शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

Raj Thackeray: ...तरच मनसेच्या झेंड्यावरची शिवमुद्रा शोभेल, राज ठाकरेंना 'लाभेल'!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 5:03 AM

शिवसेनाप्रमुखांना हिटलरचे आकर्षण होते. राज यांनाही ते असू शकते. मात्र राज यांना याचा विसर पडला की, विश्वबंधुत्व, विश्वकल्याणाची अपेक्षा ठेवून राजमुद्रेत ‘विश्ववंदिता’ या शब्दाचे प्रयोजन केले आहे.

राज कपूर हे आपल्या चित्रपटाकरिता भव्यदिव्य सेट उभारायचे, स्टारकास्ट घ्यायचे. त्यामुळे त्यांना रुपेरी पडद्यावरील ‘शोमन’ असे संबोधिले जात होते. महाराष्ट्रातील राज ठाकरे हे पक्षाचे अधिवेशन घेतील, मोर्चा काढतील किंवा फोटोबायोग्राफी प्रकाशित करतील, तरी तो भव्यदिव्य असतो. त्यामुळे राजकारणातील राज हेही एका अर्थाने ‘शोमन’ आहेत.

भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी, पाकिस्तानी नागरिकांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी काढलेला मोर्चा हाही असाच राज यांच्या शोमनशिपचा पुरावा होता. लोकसभा निवडणुकीकडे पाठ फिरवल्यावर व विधानसभा निवडणुकीत एकुलत्या एक आमदारापलीकडे हाती काही न लागल्यानंतर आता महापालिका निवडणुकांकरिता मनसेने पक्षाचे पहिले अधिवेशन अलीकडेच आयोजित केले. यापूर्वी बिहार, उत्तर प्रदेश येथून येणाऱ्या लोंढ्यांविरोधात वातावरण तापवून मराठीच्या मुद्द्यावर मनसेने राजकीय पोळी भाजली. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपला अर्धचंद्र देत शरद पवार यांची करंगळी धरून सत्तेचा सोपान गाठला. आता हिंदुत्वाचे अवकाश आपल्याला मोकळे झाल्याचा भाजपच्या चाणक्यांचा सल्ला ऐकून मनसेने आपला झेंडा बदलला. बांगलादेशी, पाकिस्तानी यांच्या विरोधात षड्डू ठोकले.

अधिवेशनात बोलताना राज यांनी केंद्र सरकारच्या सीएए व एनआरसीविरोधात निघणाऱ्या मोर्चांना मोर्चाने उत्तर दिले जाईल, असे जाहीर केले. त्यानंतर, मनसेच्या नेत्यांनी आपला मोर्चा सीएएच्या समर्थनार्थ नसून घुसखोरांविरोधात असल्याची सारवासारव केली. राज यांनी मोर्चात बोलताना केलेली दगडाला दगडाने व तलवारीला तलवारीने उत्तर देण्याची भाषा ही शाहीनबाग, नागपाडा वगैरे ठिकाणी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना चिथावणारी होती. केंद्रात सत्तेवर आल्यावर देशासमोरील आर्थिक प्रश्न सोडवण्यात फारसे यश न आलेल्या भाजप सरकारने दिल्ली विधानसभा निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा हिरिरीने मांडला. येणाऱ्या पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांत हिंदुत्वाचे अस्त्र भाजप वापरणार, असे संकेत सध्या मिळत आहेत. सीएए, एनआरसी किंवा राम मंदिर या कुठल्याच मुद्द्यांवर समोरून जहाल प्रतिसाद येत नसल्याने हिंदुत्वाची भट्टी कशी पेटवायची, असा प्रश्न भाजपला पडला आहे. अशा वेळी तलवारीला तलवारीने उत्तर देणारा एखादा भिडू लाभला, तर भाजपला अपेक्षित ठिणगी पडू शकते, असे त्या पक्षातील काही नेत्यांना वाटत आहे. मात्र, भाजपसारख्या देशाची सत्ता ताब्यात असलेला पक्ष जर हिंदुत्वाच्या गर्जना करणार असेल, तर मनसेने हिंदुत्वाच्या नावाने केलेले म्यांव म्यांव कोण कशाला ऐकेल व मनसेला या मुद्द्यावर कशाला मतदान करील, अशी शंका वाटते. भाजपला हिंदुत्वाच्या अवकाशात भागीदार नको, हे शिवसेनेच्या लक्षात येताच त्यांनी त्यांची साथ सोडली.

कुठल्याही ‘भाई’चा ‘बारक्या’ हा कधीच भाई होत नाही. त्यामुळे मनसेचा आपल्या राजकीय फायद्याकरिता वापर करायचा, हा भाजपचा हेतू लपून राहिलेला नाही. समजा, हिंदुत्वाचा मुद्दा चालला नाही व सत्तेकरिता पुन्हा मित्रपक्षाची गरज लागली, तर संख्याबळावर भाजप शिवसेनेला जवळ करील की मनसेला, याचाही शांतपणे विचार करण्याची गरज आहे. काही महिन्यांपूर्वी राज यांच्या पाठीमागे कोहिनूर खरेदीसंबंधी लागलेला (की लावला गेलेला) ईडीच्या चौकशीचा ससेमिरा अचानक बंद झालेला आहे. मनसेची बदललेली भूमिका व ईडीची बंद झालेली फाइल, याचा अन्योन्यसंबंध असल्याचे सर्वसामान्यांच्या मनात घोळत राहिल्यावाचून राहत नाही. राज यांनी नाशिकमध्ये सत्ता असताना काही चांगली कामे केली. राज्यात बेकायदा टोलवसुलीला वेसण घालण्याकरिता आंदोलन केल्याने काही बेकायदा टोलनाके बंद झाले. राजकारणात सध्या राज यांच्याकरिता कठीण काळ आहे. अशा वेळी त्यांनी सावधपणे बाळासाहेबांच्या समाजकारणाचा वसा सांभाळला, तर लोकांच्या मनातील त्यांचे स्थान प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाईल आणि शिवमुद्रेचा स्वीकार सार्थ ठरेल. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे