साखर कारखाना संघटनेचे अध्यक्ष बी़बी़ ठोंबरे यांनी केंद्र सरकारला पत्रव्यवहार केला़ निर्यातीवरील करामुळे शेतकºयांना अधिकचा भाव देणे शक्य होणार नाही, हे स्पष्ट आहे.ऊस म्हटले की पाण्याचा प्रश्न उभा राहतो़ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व देशातील नामांकित संस्था कमी पाण्यावर व अल्पावधीत ऊस घेण्यासंबंधी संशोधन करीत आहेत़ सद्य:स्थितीत ठिबक सिंचन हा पर्याय आहे़ परंतु, गेल्या तीन वर्षांपासून या योजनेवरील अनुदान मिळालेले नाही़ तर ऊस उत्पादकांपेक्षाही कोरडवाहू पिके घेणारा शेतकरी अधिक अडचणीत आहे़ जिथे सोयाबीनला हमीभाव मिळू शकला नाही, तिथे उत्पादन खर्चाच्या दुप्पट भाव देण्याच्या गुजगोष्टी केल्या जात आहेत़ दरम्यान, शरद पवार यांच्याकडून नव्याने पुढे आलेला शेतकरी आरक्षणाचा मुद्दा घटनेच्या चौकटीत कितपत टिकणार हा प्रश्न असला तरी शैक्षणिक, आर्थिक मागासलेपणाबरोबर कृषक समाजाचे सामाजिक मागासलेपण सिद्ध करता येईल का हे तपासले पाहिजे़ तसे पाहिले तर शेतकºयांबद्दल पदोपदी सहानुभूती व्यक्त होते़ मात्र पत निर्माण करण्यासाठी कोणी साथ देत नाही़ कर्ज बुडव्यांनी बुडत असलेल्या बँका शेतकºयांना तारु शकत नाहीत़ उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी हे बोल आता उलटे झाले आहेत़

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी