शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

महाराष्ट्रात पुन्हा 'पहाटेचा शपथविधी' होईल?; थोड्याच दिवसांत अंदाज येईल

By यदू जोशी | Updated: November 2, 2020 17:20 IST

Maharashtra Politics : भाजपवाल्यांना आवडो न आवडो, पण ठाकरेंच्या भाषणानं शिवसेना चार्ज्ड झाली. शरद पवार कधीही भाजपसोबत जाणार नाहीत. राज्यातील काँग्रेसच्या  नेत्यांना सत्ता सोडण्याची दूरदूर इच्छा नाही. त्यामुळे सरकार ‘फेविकॉल का जोड’ होत चाललं आहे.

- यदू जोशी  

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चार दिवसांपूर्वी शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांची ऑनलाइन बैठक घेतली. ‘विधानसभेवर स्वबळावर भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा’ असं आवाहन त्यांनी त्या बैठकीत केल्याच्या बातम्या छापून आल्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावर खोचक प्रतिक्रिया दिली. ‘स्वबळाची ही भाषा मी तीस वर्षांपासून ऐकतोय’ असा चिमटा त्यांनी काढला. तीन पक्षांचं सरकार आपण चालवतोय याचं भान उद्धवजींना नक्कीच आहे; पण तरीही पक्षातील नेत्यांचं मनोबल वाढविण्यासाठी तसं बोलावंच लागतं. शरद पवार पंतप्रधान होणार हेही आपण जवळपास  तीस वर्षांपासून ऐकतोच आहोत ना! पण स्वत: पवार यांनी  ‘माझ्या पक्षाचे खासदार किती, पंतप्रधान होण्यासाठी लागणारं संख्याबळ किती, या सगळ्यांचं भान मला आहे’, असं वेळोवेळी म्हटलंच आहे.  १९९५ पासून आतापर्यंतच्या २५ वर्षांत महाराष्ट्रातील मतदारांनीही युती वा आघाडी धर्मावरच शिक्कामोर्तब केलेलं आहे. गेल्यावेळी ते युतीवर केलं आणि सरकार आघाडीचं आलं हा भाग वेगळा. आघाडीशिवाय पर्याय नसलेली शिवसेना स्वबळाचं स्वप्न पाहत आहे अन् सर्वाधिक आमदार निवडून येऊनही सत्तेसाठी आवश्यक असलेले आणखी २५-३० आमदार मिळविण्याच्या विवंचनेत भाजपचं मनोधैर्य खचत चाललं आहे. भाजपचे केंद्रातील एकेक मित्रपक्ष सोडून जात आहेत आणि महाराष्ट्रात चंगूमंगू पक्षांशिवाय मोठा मित्र मिळत नाही ही अडचण आहे. आपलं सरकार येणार, हे छातीठोकपणे सांगत असलेल्या भाजप नेत्यांना  ‘आकड्यांचा मेळ कसा साधणार?’ असं विचारलं की ते  ‘तुम्ही फक्त पाहत राहा, डिसेंबरमध्ये चमत्कार होईल!’ एवढंच सांगतात. हे  केवळ विशफुल थिंकिंग आहे. भाजपपासून शिवसेना खूपच दुरावली अन् दुखावली आहे. दसरा मेळाव्यातील त्यांच्या भाषणात ही कटुता दिसली. भाजपवाल्यांना आवडो न आवडो, पण ठाकरेंच्या भाषणानं शिवसेना चार्ज्ड झाली. शरद पवार कधीही भाजपसोबत जाणार नाहीत. भाजपसोबत जावं असं वाटणाऱ्या त्यांच्या आप्तस्वकीयांचे मनसुबे म्हणूनच प्रत्यक्षात उतरत नाहीत. राज्यातील काँग्रेसच्या  नेत्यांना सत्ता सोडण्याची दूरदूर इच्छा नाही. त्यामुळे सरकार ‘फेविकॉल का जोड’ होत चाललं आहे. तरीही  बिहारच्या निकालावर बरंच काही अवलंबून असेल. तिथे नितीशकुमार-भाजप हे कॉम्बिनेशन जिंकलं तर महाराष्ट्रात पहाटेच्या शपथविधीची पुनरावृत्ती होऊ शकेल. पार्टनर कोण असेल ते आताच सांगता येत नाही. भाजप खुर्द अन् भाजप बुद्रुकमधील वाद खेड्यात एकाच गावाचे दोन भाग असतात ते म्हणजे खुर्द अन् बुद्रुक. खुर्द हे लहान तर त्या मानानं बुद्रुक मोठं असतं. गाव एकच; पण एखादी नदी, ओढ्यानं ते विभागलेलं असतं. गावावर संकट आलं की सगळे एक होतात. एरव्ही बरेचदा आपसी वाद उद‌्भवतात अन् ते सामोपचारानं पंचायतीसमोर मिटतातही. महाराष्ट्र भाजपमध्ये असं खुर्द-बुद्रुकचं वातावरण सध्या दिसतं आहे. तिथेही एका पंचायतीची गरज आहे. काही नेते समृद्ध अडगळ ठरू लागले आहेत. एकनाथ खडसे सोडून गेले हा पक्षासाठी आत्मचिंतनाचा विषय असल्याचं एका नेत्याला वाटतं, तर दुसरा म्हणतो की खडसेंनीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. यातून विरोधाभास दिसतो. महाविकास आघाडीच्या सरकारला घेरण्याची मोठी संधी असताना भाजपचे नेते एकमेकांना पाण्यात पाहताना दिसत आहेत. सामाजिक अस्मितांना आणखी टोक मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, मुस्लीम आरक्षण, ओबीसींवरील अन्याय, पदोन्नतीतील आरक्षण अशा मुद्द्यांवर सामाजिक अस्मिता टोकदार होत असतानाच त्या आपसातील संघर्षाचा विषय ठरू पाहताहेत. अकरावीची प्रवेशप्रक्रिया आरक्षणाच्या मुद्द्यावरून रखडली. एमपीएससीची परीक्षा रद्द झाली. पदोन्नतीतील आरक्षणावरून कर्मचाऱ्यांमध्ये आपसात कटुता आहे. बडे अधिकारी, सामान्य कर्मचाऱ्यांचे जातनिहाय व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप विद्वेषाचे वाहक बनले आहेत. सवलतींच्या गाडीत बसण्यावरूनचे वाद तीव्र होण्याची भीती आहे. ते टोकाला जाऊ न देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. अधिकार मिळेनात; राज्यमंत्र्यांमध्ये खदखदबरेचसे कॅबिनेट मंत्री अधिकारच देत नसल्याने राज्यमंत्र्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. सगळ्याच पक्षांचे राज्यमंत्री सध्या एकत्र आले असून, दर आठवड्याला भेटून चर्चा करतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे बहुतेकांनी तक्रारी केल्या. राज्यमंत्री बच्चू कडूंचंच घ्या, जलसंपदा, कामगार, शालेय शिक्षण, महिला व बालविकास आदी महत्त्वाची खाती त्यांच्याकडे आहेत; पण जलसंपदाचे कॅबिनेट मंत्री जयंत पाटील सोडले तर त्यांना कोणी अधिकारच देत नाही. पूर्वी एक राज्यमंत्री गजानन महाराजांची मूर्ती, फोटोंना नमस्कार करत दिवसभर रिकामे बसलेले असत. बिनपगारी फुल अधिकारी अशी राज्यमंत्र्यांची अवस्था अजूनही कायम आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र